10/07/2024
- ट्रिकोटिलोमेनिया म्हणजे काय आहे?
ट्रिकोटिलोमेनिया किंवा टीटीएम एक मनोवैज्ञानिक समस्या आहे. यात व्यक्ती नाइलाजाने आपलेच केस ओढतो किंवा उपटतो. ही समस्या ओबसेस्सिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डरअंतर्गत येते. हा आजार गंभीर झाल्यास व्यक्तीच्या व्यक्तित्व, जीवनाची गुणवत्ता आणि आनंदावर त्याचा मोठा प्रभाव पडतो.
- हा कोणाला प्रभावित करतो ?ट्रिकोटिलोमेनिया मुले आणि किशोरवयीनांमध्ये सामान्य आहे. लहान मुलांत हे आपोआप दूर होते. त्याचे गंभीर रूप १० ते १३ या वयोगटात दिसून येते. वयस्कर व्यक्तीमध्ये हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आढळले आहे.
- काय आहेत मुख्य लक्षण?
व्यक्ती आपले स्वत:चे केस ओढतो; पण त्याला त्याची जाणीव होत नाही. केस तुटल्यानंतर त्याला समाधान वाटते. वारंवार स्वत:ला थांबविण्याचा प्रयत्न सुरू असतो; पण तरीही केसांना ओढतो. आपल्या केसांमुळे तो नेहमी तणावात राहतो. अशा व्यक्तीच्या डोक्याच्या काही भागात बघितल्यावर त्यात टक्कल पडल्याचे दिसून येते.
- उपचार काय आहे?
बरेच लोकं याचा उपचार करीत नाही. कारण ते याला एक सवय मानतात, आजार नाही. अन्य काही कारणे आहेत ज्यामुळे ते या आजाराचे निदान शोधत नाही. अशा स्थितीतील लोकांसाठी व्यवहार चिकित्सा (behaviour therapy)
व औषधी गुणकारी ठरू शकते.
- व्यवहार चिकित्सा(Behaviour Therapy)काय आहे?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हैबिट रिवर्सल थेरेपी ही व्यावहारिक चिकित्सेचा (behaviour therapy) एक भाग आहे. ट्रिकोटिलोमेनियाच्या उपचारामध्ये ती प्रभावी ठरू शकते. यात जागरुकता प्रशिक्षण, प्रतिस्पर्धी प्रतिक्रिया प्रशिक्षण, प्रेरणा व अनुपालन, विश्राम प्रशिक्षण व सामान्यीकरण प्रशिक्षणाचा समावेश आहे.
- कुठल्या औषधी उपयोगी?
या आजाराच्या उपचारावर फार कमी परीक्षण झाले आहे. वर्तमानात ट्रायकोटिलोमेनिया यावर महत्त्वपूर्ण उपचार व प्रभावी औषधाच्या रूपात ओलँनजापाईन, एन-एसिटाईलसिस्टीन व क्लोमीप्रामाईन या औषधांचा समावेश आहे.
- अडचण काय आहे?
सदैव तणावात असणारे व आपला तणाव प्रदर्शित न करू शकणारे ट्रिकोटिलोमेनियाचे २० टक्के रुग्ण आपल्या केसांना खातात. याला ट्राईकोफैगिया असेही म्हटल्या जाते. ट्राइकोबेजोअर्स मध्ये उल्टी, मळमळ, पोटात दुखणे व आतड्यांमध्ये अवरोध व ॲनिमियाचा समावेश आहे. काही प्रकरणात त्यांना हेअर बॉलला काढण्यासाठी सर्जरीची आवश्यकता भासू शकते.
- डॉ.बालाजी विश्वनाथ आद्रट (पाटील)*
-एम.बी.बी.एस. डी.डी.व्ही.(मुंबई)
त्वचारोग,कुष्टरोग, गुप्तरोग व केसविकर तज्ञ.
- आद्रट स्किन केअर & कॉस्मेटॉलोजी क्लिनिक,चिखली.*
- पत्ता:-पोहरकर हॉस्पिटल कॉम्प्लेक्स,जालना बायपास रोड, चिखली.जि.बुलढाणा.
- नावानोंदणी साठी संपर्क :- ९४०४७९९९७७.