Waghchavare Dental Clinic

Waghchavare Dental Clinic Waghchavare Dental Clinic

Extra Wisdom tooth
06/09/2021

Extra Wisdom tooth

31/05/2021
17/05/2021
17/05/2021

*कोरोना नंतर होणारे दातांशी संबंधित फंगल इन्फेक्शन्स्*

वाचकहो ,सध्याच्या
कोवीड -19 च्या महामारीत आपल्याला कशा कशाची काळजी घ्यायची आहे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हा व्हायरस आपल्या फुफ्फुसां वरच वरच नाही तर शरीराच्या इतर अवयवांवर देखील
अप्रत्यक्षपणे हल्ला करतोय. आपल्याला शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या त्याचा मुकाबला करायचा आहे.
काही कोरोना बाधित रुग्ण ज्यांना
अनियंत्रित डायबिटीस, उच्च रक्तदाब आहे अशांना श्वास घेण्यास त्रास होणे , हाय ग्रेड फिवर (High grade fever) ,ऑक्सिजन सॅच्युरेशन(Oxygen saturation) कमी होणे अशी लक्षणे दिसल्यानंतर त्याच्या (निमोनिया/Pneumonia) ट्रीटमेंट करिता हॉस्पिटल्समध्ये लाइफ सेविंग ड्रग्स् (Life Saving Drugs) देण्यात येत आहेत .या जीवन रक्षक प्रणालीमुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे परंतु अशा लाइफ सेविंग ड्रग्स् (Life Saving Drugs) च्या वापरामुळे /दिलेल्या डोसेस् मुळे काही जणांची प्रतिकारशक्ती (Immunity) थोड्या काळापुरती कमी झालेली आढळून येत आहे .हे सर्व नमूद करायचा उद्देश हाच की एक सीनिअर *डेंटल सर्जन* या नात्याने पहिल्या कोवीड लाटे पेक्षा दुसऱ्या कोवीड लाटेमध्ये तोंडातील एक प्रकारचे अपॉर्च्युनिस्टिक opportunistic (संधिसाधू) *फंगल इन्फेक्शन* (Fungal Infections) म्हणजेच *कॅन्डीडियासीस* व *म्युकोरमायकाॅसिस* यांचे दिसणे हे होय .

यापूर्वी माझ्या अठरा वर्षाच्या डेंटल प्रॅक्टिसमध्ये अशी *फंगल इन्फेक्शन* दिसण्याचे प्रमाण खूप कमी होते .जरी दिसायचे ते अनियंत्रित डायबेटिक पेशटस् मध्ये नाहीतर एचआयव्ही (HIV)सारख्या आजारांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती खूपच खालावलेली असते अशा पेशंट मध्येच .
अशा इन्फेक्शन ना अपॉर्च्युनिटीस्टिक्स (Opportunistic) म्हणायचे कारण म्हणजे ते तुम्हाला बाधा पोचवितात जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती खालावलेली असते तेव्हाच .त्यातील कॅंडिडियासिस हे *फंगल इन्फेक्शन* दोन ते तीन आठवड्यांच्या *गोळ्या औषधे किंवा मलम* लावून कमी होऊ शकते पण म्युकॉरमायकॉसिस हे फंगल इन्फेक्शन जरा काळजीपूर्वक हाताळणे अत्यंत गरजेचे आहे.

*▶️ याची बाधा कोणाकोणाला होऊ शकते?*

1)ज्यांची प्रतिकार शक्ती खालावलेली आहे
2) अनियंत्रित डायबेटिक पेशंटस्
3)कोरोनातून बरे झाले पण प्रतिकारशक्ती कमी असलेले
4)ज्यांचे मौखिक आरोग्य चांगले नाही अशांमध्ये
5) धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती
6) एच. आय. व्ही. ( HIV)पेशंटस्

*कॅंडिडीयासिस* हे फंगल इन्फेक्शन दिसताना तोंडामध्ये छोट्या-छोट्या पांढऱ्या पुरळांद्वारे दिसते . ते पुरळ फुटले तर त्यांच्या खाली लालसर असा जखमेचा पृष्ठभाग दिसतो त्यामुळे रुग्णांना तिखट, गरम खाताना, अन्न गिळताना त्रास होतो . या जखमा /अल्सर तोंडामध्ये जिभेवर, ओठावर ,गालाच्या आतील बाजूस ,घशाकडे, टाळू वरती पसरतात. अशावेळी डॉक्टरांना दाखवून योग्य वेळेस इलाज केल्यास हे फंगल इन्फेक्शन लवकर बरे होण्यास मदत होते .याच बरोबर *चांगले मौखिक आरोग्य*(Maintaining Good Oral Health) राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे .चांगले मौखिक आरोग्य कसे राखावे याकरिता आपण आपल्या *डेंटिस्ट* चे मार्गदर्शन घेऊ शकता.

*म्युकॉरमायकॉसिस* हेसुद्धा एक प्रकारचे अपॉर्च्युनिस्टिक फंगल इन्फेक्शन आहे.
यामध्ये दात व हिरड्या दुखणे ,जबड्यांना यांना सूज येणे विशेषतः वरच्या जबड्याला ,ओठाला बधिरपणा येणे, टाळू वरती जखम होणे, जबड्यात असह्य अशा वेदना होणे, डोकेदुखी अशी लक्षणे सुरुवातीला दिसू लागतात. कालांतराने हिरड्यांमध्ये पु भरून फोड येणे दात हलणे ही पण लक्षणे दिसू लागतात. वेळीच याचा इलाज डॉक्टरांकडून गोळ्या, औषधे ,इंजेक्शन घेऊन करता येतो.
पण जर डॉक्टरांना दाखविण्यात दिरंगाई केली तर हे *फंगल इन्फेक्शन* दातांच्या भोवतालच्यातालच्या हाडामध्ये पसरून दात हलू लागतात .(जबड्याचा सी.बी. सि.टी.स्कॅन /CBCT केल्यास कमी कालावधीत जबड्याच्या हाडाची खूप जास्त झीज झालेली आढळून आलेली आहे)
पर्यायाने दात काढून त्याच्या सभोवतालचे सडलेली हाड सुद्धा ऑपरेशन करून काढावे लागते. तसे केल्याने त्या फंगल इन्फेक्शन चा स्प्रेड (Spread) पुढे थांबतो.

▶️ *याची बाधा होण्यापासून कसे वाचू शकाल?*

1) मौखिक आरोग्य ( Good Oral Health) चांगले राखणे.
2) आपली प्रतिकारशक्ती वाढविणे
3) सकस व संतुलित आहार घेणे
4) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे
5) डायबिटीस ची पथ्ये पाळणे
6) कोमट पाणी मिठाच्या गुळण्या करणे 7) विटामिन- सी (Vit -C)च्या गोळ्या घेणे
8) डेन्टिस्ट चा सल्ला वेळोवेळी घेणे.

जर तुम्ही कोरोनातून नुकतेच बरे झाला असाल आणि हिरड्या व दात दुखी थोडी फार जरी जाणवत असेल तर *डेंटिस्टकडे* जाऊन योग्य तो औषधोपचार करावा. जेणेकरून हे फंगल इन्फेक्शन लगेचच आटोक्यात आणता येईल व पुढचा धोका टाळता येईल.
प्रामुख्याने एवढेच सांगावेसे वाटते की आपले मुख हे शरिराचे प्रवेशद्वार असल्याने मौखिक आरोग्य चांगले राखुन आपले शरीर निरोगी राहण्यास चांगलीच मदत होते. असे म्हणतातच ना,

*ओरल हेल्थ इज अ मिरर टु जनरल हेल्थ*.

डॉ. सत्यजित सत्यवान वाघचवरे
डॉ. शुभांगी सत्यजित वाघचवरे
(सीनिअर डेंटल सर्जन)
डॉ. सचिन डोंगरे, क्लिनिकल असोसिएट, वाघचवरे डेंटल क्लिनिक ,सोलापूर.
0217/2341312

Address

Shop No. 4&5, Shivganga Nagar, Complex 3, Near Govindshree Mangal Karyalaya
Jule Solapur
413004

Opening Hours

Monday 9am - 2pm
5pm - 8pm
Tuesday 9am - 2pm
5pm - 8pm
Wednesday 9am - 2pm
5pm - 8pm
Thursday 9am - 2pm
5pm - 8pm
Friday 9am - 2pm
5pm - 8pm
Saturday 9am - 2pm
5pm - 8pm

Telephone

+919423326300

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Waghchavare Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category