।। Shree Shraddha Ayurved ।।

।। Shree Shraddha Ayurved ।। We provide Pure Ayurvedic medicines & Panchakarma Treatments to all kinds of Diseases. Specially tre

1st consultation 100 ₹
Follow up 50 ₹

Ayurveda Medicines cost extra (500 to 1000 ₹ for 15 days)

Panchakarma Treatments costs 500 to 1500 per day (as per Treatments)

🇮🇳 🌸 सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा ! 🌸 🇮🇳
15/08/2026

🇮🇳 🌸 सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा ! 🌸 🇮🇳

ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्यांना वाढदिवसानिमित्त निरोगी आयुष्याच्या आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा ! 🎂💐खालील लेख खास तुमच...
06/08/2026

ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्यांना वाढदिवसानिमित्त निरोगी आयुष्याच्या आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा ! 🎂💐

खालील लेख खास तुमच्यासाठी... जरूर वाचा⤵️

ऑगस्ट महिन्यात जन्म असणाऱ्या लोकांची आयुर्वेद शास्त्रानुसार जन्मप्रकृती कशी असते❓
वाचा भाग 1 मध्ये ⤵️
https://www.facebook.com/share/p/1JDtC1Pjwp/

त्यांची
शारीरिक मानसिक वैशिष्ट्ये व निरोगी राहण्यासाठी घ्यावयाची आहार व इतर गोष्टींची काळजी...
वाचा भाग 2 मध्ये ⤵️
https://www.facebook.com/share/p/181NjNxw9j/

माहिती आवडल्यास पोस्ट ला Like व पेज ला Follow व Share जरूर करा. 👍

06/08/2026

🎂 भाग 2️⃣ - #ऑगस्ट_महिन्यात_जन्मलेल्या_व्यक्तींची_शारीरिक_व_मानसिक_वैशिष्ट्ये 🌿

मागील भागात आपण समजून घेतले...

👉 ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची गर्भधारणा साधारण कोणत्या काळात झालेली असू शकते❓
👉 त्या वेळी कोणता ऋतू होता❓
👉 आयुर्वेदानुसार गर्भधारणेचा काळ आणि जन्मप्रकृती यांचा संबंध कसा पाहिला जातो❓

आता पाहूया...

ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तींमध्ये कोणती शारीरिक व मानसिक वैशिष्ट्ये आढळू शकतात❓

(ही सर्वसाधारण माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही आई-वडिलांची प्रकृती, गर्भावस्थेतील परिस्थिती, आहार-विहार आणि जीवनशैली यावर अवलंबून असते.)

---

🧍🏻‍♂️ #शरीरयष्टी_आणि_ताकद -

हिवाळ्याच्या काळातील गर्भधारणेमुळे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अशा व्यक्तींमध्ये धातुबल चांगले असण्याची प्रवृत्ती दिसून येऊ शकते.

सामान्यतः...

✅ शरीरयष्टी मध्यम व सुसंघटित असू शकते.
✅ हाडे व स्नायूंची बांधणी चांगली असू शकते.
✅ शरीराची सहनशक्ती चांगली असण्याची शक्यता असते.

अशा व्यक्तींना लहानसहान त्रास पटकन होत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामध्ये आरोग्याबद्दल आत्मविश्वास अधिक असू शकतो.

पण लक्षात ठेवा...

#निरोगी_दिसणारे_शरीर_म्हणजे_भविष्यात_आजार_होणारच_नाहीत_असे_नाही❗

शरीराची क्षमता टिकवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैली आवश्यक असते.

---

✨ #त्वचा_केस_आणि_डोळे

🌿 त्वचा -

सामान्यतः त्वचा निरोगी, स्निग्ध आणि तेजस्वी असण्याची प्रवृत्ती दिसू शकते.

मात्र अंगावर मेद, चरबी, वजन वाढले किंवा घाम जास्त येत असेल तर काही व्यक्तींमध्ये त्वचेच्या तक्रारी किंवा फंगल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो.

---

🙆🏻‍♀️ केस -

केस मजबूत आणि चांगल्या गुणवत्तेचे असण्याची शक्यता असते.

मात्र शरीरातील उष्णता वाढणे, चुकीचा आहार, अपुरी झोप आणि मानसिक ताण यामुळे केस गळणे किंवा अकाली पांढरे होणे यासारख्या तक्रारी होऊ शकतात.

---

👁️ डोळे -

डोळ्यांमध्ये चांगले तेज आणि ओलावा असण्याची प्रवृत्ती दिसू शकते.

परंतु आजच्या काळातील मोबाइल, स्क्रीन टाइम आणि चुकीची जीवनशैली यामुळे डोळ्यांच्या समस्या कोणत्याही व्यक्तींमध्ये वाढताना दिसतात.

---

🍽️ #भूक_आणि_पचनशक्ती -

अशा व्यक्तींमध्ये सामान्यतः...

✅ भूक चांगली असणे
✅ खाल्लेले अन्न व्यवस्थित पचणे
✅ शरीराला पोषण चांगले मिळणे

अशी प्रवृत्ती दिसू शकते.

परंतु...

#चांगली_भूक_ही_शरीराची_ताकद_आहे_मात्र_गरजेपेक्षा_जास्त_खाणे_हे_शरीरासाठी_ओझे_बनू_शकते.

गोड, तेलकट, मैद्याचे पदार्थ, वारंवार बाहेरचे खाणे आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

---

😇 ि_स्वभाव -

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कफप्रधान प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये काही वेळा...

✅ शांत स्वभाव
✅ संयम
✅ समाधानाची भावना
✅ स्थिर विचार करण्याची क्षमता

हे गुण दिसून येऊ शकतात.

मात्र याचसोबत...

⚠️ आरामाची सवय
⚠️ काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती
⚠️ आळशीपणा

हे दोष निर्माण झाले तर आरोग्य आणि प्रगती दोन्हींवर परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच या व्यक्तींनी स्वतःला सतत क्रियाशील ठेवणे आवश्यक आहे.

---

⚠️ #कोणत्या_आरोग्यविषयक_गोष्टींची_काळजी_घ्यावी❓*

🤧 सर्दी, खोकला -

कफ वाढण्याची प्रवृत्ती असल्यास काही व्यक्तींना...

- सर्दी
- कोंदटपणा
- कफ
- खोकला

यासारख्या तक्रारी होऊ शकतात.

यासाठी योग्य प्रमाणात...

🌿 सुंठ / आले
🌿 मध
🌿 हळद
🌿 तुळस
🌿 गरम पाणी

यांचा उपयोग होऊ शकतो.

---

⚖️ ाढणे_आणि_जीवनशैलीचे_आजार -

चांगली भूक, कमी हालचाल आणि कॅलरीयुक्त आहार यामुळे काही व्यक्तींमध्ये...

- वजन वाढणे
- पोटावर चरबी वाढणे
- मधुमेह
- रक्तदाब
- कोलेस्टेरॉल
- हृदयविकार

यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते.

म्हणून...

"माझी प्रकृती चांगली आहे, मला काही होणार नाही" हा आत्मविश्वास चांगला आहे; पण त्यातून निष्काळजीपणा निर्माण होऊ नये.

---

🚫 #तरुणपणातील_सवयींचा_परिणाम_पुढील_आयुष्यावर...

अनेक वेळा तरुणपणी शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळे काही चुकीच्या सवयींचे परिणाम लगेच जाणवत नाहीत.

मग मनात एक #चुकीचा_समज निर्माण होतो...

" #माझ्या_शरीराला_काही_होत_नाही."

परंतु शरीराची ही सहन करण्याची क्षमता कायमस्वरूपी नसते.

तरुणपणात वारंवार केलेल्या...

🚫 दारूचे सेवन
🚫 सिगारेट किंवा तंबाखूचे व्यसन
🚫 अनियमित आहार
🚫 अपुरी झोप
🚫 चुकीची जीवनशैली

यांचा परिणाम हळूहळू शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर होत राहतो.

वय वाढल्यानंतर याच सवयी...

⚠️ यकृताचे आजार
⚠️ हृदयविकार
⚠️ रक्तदाब
⚠️ मधुमेह
⚠️ पचनसंस्थेच्या समस्या

यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

काही गंभीर परिस्थितींमध्ये या सवयी आयुष्याची गुणवत्ता कमी करण्यास तसेच अकाली मृत्यूचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

म्हणूनच...

तरुणपणी मिळालेली चांगली प्रकृती ही व्यसन करण्यासाठी नसून, निरोगी दीर्घ आयुष्याची पायाभरणी करण्यासाठी मिळालेली निसर्गाची देणगी आहे.

---

🥗 #योग्य_आहार_आणि_दिनचर्या -

कफ वाढू नये आणि शरीर संतुलित राहावे यासाठी...

✅ ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे.
✅ ऋतूनुसार आहार घ्यावा.
✅ जास्त गोड, तेलकट, मैद्याचे व प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करावेत.
✅ रात्री उशिरा व जड आहार टाळावा.

---

💪 #नियमित_व्यायाम_आरोग्याची_गुरुकिल्ली*

या प्रकृतीच्या व्यक्तींनी व्यायामाला जीवनाचा भाग बनवावे.

योग्य प्रकारे...

🧘🏻 योगासने
🌞 सूर्यनमस्कार
🚶🏻 चालणे
💪 व्यायाम

यामुळे शरीरातील अतिरिक्त कफ आणि चरबी नियंत्रित राहण्यास मदत होते.

---

🎯 #अंतिम_संदेश...

निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी रचना आणि क्षमता दिलेली असते.

पण केवळ चांगली प्रकृती मिळणे पुरेसे नाही...

त्या प्रकृतीला समजून घेऊन योग्य आहार, योग्य दिनचर्या आणि योग्य विचारसरणी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

आयुर्वेदाचा मुख्य संदेश आहे...

🌿 "स्वस्थ व्यक्तीचे आरोग्य टिकवणे आणि आजार येण्यापासून बचाव करणे हेच खरे आरोग्यसंरक्षण आहे."

आपली जन्मप्रकृती, आहार-विहार आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच उपयुक्त ठरते.

आपल्या आरोग्याच्या प्रत्येक टप्प्यावर...

आपला
डॉ. उदय पाटील
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'
सातारा व कोरेगाव

📲 88884 98732, 082087 13119

🌿 आयुर्वेदिक आरोग्यविषयक माहिती नियमित मिळवण्यासाठी WhatsApp वर "आयुर्वेद फॅमिली मध्ये ऍड करा" असा संदेश जरूर पाठवा.

व #हा_आरोग्यदायी_शुभेच्छासंदेश_आपल्या_ऑगस्ट_मध्ये_जन्म_असलेल्या_इतर_मित्र_परिवाराला_देखील_जरूर_फॉरवर्ड करा. 👍

।। Shree Shraddha Ayurved ।।

06/08/2026

🎂 #ऑगस्ट_महिन्यात_वाढदिवस_असणाऱ्यांसाठी_माहितीपूर्ण_शुभेच्छा_संदेश❗ 💐*

सर्वप्रथम...

डॉ.उदय पाटील
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'👨🏻‍⚕️
📲 88884 98732

यांच्याकडून तुम्हाला वाढदिवसानिमित्त...

🌿 निरोगी, आनंदी, दीर्घायुषी आणि मंगलमय जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा❗ 🎂💐

---

👉 ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये काही #खास_शारीरिक_व_मानसिक_वैशिष्ट्ये आढळू शकतात... ती कोणती, हे जाणून घ्यायला आवडेल का❓

सर्वप्रथम एक रंजक गोष्ट समजून घेऊया...

जर तुमचा #जन्म ऑगस्ट महिन्यात झाला असेल, तर साधारणपणे तुमची #गर्भधारणा मागील वर्षी ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबर महिन्याच्या आसपास झालेली असण्याची शक्यता असते.

म्हणजेच तुमच्या आईच्या गर्भात तुमच्या जीवनाची सुरुवात होत असताना बाहेरील निसर्ग हिवाळ्याच्या प्रारंभाच्या काळात होता. ❄️🌿

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून गर्भधारणेच्या वेळचा ऋतू, वातावरण, आईचा आहार-विहार आणि गर्भावस्थेतील काळजी यांचा गर्भाच्या शरीर व मनाच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो.

म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत...

ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तींमध्ये हिवाळ्यातील गर्भधारणेच्या काळाशी संबंधित कोणती शारीरिक व मानसिक वैशिष्ट्ये आढळू शकतात.

(ही माहिती सर्वांना तंतोतंत लागू होईलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही अनेक घटकांवर अवलंबून असते.)

---

🎂 #वाढदिवस_म्हणजे_फक्त_एक_दिवस_नाही...

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि आठवणींचा विशेष दिवस असतो.

याच दिवशी आपण या जगात आलो असे आपण म्हणतो...

पण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या जीवनाची सुरुवात जन्माच्या दिवशी नसून, त्याआधी आईच्या गर्भात झालेली असते.

साधारणपणे गर्भधारणा झाल्यापासून ३८ ते ४० आठवड्यांनंतर बाळाचा जन्म होतो.

म्हणूनच आपल्या शरीराची आणि मनाची जडणघडण ही जन्माआधीच सुरू झालेली असते.

---

🥳 " " खरे कधी ठरतात❓

वाढदिवस, केक आणि पार्टीचा आनंद प्रत्येकालाच असतो...

पण या शुभेच्छा खऱ्या अर्थाने सार्थकी लागण्यासाठी आपले शरीर निरोगी आणि मन प्रसन्न असणे आवश्यक आहे.

कारण आयुष्यातील प्रत्येक आनंद अनुभवण्यासाठी निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे.

आयुर्वेद आपल्याला सांगतो...

"स्वतःचे शरीर, मन आणि प्रकृती समजून घेणे हे निरोगी जीवनाचे पहिले पाऊल आहे."

---

🤔 #जन्मप्रकृती_म्हणजे_काय❓

आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट जन्मप्रकृती असते.

ही प्रकृती गर्भधारणा होत असतानाच अनेक घटकांच्या प्रभावाने तयार होते.

यामध्ये...

✅ आई-वडिलांचे स्त्री-पुरुष बीज
✅ गर्भाशयाची अवस्था
✅ गर्भधारणेच्या वेळचा ऋतू
✅ आईचा आहार-विहार
या सर्वांमध्ये वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांची स्थिती

या सर्वांचा समावेश होतो.

(संदर्भ : अष्टांगहृदय, शारीरस्थान ३/८२)

---

🤰🏻 #गर्भावस्थेतील_सुरुवातीचे_दोन_महिने_का_महत्त्वाचे❓

आयुर्वेदानुसार गर्भाच्या सुरुवातीच्या विकासामध्ये रस आणि रक्तधातूची निर्मिती महत्त्वाची मानली जाते.

हेच पुढे शरीराच्या पोषणाचा आधार बनतात.

आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये देखील गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात Organogenesis (अवयव निर्मितीची प्रक्रिया) सुरू होते असे सांगितले आहे.

म्हणूनच गर्भधारणेचा सुरुवातीचा काळ हा बाळाच्या शारीरिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

---

❄️ #हिवाळा_आणि_गर्भधारणा — आयुर्वेदिक दृष्टिकोन

आयुर्वेदानुसार हेमंत ऋतू हा शरीरबल वाढवणारा काळ मानला जातो.

या काळात... विशेषतः गर्भधारणा झालेल्या मातेची

✅ पचनशक्ती तुलनेने चांगली असते.
✅ योग्य आहार घेतल्यास गर्भिणी व गर्भ दोघांच्या शरीराचे पोषण चांगले होऊ शकते.
✅ वातावरणातील बदलांचा दोघांच्याही शरीरावर विशिष्ट परिणाम होतो.

त्यामुळे हिवाळ्याच्या काळात गर्भकाळ असलेल्या काही व्यक्तींमध्ये चांगले धातुबल आणि शरीराची सहनशक्ती दिसून येऊ शकते.

मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी, इतर बाबींवर देखील अवलंबून असल्याने याचा अंतिम निर्णय केवळ जन्ममहिन्यावरून घेता येत नाही.

---

आता प्रश्न उरतो...

- ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तींची शरीरयष्टी कशी असू शकते❓
- त्यांची त्वचा, केस, डोळे आणि पचनशक्तीमध्ये कोणती वैशिष्ट्ये दिसू शकतात❓
- त्यांचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि मानसिक प्रवृत्ती कशी असू शकते❓
- आणि या व्यक्तींनी भविष्यात कोणत्या आरोग्यविषयक गोष्टींची काळजी घ्यावी❓

🌿 #हे_सर्व_जाणून_घेण्यासाठी_पुढील_भाग_नक्की_वाचा... 👍

कारण आपली प्रकृती समजून घेणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची पहिली पायरी आहे. 🌿

काय मग... कसा वाटला हा 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' कडून खास तुमच्यासाठी बनवलेला वाढदिवसानिमित्तचा शुभेच्छा संदेश❓

Like - Comment - Follow & Share देखील जरूर करा.

अशीच आरोग्यदायी माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी "आयुर्वेद फॅमिलीत ऍड करा." असा व्हाट्सअप्प मेसेज करा आमच्या 📲 082087 13119 या नं ला.
धन्यवाद 🙏🏻

डॉ.उदय पाटील
।। Shree Shraddha Ayurved ।।

31/07/2026

रिझल्टपेक्षा आजाराचे निदान महत्त्वाचे...
एक वैशिष्ट्यपूर्ण केस AVN ची❗

- डॉ.उदय पाटील
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'
फोन - 88884 98732

आयुर्वेदात एक महत्त्वाचे तत्त्व सांगितले आहे – "योग्य निदान झाले, तर आजार मुळापासून बरा करण्यासाठी योग्य उपचाराची दिशा आपोआप मिळते."

याचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण...

३५ वर्षांचा एक तरुण रुग्ण माझ्याकडे आला. मुख्य तक्रार –
👉 उजव्या खुब्यातील तीव्र वेदना,
👉 उजव्या गुडघ्यामध्ये उठता-बसताना वेदना आणि
👉 सोबत उजवाच खांदा दुखणे.

त्याचा वैद्यकीय इतिहास पाहिला तर –

- २०१७ – Guillain-Barré Syndrome (GBS)
- २०२२ – उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया
- २०२४ – Neurocysticercosis मुळे मणक्याची शस्त्रक्रिया
- २०२६ – उजव्या खुब्याचा Avascular Necrosis (AVN)

MRI, X-ray आणि इतर तपासण्यांमधून AVN चे निदान झाले आहे. आधुनिक उपचार (पेनकिलर, सप्लिमेंट्स) सुरू आहेत पण AVN सारख्या आजारात फक्त पेनकिलर व सप्लिमेंट नी अपेक्षित रिझल्ट्स मिळत नसल्याने अनेक पेशंट्स मध्ये काही दिवसांनी त्रास वाढल्यास ऑपरेशन ची गरज पडू शकते हे डॉक्टरांनी या पेशंटला आधीच सांगून ठेवले आहे.

गेल्या 4 वर्षात 2 ऑपरेशन्स व सतत औषधे चालू असताना आणखीन एक ऑपरेशन❗नक्कीच ही विचार करण्याची गोष्ट आहे...

परंतु माझ्यासमोर प्रश्न वेगळा होता...

हे सगळे आजार या व्यक्तीलाच का झालेत❓

🌸 हेच आयुर्वेदिक उपचारांचे वैशिष्ट्य आहे - आजाराचे सखोल सविस्तर निदान... 🌸

मी केवळ MRI किंवा X-ray पाहत नाही; तर रुग्णाची जन्मप्रकृती, आहार-विहार, मानसिक स्वभाव, व्यसने, दोषांची स्थिती, शरीरातील झीज होण्याची प्रवृत्ती आणि आजाराचा संपूर्ण प्रवास यांचा एकत्रित विचार करतो.

या रुग्णामध्ये काही गोष्टी विशेष लक्षात आल्या...

✴️ शरीराच्या उजव्या बाजूची अधिक लक्षणे - योग शास्त्रानुसार उजवी बाजू पिंगला नाडी (सूर्य नाडी), उष्णतेचे प्राबल्य दाखवणारी
✴️ जन्मप्रकृती उष्ण - (वात-पित्त प्रधान) जन्म 20 सप्टेंबरचा म्हणजे गर्भधारणा डिसेंबर-जानेवारीची, पुढे 4 महिने उन्हाळा.
✴️ शरीरातील हाडे, स्नायू, सांधे इ. महत्वाच्या ऊतकांची झीज - वात-पित्त दोष वाढल्याचे परिणाम
✴️ मसालेदार पदार्थांनी पित्त वाढणे, जळजळ, तोंड येणे, इ. वात-पित्त दुष्टी लक्षणे
✴️ पूर्वी झालेला नागीण (Herpes) - रक्तात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम
✴️ रागीट, शिस्तप्रिय व तडक स्वभाव.
✴️ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज ८–१० सिगारेटचे 🚬 व्यसन (धूम्रपान) - अत्यधिक उष्णता व कोरडेपणा वाढवणारे, धातूंची झीज करणारे

या सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यानंतर माझ्या आयुर्वेदिक चिकित्सकीय दृष्टिकोनातून उपचाराची दिशा स्पष्ट झाली.

⚠️ माझ्यासाठी हा फक्त AVN नव्हता.

👉 तर शरीरात वाढलेल्या उष्णता व कोरडेपणाचा,
👉 बिघडलेल्या वात-पित्त दोषांचा,
👉 महत्वाच्या अवयवांच्या अपुऱ्या पोषणाचा आणि
👉 दीर्घकाळ चाललेल्या अपायकारक सवयींचा एकत्रित परिणाम म्हणून या रुग्णाकडे पाहण्याची गरज होती.

😅 लोकांना असे साधे सोप्पे सरळ निदान नको असते, तर आधुनिक भाषेत केलेले समजण्यास, बोलण्यास अवघड Diagnosis हवे असते, जसे की हे AVN (Avascular Necrosis). या नावावरून सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळेला काही समजत नसते आणि समजले तरी त्यामागे नक्की काय चुकतंय आणि उपचार कोणत्या दिशेने करायला पाहिजेत हे कळतं नसतं. 🤷🏻‍♂️

🤦🏻‍♂️ फक्त लक्षणे विशेषतः वेदना कमी झाल्या की रिझल्ट मिळाला अशा भोळ्या गैरसमजुतीत रहातात हे लोक, आजार आतमध्ये वाढत राहतो, शरीराला व खिशाला कात्री लावत राहतो❗

⛔ औषधांनी वेदना कमी करणे हा आयुर्वेदिक उपचारांचा उद्देशच नसतो❗🚫
कारण वेदना बंद करणे म्हणजे शरीराचे आजार बरा करण्याकडे दुर्लक्ष घडवून आणणे. आजार बरा झाला की शरीर स्वतःहून वेदना बंद करते.

✅ Pain is Demand❗
वेदना होताहेत म्हणून आपले व आपल्या शरीराचे बिघडलेल्या अवयवांकडे लक्ष जाते, जर आपण पेनकिलर, स्टिरॉइड्स खाल्ले तर वेदना, सूज कमी होणार... पण सोबत शरीर त्या अवयवाकडे, आजाराकडे दुर्लक्ष देखील करणार... मग तो बरा कसा होईल❓ 🤔 सांगा... 🤷🏻‍♂️

📢 मी नेहमी पेशंट्स ना सांगतो...
पेनकिलर कधी खायची❓
👉 तर वेदना सहन होण्याच्या पलीकडे गेली तरच... शक्यतो टाळलेलीच बरी...❗

त्यामुळे उपचार केवळ वेदना कमी करण्यापुरते न ठेवता पुढील गोष्टींवर भर देण्यात आला—

✅ सर्वात महत्वाचे सिगारेट इ. व्यसने पूर्णपणे बंद करणे 🚭
✅ योग्य पथ्य - आहाराचे, अगदी पाणी पिण्याचे देखील.
✅ आयुर्वेदिक औषधे - वात-पित्त दोष कमी करणारे, झीज भरून काढणारे
✅ गरजेनुसार पंचकर्म (विशेषतः बस्ती)
✅ योग, जीवनशैलीतील बदल आणि मानसिक संतुलन

अर्थात, अशा क्लिष्ट आजारांमध्ये योग्य निदानाइतकेच रुग्णाचे सहकार्यही 🤝 महत्त्वाचे असते. औषधे, पंचकर्म, पथ्य आणि व्यसनमुक्ती यांचे सातत्य राखल्याशिवाय अपेक्षित परिणाम मिळणे कठीण असते.

⚠️ आणि असे क्लिष्ट, जुनाट आजार पूर्ण बरे होण्यासाठी बराच वेळ घेतात, त्यामुळे उपचार देखील दीर्घकाळ घेण्याची पेशंट व घरच्यांची मानसिकता हवी.

🎯 उपचारांचा रिझल्ट म्हणजे नक्की असतं तरी काय❓
रिझल्ट हा उपचारांचा शेवटचा टप्पा असतो; पण योग्य निदान हा त्या रिझल्टचा पाया असतो.

या पेशंटने नित्यनियमाने उपचार घेतले, पथ्यापथ्य पाळले तर आत्ताचा हा AVN आजार तर बरा होईलच... पण उजव्या सोबत पुढे डाव्या बाजूला AVN किंवा शरीरातील इतर हाडे, सांधे किंवा इतर अवयवांना होणारे आजार देखील टाळता येणं शक्य होईल.
ऑपरेशन हा फक्त त्या सांध्यापुरता इलाज आहे, संपूर्ण शरीरासाठी नाही.

🌺 "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार❗"
- सद्गुरु 🙏🏻 🌺

काही शंका, प्रश्न किंवा सूचना असल्यास जरूर मेसेज किंवा कमेंट करून विचारा.

तुमच्या परिचयात कोणाला AVN किंवा अन्य कोणताही क्लिष्ट आजार असल्यास सविस्तर आयुर्वेदिक उपचार मार्गदर्शन साठी जरूर संपर्क साधा -

'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'
डॉ.उदय पाटील
कोरेगाव व सातारा
फोन - 88884 98732
& 082087 13119

।। Shree Shraddha Ayurved ।।

(फोनवरून ऑनलाइन कन्सलटेशन देखील उपलब्ध.)

धन्यवाद 🙏🏻

20/07/2026

"मूळव्याधीच्या आजाराला मुळावरच उपचार पाहिजे...❗"
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' ची उपयुक्तता बघा... या केस वरून...

लेखक - डॉ.उदय पाटील
#आयुर्वेदिक_फॅमिली_डॉक्टर
📲 - 88884 98732

परवा च 1 पेशंट आलेला #मूळव्याध च्या त्रासावर उपचार घेण्यासाठी... संडासच्या जागेची आग होणे व रक्त पडणेचा त्रास, सोबत #बद्धकोष्ठता आहेच.

काही महिन्यांपूर्वी डिसेंबर 2025 मध्ये देखील 2 महिने त्रास होत होता... अनेक उपचार केले, शेवटी गावठी औषधे घेऊन त्रास थांबलेला... जो आता पुन्हा 4 - 5 दिवसांपासून चालू झाला आहे❗🙆🏻‍♂️

7 - 8 वर्षांपूर्वी देखील त्यांना सेम त्रास झालेला, तेंव्हा साताऱ्यातील मूळव्याध स्पेशालिस्ट कडे उपचार घेतलेले बरेच दिवस...

बऱ्याच वेळेला मूळव्याधीवर उपचार करताना डॉक्टर किंवा गावठी वैदू देखील पोट साफ करण्यासाठी पातळ औषध किंवा चूर्ण देतात, कोंब सुकण्यासाठी गोळ्या, इंजेक्शन, रक्तस्राव थांबवणाऱ्या गोळ्या इ देतात. त्याने बद्धकोष्ठता कमी होऊन, सूज रक्तस्राव कमी होऊन तात्पुरता आराम मिळतो, पण आजाराचे मूळ बरे होत नाही❗ #ऑपरेशन करून देखील पुन्हा मूळव्याधीचा त्रास होताना अनेक पेशंट्स चा अनुभव आहे.

#मूळव्याधीच्या_त्रासाचं_मूळ_समजून_घेतलं_नाही_की_हे_असं_होतं... औषध घेतले की त्रास कमी होतो, पुन्हा काही दिवसांनी परत चालू होतो...

आता मूळ कसं शोधायचं हे बघुयात याच केसवरून...

#जन्मप्रकृतीनिदान -

#जन्मतारीख - 11 ऑक्टोबर
म्हणजे आईच्या पोटात #गर्भधारणा 9 महिने मागे जानेवारी महिन्यात... हिवाळा संपून पुढे फेब्रुवारी पासून मे, जून पर्यंत 4 - 5 महिने उन्हाळा... त्यामुळे ढोबळ मानाने #उष्ण #वातपित्तप्रधान जन्मप्रकृती
म्हणजेच या पेशंटचे शरीर मुळचेच उष्ण - वात व पित्त दोष जास्त प्रमाणात असलेले, म्हणजेच या व्यक्तीने उष्णता वाढेल असे कोणतेही अपथ्य (खाणे-पिणे, जागरणे, काम, व्यसने इ.) केले की त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उष्णतेचा आजार होण्याची शक्यता जास्त.
याचप्रकारे या पेशंटची शरीरयष्टी, अंगकाठी बारीक होती.

#केसहिस्ट्री घेताना या पेशंटकडून समजले की... वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे आई बरोबर आजोळी येऊन गरिबीत दिवस काढावे लागले, आधीच उष्ण प्रकृती त्यात #मानसिकताण, खायला अन्न वेळेवर मिळत नव्हते, त्यातूनच
- 6 वी त असताना #मुडदूस सारखा आजार झाला, पोट फुगले, #लिव्हर चे दुखणे सांगितलेले डॉक्टरांनी काहीतरी, त्यावेळी आयुर्वेदिक उपचारांनीच बरे झालेले...
- 10 वी नंतर शाळा सोडून MIDC त नोकरी पकडली, सतत 10 - 12 वर्ष ड्युटी + #ओव्हरटाईम 14 तास रोज जागरण, कष्ट करून जिद्दीने पैसे कमवून लग्न, घर इ केले.
- त्यातच 2005 साली अर्दीत म्हणजेच #चेहऱ्याला_लकवा मारणे चा त्रास झाला. कदाचित मानसिक ताण व अतिरेकी कष्ट घेतल्याचा परिणाम❗
- 2019-20 कोविड दरम्यान प्रथम मूळव्याधीचा त्रास झाला, त्यावेळी डॉक्टरांनी पोट साफ होण्यासाठी व इतर औषधांनी तो त्रास कमी केला.
- पुन्हा 2024 मध्ये #अचानक_एका_डोळ्याने_दिसायचे_बंद झाले, कदाचित मेंदूकडून डोळ्याला येणाऱ्या #रक्तवाहिनीत_अडथळा आला असेल असे डॉक्टरांचे निदान होते, त्यामुळे तेंव्हापासून डॉक्टरांनी रक्त पातळ करण्याची 1 गोळी चालू केली आहे.

पेशंट ला वाटत होते की ते एकच #रक्त_पातळ_करण्याचे_औषध आहे, पण मी ती गोळी बघितल्यावर लक्षात आले की त्या #एका_गोळीत_3_प्रकारची_औषधे आहेत - रक्तात गुठळी होणे थांबवण्यासाठी Clopidogrel व Aspirin अशी 2 व कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी Atorovastatin.

मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या पेशंटच्या बाबतीत रक्तस्त्राव होत असताना असे स्ट्रॉंग औषध घेणे त्रास वाढवणारे ठरू शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

- तसेच या पेशंट ला अनेक दिवसांपासून उजव्या तळपायाला #कुरूप ( ) आहे व त्यावर 15 दिवसांपूर्वी त्यांनी सर्जन कडून ऑपरेशन करून ते कुरूप काढून घेतले होते. ती जखम देखील अजून नीट भरली नव्हती. कुरूप हा आजार देखील पुन्हा-पुन्हा होणारा आजार आहे.
- त्यासाठी दिलेल्या औषधांनी पेशंटचे पोट बिघडू लागले आहे, अपचन, गॅसेस होणे, पोट पूर्ण साफ न वाटणे, भसरट पातळ मलप्रवृत्ती होणे.

या #पेशंटचा_आहार बघितला तर पूर्वी कोरा चहा प्यायचे पण सध्या बंद केला आहे. त्याजागी सध्या 1 कप दूध, सोबत 1 अंड व चपाती भाजी असा पोटभर पण पचायला जड, आयुर्वेदानुसार दूध + अंड असा #विरुद्धाहार घेत आहेत. नंतर दुपारचे जेवण वेळेत 12 वाजता, संध्याकाळी 5 वाजता वडापाव, मिसळ असा कंपनीत मिळणारा नाश्ता व रात्री 9 वाजता घरी जेवण.

व्यसनांमध्ये #तंबाखू दिवसातून 7 ते 8 वेळेला, बियर क्वचित कधीतरी.

#स्वभाव रागीट... पण शिस्तप्रिय, सर्व गोष्टी जागच्या जागी हव्या असणारा, लहानपणापासून गरिबी, काबाडकष्ट, नातेवाईकांकडून झालेला अपमान इ. चा मानसिक ताण,

या सर्व माहितीवरून लक्षात आले असेल च की...
मूळची उष्ण (वात-पित्त प्रधान) प्रकृती असलेल्या रुग्णामध्ये लहानपणापासून खाण्या-पिण्याची आबाळ, ओव्हरटाईम करून घेतलेले कष्ट, त्यातच मानसिक ताण, चुकीचे खाणे-पिणे, विरुद्धाहार, तंबाखू चे व्यसन इ सर्व कारणे ही त्या पेशंट मध्ये उष्णता, वात-पित्त दोष वाढवून बद्धकोष्ठता, मूळव्याध, रक्तवाहिनीमध्ये अडथळा येऊन चेहऱ्याचा पॅरालिसिस, व पायाला झालेले कुरूप या सर्वांसाठी कारणीभूत आहे.

या प्रत्येकाला फक्त लक्षण रुपात बरे करून किंवा सतत रक्त पातळ करणारी गोळी चालू ठेवून उपयोग होणार नाही, उलट ही औषधे या पेशंटच्या पोटावर पचनक्रियेवर दुष्परिणाम करून आणखीन आजार निर्माण करणार व आहे ते आजार देखील वाढवणारच...❗

" #झाड_मुळापासून_काढायचे_असेल_तर_मुळाला_हात_घालावा_लागतो❗"
त्याचप्रमाणे...
या सर्व आजारातून बाहेर पडायचे असेल तर या सर्वांचे जे मूळ आहे उष्णता (वाढलेले वात व पित्त दोष) त्याला नियंत्रणात आणले पाहिजे.

" #सौ_सुनार_की_एक_लोहार_की❗" सारखं प्रत्येक तक्रारीला वेगवेगळी शंभर औषधे घेण्यापेक्षा एकच आयुर्वेदिक निदान व त्यानुसार केलेले उपचारच योग्य ठरणार आहेत❗

बघा तुम्हाला पटतंय का हे...❓

पेशंटला हे मी सर्व समजावून सांगितले आहेच, सोबत उष्णता कमी करणारी औषधे दिली आहेतच.
पण सांगितलेले उष्णता नियंत्रणात ठेवणारे पथ्य पेशंटने पाळले तरच त्याला या व इतर अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल.
या पेशंटला माझे 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' चे मार्गदर्शन पटले आहे.

तुम्हाला किंवा तुमच्या माहितीत कोणाला मूळव्याध किंवा इतर कोणताही आजार असेल व त्या आजाराचे मूळ सविस्तर व सोप्प्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर जरूर संपर्क करा -

- डॉ.उदय पाटील
'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर'
सातारा व कोरेगाव
फोन - 📲 88884 98732
& 082087 13119

कोणाला काही शंका, प्रश्न किंवा सूचना असतील तर जरूर कमेंट मध्ये लिहा. 🙏

 #जुलै महिन्यात  #वाढदिवस 🎂 असणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण शुभेच्छा संदेश 💐माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे, कृपया वेळ काढून श...
10/07/2026

#जुलै महिन्यात #वाढदिवस 🎂 असणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण शुभेच्छा संदेश 💐
माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे, कृपया वेळ काढून शांत डोक्याने शेवटपर्यंत पूर्ण वाचा.🙏🏻

सर्वप्रथम
आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर 👨🏻‍⚕️
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
सातारा व कोरेगाव
(फोन - 88884 98732)
यांचेकडून तुम्हाला
वाढदिवसाच्या आरोग्यदायी, मंगलमय शुभेच्छा❗🎂 💐

तुम्हाला माहिती आहे का... जुलै महिन्यात जन्म असणाऱ्या लोकांना निसर्गतःच उत्तम रोगप्रतिकारक शक्ती व बऱ्याच आजारांपासून संरक्षण मिळालेले असते❗
कसे ते जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा...

वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्याचा महत्वाचा दिवस...🥳 कारण याच दिवशी आपण या जगात आलो... बरोबर❓❌
🚫 थांबा... खरंतर आपण या जगात याआधी 9 महिने (38 ते 40 आठवडे) पूर्वीच आपल्या आईच्या पोटात🤰🏻आलोय...✅ त्यामुळे ते आधी लक्षात घेतलं पाहिजे❗🎯

आता तुम्ही म्हणालं... एवढा कशाला त्याचा विचार करायचाय❓🤔
(शेवटपर्यंत वाचा... तुम्ही जरूर म्हणाल हे फार महत्वाचं आहे❗😃)

Birthday Celebration, केक 🎂 आणि पार्टी 🥳 तर आहेच... पण "Many Many Happy Returns of The Day" हवे असतील तर आपले आरोग्य उत्तम 💪🏻 राहिले पाहिजे... बरोबर ना❗

उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी आपण स्वतःला जाणलं पाहिजे, आपले शरीर व मन कसे तयार झाले आहे ते ओळखलं पाहिजे... आयुर्वेद शास्त्रात यालाच आपली जन्म-प्रकृती म्हणतात ‼️

प्रत्येकाची प्रकृती ही त्या व्यक्तीच्या आई-वडिलांचे स्त्री-पुरुष बीज, मातेचे गर्भाशय, गर्भधारणा होतानाच निसर्गातील ऋतू व मातेचा आहार-विहार यामध्ये असणाऱ्या वात-पित्त-कफ दोषांच्या स्थिती नुसार ठरत असते.
(आयुर्वेद ग्रंथ संदर्भ - अष्टांग हृदय शारीरस्थान 3/82)

आता यावरून सर्वसामान्य जनतेला आपली स्वतःची प्रकृती कोणती❓🤔 हे कसे समजणार❓
हे समजण्यासाठी 1 सोप्पी ट्रिक आहे.
👇
आईच्या पोटात असताना पहिल्या 2 महिन्यात कोणता ऋतू होता❓ हे बघून त्या व्यक्तीच्या #जन्मप्रकृती चा चांगला अंदाज बांधता येतो.
कसे❓ते सांगतो पुढे...

#आयुर्वेद शास्त्र पहिल्या 2 महिन्यात रस व रक्ताची 🩸 निर्मिती सांगते, जे आपल्या संपूर्ण शरीराचे पुढे आयुष्यभर पोषण करते व त्यात दोष आल्यास आपल्या शरीरात आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

आधुनिक शास्त्र देखील पहिल्या 2 महिन्यात अवयव निर्मिती सांगते. म्हणजेच आपला मूळ पाया (Base) या गर्भावस्थेच्या पहिल्या 2 महिन्यातच तयार होतो❗

🫵🏻 आता तुमचेच उदाहरण घेऊयात...
(जन्मतारीख खरी असावी, काही लोकांची सरकारी रेकॉर्ड मध्ये लावलेली खोटी असते, ती नसावी.)

जर तुमचा #जन्म जुलै महिन्यात झाला आहे म्हणजे तुमची #गर्भधारणा (भारतात महाराष्ट्रात) आईच्या पोटात 9 महिने मागे, ऑक्टोबर महिन्यात झाली असणार. बरोबर❓

ऑक्टोबर पासून पुढे 4 महिने #हिवाळा असतो.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम ऋतू म्हणजे हिवाळा. या काळात निसर्गात वातावरण आल्हादायक असते. पावसाळ्यानंतर निसर्गात पृथ्वी-जल-तेज-वायू-आकाश हे पंचमहाभूत समस्थितीत येत असतात.
आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीरात देखील या ऋतूमध्ये वात-पित्त-कफ या त्रिदोषांची समस्थिती दिसून येते, त्यामुळे या काळात गर्भधारणा झाल्यास गर्भाची वाढ उत्तम होते व त्यामध्ये दोष येण्याची शक्यता कमी राहते.
हिवाळ्यात भूक उत्तम व पचनशक्ती मजबूत रहात असल्याने गर्भिणी स्त्री ने घेतलेला पौष्टिक आहार गर्भाचे उत्तम पोषण करतो व एक सुदृढ, रोगप्रतिकारक्षम बाळ जन्माला येण्याची शक्यता वाढते.

हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे मात्र या व्यक्तींच्या शरीरात थोडं कफप्राधान्य असते.

यानुसार या लोकांची काही वैशिष्ट्ये सांगतो.... 🎯 बघा तुमच्याशी किती मॅच होताहेत...❗
(गर्भधारणे मध्ये ऋतू सोबत इतर गोष्टीही परिणाम करत असतात, त्यामुळे खालील माहिती सर्वांना 100% लागू पडणार नाही कदाचित, पण आजारपणे टाळण्यासाठी नक्कीच सर्वांच्या उपयोगी आहे... Trust me❗)

#जुलै_मध्ये_जन्म_असणाऱ्या_लोकांची_सामान्य_शरीर_वैशिष्ट्ये - 👇🏻

🕺🏻 #शरीरठेवण -
या लोकांची शरीरयष्टी ही मध्यम, सुसंघटित दिसते. लहान मुले 👶🏻 जन्माला आलेले नवजात बाळ देखील दिसायला सुदृढ दिसते.
हाडे, स्नायू बळकट असतात. उष्ण किंवा थंड दोन्ही वातावरणाचा यांच्या शरीरावर फारसा विपरीत परिणाम होत नाही, आजारांची शक्यता कमी राहते.

मात्र मूळचे कफप्राधान्य असल्याने पुढील काळात काही लोकांमध्ये जास्त आरामदायी जीवनशैली, वजन / चरबी वाढवणारे गोड, स्निग्ध पदार्थ वारंवार आहारात आल्यास स्थूलता, जाडी, देखील या लोकांमध्ये कॉमन होऊन जाते.

तसेच क्वचित काही व्यक्ती मात्र आईवडिलांकडून उष्णता आल्यास किंवा भूक मारणे, उपवास, चहा ☕ जास्त, निकृष्ट आहार घेतला गेल्याने तब्बेतीने बारीक राहिलेल्या पण दिसतात.

#त्वचा - ही नॉर्मल, स्निग्ध असते. शक्यतो त्वचेच्या तक्रारी नसतात.
जाडी जास्त वाढलेल्या लोकांना मात्र उन्हाळ्यात घाम जास्त येत येऊन फंगल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो.

👩🏻 #केस - यांचे केस मजबूत, काळे निरोगी असतात. फक्त शरीरात उष्णता वाढू देऊ नये याची काळजी घ्यावी, अन्यथा केस पिकणे, गळणे चा धोका वाढतो.

#डोळे - निरोगी, उत्तम दृष्टी असणारे स्निग्ध असतात.

#भूक -
जन्मापासूनच यांची पचनशक्ती उत्तम असते. त्यामुळे भूक चांगली असते व खाल्लेले अन्न देखील उत्तम पचते.
तसा तर यांना सर्व प्रकारचा आहार आवडतो व पचतो देखील. मात्र आवडता चहा पिणे जास्त झाल्यास भूक मंदावून पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात.

👩🏻 #महिलांमध्ये मासिक पाळीच्या विशेष काही तक्रारी नसतात. पण आईच्या मासिक पाळीमध्ये काही तक्रारी असल्यास त्यांचा परिणाम यांच्या मासिक पाळीवर दिसू शकतो, तसेच वजन चरबी वात-पित्त-कफ दोष वाढवणारा आहार, अबोर्शनस, कॉपर टी सारख्या गर्भनिरोधक साधनांचा वापर या कारणांनी देखील मासिक पाळीवर परिणाम दिसू शकतो.

😇 #मन, स्वभाव - या लोकांचे मन देखील शांत, निवांत, समाधानी राहणारे पण थोडे आळशी, सुखासीन प्रवृत्तीचे असते.

#स्वभावातील_आळस_हा_मोठा_शत्रू या लोकांसाठी ठरू शकतो.
कारण त्यामुळे नियमित व्यायाम घडत नाही व वजन वाढून आजारांना निमंत्रण मिळते.
कामे देखील पटापटा होत नाही, नोकरी व्यवसायात देखील हा आळस खूप बाधाकारक ठरताना दिसतो. 🤦🏻‍♂️

👉🏻 #संभावित_आजार -
सुरुवातीला सांगितले प्रमाणे या लोकांकडे उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे निसर्गतःच अनेक आजारांपासून संरक्षण मिळालेले असते.

शरीरातील त्रिदोषांची समस्थिती, धातुबल देखील उत्तम असल्यामुळे हे लोक फार कमी आजारी पडताना दिसतात.
सतत नाक वाहणारी शेंबडी सर्दी, किंवा छातीत कफ होऊन होणारा खोकला, ताप असे कफाचे आजार किंवा उष्णतेने होणारे मूळव्याध, मुतखडा, त्वचेच्या तक्रारी यासारखे आजार या लोकांना फार कमी होताना दिसतात, ते पण फार जास्त प्रमाणात अपथ्य घडले तरच होतात. थोड्या प्रमाणातले अपथ्य यांच्यामध्ये चालून जाते 😊.

🤧 #सर्दी, #खोकल्याचा त्रास सर्वात कॉमन -*गर्भधारणा हिवाळ्यात असल्यामुळे जास्त प्रमाणात थंड 🍧🍹पदार्थ खाण्या-पिण्यात आल्यास, किंवा थंड हवेत फिरणं झाल्यास यांना 🤧 कोंडत्या सर्दीचा व कोरड्या खोकल्याचा त्रास होताना दिसतो.

🫃🏻 #जाडी चरबी वाढणे हे देखील कॉमन -
आजारांचे कमी प्रमाण, चांगली भूक व मूळची कफप्रधान प्रकृती यामुळे चरबी वाढवणारा अतिगोड, थंड, तेलकट (High Calories) आहार सतत घेतला गेल्यास व सुखासीन जीवनशैली असल्यास अनेकांचे वजन वाढलेले दिसून येते. तसेच वजन वाढल्यामुळे होणारे #डायबेटीस_ब्लडप्रेशर_कोलेस्टेरॉल_हृदयरोग इ. आजार देखील या लोकांमध्ये दिसून येतात.

🎯 #योग्य_उपचार -
हिवाळ्याच्या वातावरणात यांची गर्भकाळातील सुरुवात झालेली असल्याने या लोकांमध्ये कफ दोष संबंधित आजारांची शक्यता अधिक राहते.
यासाठी या लोकांनी आवर्जून आपल्या जवळच्या 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' चा सल्ला घ्यावा. आपल्या प्रकृतीचे योग्य निदान करून घ्यावे, पोटाची पचनक्रियेची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी करून घेऊन कफदोष वाढू नये व आजारपण येऊ नये यासाठी आयुर्वेदिक औषधे, योग्य पथ्यापथ्य, योगा-व्यायाम, व गरजेनुसार पंचकर्म करून घ्यावीत.

🎯 #योग्य_आहार - आपली स्वतःची एकदा कफ प्रधान जन्म-प्रकृती आहे हे कन्फर्म झाले की त्यानुसार पथ्यापथ्य समजून घेतले पाहिजे.
✅ 👉🏻 कफदोष वाढू नये यासाठी यांनी नेहमी ताजे, गरम, मसालेयुक्त, पचायला हलके अन्नच खावे.

याविरुद्ध वजन व कफ वाढवणारे थंड, आंबट, आंबवलेले (इडली, डोसा इ.) अति गोड (गुळ साखर घातलेले) पदार्थ, शिळे अन्न, बिस्कीट इ. मैद्याचे बेकरी प्रोडक्टस खाणे टाळावे.❌🚫

✅ #सुंठ हे या लोकांसाठी खूप चांगले औषध आहे. सर्दी, खोकला, कफ, इ. तक्रारींमध्ये सुंठ पावडर मध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास त्वरित चांगला आराम मिळतो. 👌👍

☕ गरम चहा, आलं टाकून पिल्यावर या लोकांना छान फ्रेश वाटते. पण अतिमात्रेत चहा झाल्यास उष्णता पित्त वाढून इतर तक्रारी वाढू शकतात.
यासाठी या लोकांनी साधा चहा-कॉफी न घेता आयुर्वेदिक पद्धतीचा चहा प्यावा. 👍

☕ #आयुर्वेदिक_चहा (काढा) -
रात्री झोपण्यापूर्वी 2 कप पाण्यात 4 खारका व मूठभर मनुका भिजत घालाव्यात. त्यात सकाळी आले / सुंठ, लवंग, वेलची, दालचिनी, तुळस, गवती चहा टाकून हा काढा उकळावा, निम्मा आटवावा. हा काढा गाळून घेऊन त्यातील खारीक मनुका चावून खाव्या व काढा चहासारखा प्यावा.
जर उष्णतेचा त्रास असेल तर मात्र लवंग, मिरे असे उष्ण मसाल्याचे पदार्थ टाळावेत.

🎯 अवेळी, पोषण मूल्ये समजून न घेता आहार घेणे, #व्यसने करणे ही मोठी चूक -
जन्मतः सुदृढ शरीरयष्टी व उत्तम रोगप्रतिकार शक्ती मिळाल्यामुळे तरुणापणामध्ये अनेक जण अवेळी जेवण करणे, भूक मारणे, हॉटेलचे पदार्थ खाणे, दारू, सिगरेट सारखी व्यसने करणे इ.प्रकार वारंवार करतात. याने लगेच यांच्यामध्ये आजार निर्माण होत नाहीत, परंतु जसे जसे वय वाढून म्हातारपणात प्रवेश होतो, तेंव्हा वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, पण तरूणपणाच्या सवयींमुळे चुकीचे खाणेपिणे व व्यसने मात्र सोडली जात नाहीत, तेंव्हा मात्र या लोकांमध्ये वजन, पोटावर चरबी वाढणे, डायबेटीस, ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक सारखे आजार निर्माण झालेले दिसतात.

👉🏻 या लोकांची मूळ प्रकृती कफप्रधान आहे व भूक चांगली लागते, त्यामुळे चरबी (वजन) वाढू नये पण भूक तर भागली जावी यादृष्टीने आहाराचे नियोजन महत्वाचे.
विशेषतः बैठे काम करणाऱ्या लोकांनी खालील प्रमाणे #दिनचर्या ठेवता येते का पाहावे -
- सकाळी लवकर किमान 6 वाजणेपूर्वी झोपेतून उठणे महत्वाचे.
- किमान 1 तास चांगला घाम येईपर्यंत व्यायाम, योगासने करावेत.
- आंघोळीनंतर चहा/कॉफी सारखे उष्ण भूक मंदावणारे पेय पिण्यापेक्षा आयुर्वेदिक चहा (काढा) प्यावा.
- पोहे, उपीट, शिरा सारखे पिष्टमय पदार्थ किंवा इडली डोसा सारखे आंबवलेले पदार्थ नाश्त्याला घेऊन चरबी वाढवण्यापेक्षा रक्त, स्नायू, हाडे यांना पोषक पदार्थ जसे की खारीक, मनुका, सुक्के अंजीर सारखे ड्रायफ्रुटस, किंवा अंड्याचा पांढरा भाग, शिजवलेले मूग, थालीपीठ असे प्रथिनयुक्त पदार्थ नाश्त्यामध्ये खाणे योग्य.
- चांगली भूक असताना 12 ते 1 चे दरम्यान पोटभर जेवण,
- संध्याकाळी लवकर 8 वाजणेपूर्वी हलका आहार - भाकरी, भाजी किंवा शक्य झाल्यास जेवणाऐवजी भाज्यांचे सूप, किंवा फक्त साळीच्या लाह्या किंवा शिजवलेले मूग किंवा फार तर मुगाची खिचडी तूप टाकून खाल्यास रात्री पोट तर भरेल पण वजन नियंत्रणात राहील.

मध्ये कधी या लोकांना खोटी भूक लागत असेल तर त्यांनी साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या फोडणी दिलेल्या खाव्या. गोड खायची इच्छा झाल्यास खारीक (Dates) खावी. हाडांच्या मजबुतीसाठी अंड्याचा पांढरा भाग, चणे-फुटाणे, तुपात भाजलेला डिंक+खारीक पावडर मिक्स करून खावी.

🎯 #योग्य_व्यायाम -💪🏻 कफ प्रधान व्यक्तींमध्ये वजन, चरबी नियंत्रणात राहण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योगासने करावीत. सूर्यनमस्कार, जोर बैठका किंवा चांगल्या ट्रेनर च्या मार्गदर्शन खाली जिममध्ये सुद्धा 🏋🏻‍♀️ व्यायाम करून भरपूर घाम गाळायला हरकत नाही. फक्त या ट्रेनर कडून काहीही चुकीचा डाएट न घेता 'आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर' कडून तुमच्या प्रकृतीला योग्य डाएट सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.

व्यायामानंतर भरपूर घाम येऊन त्या जागी त्वचेला #फंगलइन्फेक्शन होण्याचा त्रास अनेकांना होतो, तो टाळण्यासाठी या लोकांनी व्यायामानंतर अंगाला कोरडे त्रिफळा चूर्ण किंवा उटणे लावून अंघोळ करावी व आंघोळीनंतर सुद्धा हे चूर्ण अंगाला कोरडे फासावे.

😇स्वतःला सतत क्रियाशील ठेवणे महत्वाचे.
या लोकांचा आळशी स्वभाव अनेक आरोग्याच्या तक्रारींना व आजारांना कारणीभूत असतो. त्यासाठी
📕 डायरी-लेखन - डायरी मध्ये रोजचे आपले वेळापत्रक बनवून त्यानुसार सर्व - आहार, व्यायाम, कामे इ. नियमित झाले पाहिजेत.
याशिवाय मनातले विचार, टेंशन्स, त्यावर सुचलेला मार्ग, नफा नुकसान, रोजचे, भविष्यातील प्लॅनिंग्ज देखील लिहून ठेवावे, म्हणजे मानसिक ताण, डिप्रेशन सारखे आजार त्रास देत नाहीत.

🧘🏻🧘🏻‍♀️नामस्मरण, सोबत योगा, प्राणायाम, मेडिटेशन सारखे उपचार करणे देखील अतिआवश्यक ठरतात. 🧘🏻‍♀️🧘🏻‍♂️

निसर्गत: जरी आपल्याला निरोगी शरीर मिळाले असले तरी आपण आपल्या चुकीच्या कृतींमुळे आजारपणांना निमंत्रण देत असतो❗

यासाठीच आपण स्वतःची जन्म-प्रकृती म्हणजेच शरीर व मनाला नीट समजून घेतले तर मोठ्या आजारपणांपासून नक्कीच स्वतःचा बचाव करू शकतो, हे महत्वाचे लक्षात ठेवा.

आणखी एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा... 👨🏻‍⚕️ डॉक्टर हा फक्त उत्तम मार्गदर्शक असतो व औषधे मदतीला... बाकी 'तुमचं शरीर स्वतःच स्वत:ला बरं करत असतं❗'

“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार❗” - सदगुरू 🙏🏻

तसं तरं बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण शब्दांच्या मर्यादा लक्षात घेऊन आवरतं घेतो.

मला आशा आहे कि या माहितीमुळे आता तुम्ही योग्य ती काळजी घ्याल व आजच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या सर्व शुभेच्छा (शुभ-इच्छा) सार्थकी लागतील❗

तुमच्या कोणत्याही आरोग्याच्या तक्रारींवर मार्गदर्शनासाठी तुमचा हा ‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’ तुमच्या सोबत नेहमी आहेच, आवश्यकतेनुसार जरूर संपर्क करा.
धन्यवाद 🙏🏻

आपलाच
‘आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर’
डॉ.उदय पाटील
।। श्री श्रद्धा आयुर्वेद ।।
फॅमिली हेल्थ क्लिनिक व पंचकर्म सेंटर
कोरेगाव & सातारा
फोन - 88884 98732 & 082087 13119

यासारखी आयुर्वेदिक आरोग्यदायी माहिती नियमित मिळवण्यासाठी वरील फोन नं. वर मेसेज करा - "आयुर्वेद फॅमिली मध्ये ऍड करा❗"

Address

Shree Shraddha Ayurved, Above Buladhana Urban Co. Op. Bank, Bajarpeth Road, Azad Chowk
Koregaon
415501

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+918208713119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ।। Shree Shraddha Ayurved ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ।। Shree Shraddha Ayurved ।।:

Shortcuts

Share