26/10/2022
सामाजिक बांधिलकी!👌🙏 🇮🇳
निवृत्त IAS अधिकारी महेश झगडे यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा धर्मादाय रुग्णालयासाठी ११.११ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
भारतीय प्रशासकीय सेवेतील ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर झगडे निवृत्त झाले.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची नियुक्ती त्यांनी स्वीकारली.
त्यासाठी कोणतेही मानधन न घेण्याचा मनोदय त्यांनी राज्य शासनाकडे मांडला होता.
मात्र, मिळणाऱ्या मानधनातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा विचार त्यांनी केला. त्यानुसार मानधनाची रक्कम कस्तुरबा रुग्णालयासाठी दिली.
आपल्या कार्याला वंदन सर!🙏
Mahesh Zagade