21/08/2026
“राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन्ही शहर अध्यक्षांचे पदग्रहण संपन्न “
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर अध्यक्षांचे पदग्रहण कार्यक्रम आज पक्ष कार्यालयात उत्साहात पार पडला. मा. श्रीकांत पाटील व मा. विशाल तांबे यांनी माजी राज्यसभा सदस्य ॲड. वंदना चव्हाण, आमदार बापूसाहेब पठारे, प्रवक्ते अंकुश काकडे, रवीकांत वर्पे, काका चव्हाण, पंडित कांबळे, ॲड. औदुंबर खुने पाटील, सौ. स्वाती पोकळे,मनाली भिलारे, श्रद्धा जाधव , रवी चौधरी , शशिकांत तापकीर व असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पदाची सूत्रे स्वीकारली.
पुण्याच्या विस्तारात पक्षाचे योगदान वाढवण्यासाठी दोन शहराध्यक्ष नियुक्तीचा निर्णय उपयुक्त ठरेल व पुणेकरांना न्याय देता येईल.
मा. विशाल विलासराव तांबे हे
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २००७ पासुन नगरसेवक होते. २०१३-१४ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही सांभाळले आहे.
पीएमआरडीएचे नियोजन समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणुक समन्वयक व निवडणूक पक्ष प्रवक्ते म्हणूनही यांनी काम पाहिले आहे.
मा. श्रीकांत पाटील यांना समाजकारण, शिक्षण, राजकीय क्षेत्राचा वारसा आहे. गणेश मंडळापासून नगरसेवक पदावर काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.
या दोन्ही अध्यक्षांमुळे पक्षाला पुणेकरांसाठी चांगले काम करण्यास सोयीचे होईल.
या महत्त्वाच्या पदग्रहण समारंभास मला हजर रहाता आले.
या कार्यक्रमाचे आभार श्रधा जाधव यांनी मानले.