17/06/2026
🏆 अभिमानाचा क्षण! 🏆
विशाल संपूर्ण आरोग्य संस्था चे संस्थापक डॉ. विशाल युवराज गुरव यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजकार्य, लोककल्याण, भारतीय संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाबद्दल "समाजसेवा शिरोमणी पुरस्कार 2026" ने राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले. 🌟
📍 अमरावती येथे आयोजित 24 वे अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलन – 2026 मध्ये हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात VSAS परिवाराने आकर्षक गणेश वंदना तसेच "बेटी बचाव, बेटी पढाव" या सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्य सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. 👏
हा सन्मान केवळ डॉ. विशाल गुरव यांचाच नसून, संपूर्ण VSAS परिवार, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्राचा गौरव आहे. 💐
🎉 हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉