Shraddha-Manas

Shraddha-Manas This page is created by Dr. Gayatri S Sawant to serve people for their mental health. We will guide people online with prior appointment.

I am - Dr. Gayatri- Ayurved Physician. I have experienced that many patients have psychological roots for their diseases. Hence started practice of counselling associated with Ayurved medicinal & Panchakarma therapy.

09/12/2020
09/12/2020

"पाऊलवाटेवरले गाव" हा आशा बगे यांचा कथासंग्रह वाचला....
सात कथा आहेत . त्यापैकी पाच कथांवर भूतकाळाची सावली आहे. परंतु प्रत्येक कथेचं "व्यक्तीमत्व" वेगळे आहे .
*केवडा* ही संथ लयीने जाणारी कथा संपता संपता आपल्या कळत की भूतकाळात तरुण मुलाचा झालेला मृत्यू ,त्याच आवडत केवड्याच अत्तर हेसुद्धा या कथेला व्यापणार "पात्र" आहे . घरात सगळ्यांना आधार देणारी आई खरतर उद्ध्वस्त झालीय मनातून ,जणु विरघळुन गेली आहे त्या दुःखात.... सतत केवड्याच्या सुगंधात राहणारी...
*गाव* ही कथा एका साध्या गावाचा शांतपणा सामावून आहे . केवढी तरी आंदोलने कथेच्या छोट्याशा जीवात सांभाळलेली आहेत . अपत्यासाठी असणारी आस वेगळ्या वाटेने व्यक्त होते या कथेत ....पण कुठे तर निर्धारपूर्वक याच दु:खाला समर्थपणे पेलणाऱ्या अनु समोर ! "मुलं नाहीत आम्हाला" हे तिचं अखेरचं वाक्य चटका लावून जातं.... कारण व्यक्त होणाऱ्या दुःखापेक्षा अव्यक्त दुःखाची दाहकता अधिक असते.
*लग्न* या कथेत तर कुठलंही पात्र नाही ....पत्रातून उलगडत जाणारी ही कथा आणि त्यातूनच टोकदारपणे बाहेर येणारी पात्र ! आंतरजातीय विवाह एखाद्या कुटुंबाचं जीवन कसं सपाट करून टाकतो हे वाचून आपल्याला धक्का बसतो...
*कलश* ही कथा मात्र आजच्या पिढीलाही आवडेल वाचायला . पूर्वीचा मित्र ...लग्न झालेल्या मैत्रिणीकडे मुक्काम ....तिचा नवराही ते सहजपणे स्वीकारणारा ....आणि त्यांची मंगल कलशासारखी पवित्र मैत्री ....कमालीचे समाधान देऊन संपणारी कथा...... याउलट *अँटिक* मैत्रिणीचा विचार "भौतिक"तेने करणारा मित्र आणि तितक्याच शांतपणे तिथून निघून जाणारी "ती"... या कथेचा "हटके" नाव किती शाश्वत आहे ,हे अखेरच्या ओळीत स्पष्ट होते.
*पुन्हा एकदा जन्म*.. समस्त गृहिणींना आपलीशी वाटेल ही कथा. हे वाचून प्रत्येकाला वाटेल गृहिणींना "स्वतःचा शोध" घेण्यासाठी थोडावेळ आयुष्यात नक्की द्यायला हवा.
अखेरीस *अतिथी* कथा..... पात्रांच्या मनातील अनिश्चिततेचे सावट घेऊन असणारी कथा ...'नकोसे वाटणारे ...कोण , कोणाला' याचे उत्तर मिळते आपल्याला. पण दुःखाने कोरडा होऊनही मन जागे असलेला नायक भेटतो यात आपल्याला...
लेखिकेने या साऱ्या कथांना जो आकृतिबंध आणि वास्तवाचा निखळ स्पर्श दिला आहे त्यामुळे या कथा वाचनीय झालेल्या आहेत.

11/09/2020

10 सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो . सध्या तरुण वर्गात आत्महत्या करण्याचे प्रमाण तुलनेने वाढलेला आहे . बालपणापासून त्यांना हवे ते तात्काळ मिळणे ,नकार पचवण्याची सवय नसणे... येथपासून तर अपयश ... मग ते अभ्यासातील असो की प्रेमात .....येथपर्यंत अनेक कारणे आहेत ! पण तरी मला माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांवरून एक गोष्ट समजली की, फॅमिली हिस्ट्री आणि मानसिक आधाराचा अभाव या व्यतिरिक्त बाकी सगळी कारण ही बहुतांशी वैयक्तिक असतात . उदाहरणार्थ दीर्घकालीन आजार ,नैराश्य, अपयश ,व्यवसायातील नुकसान इ. कौटुंबिक इतिहास असला तर ही प्रवृत्ती कशी काय निर्माण होते हे शास्त्राला अजूनही न उलगडलेले कोडे आहे . पण असे अनेक रुग्ण प्रत्यक्षात आढळतात . मानसिक आधार हा कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी , शिक्षक यांच्याकडून योग्य वेळी मिळायला हवा याबद्दल दुमत असू नये. पण समजा नाही मिळाला तर तो भरून काढणं आपण शिकायला हवं . काही मुलं एकल पालकत्व असलेल्या घरात वाढतात , काही मुलं पालकांचे होणारे वाद ऐकतच मोठे हो. पण कधी अशी मुलं फार लवकर समजूतदार होतात, लवकरच प्रगल्भ होऊन आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतात. जीवन सोपं आणि सहज करण्याकडे त्यांचा कल असतो. अभ्यासात किंवा छंदात मन गुंतवतात ....माझ्या पाहण्यात नुकताच असा मुलगा आला.... तो लहानपणापासून आई-बाबांचे वाद बघतच वाढला . तो अक्षरशः दहावीत असताना ते विभक्त झाले . ...आणि आईने लगेच दुसरे लग्न केले . तरी हा मुलगा दहावीत उत्तम मार्कांनी पास झाला .मग त्याने डिप्लोमा इन कंप्यूटर इंजीनियरिंग ला प्रवेश घेतला . त्यात उत्तम मार्काने पास होऊन त्याला पुण्यात नोकरी मिळाली . ही नोकरी करत त्याने BE पूर्ण केलं आणि आता ME करीत आहे .या दरम्यान स्वतःच्या 1bhk फ्लॅट साठी पैसे गुंतवले. एक बाईक देखील खरेदी केली. कुठून मिळाला असेल त्याला मानसिक आधार ?कसे मिळवले त्याने जीवनाला सामोरे जाण्याचे धैर्य? आजची तरुण पिढी अत्यंत हुशार आहे . पण थांबणं, वाट पहाणे, मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पचवणं हे त्यांना फार कठीण जातं. याचं खरं कारण म्हणजे ते आपल्या भावना सुद्धा यंत्रांना संलग्न करून टाकतात . माणूस आणि यंत्र यात भेद आहे . मानवी संबंध ,जीवन यात चढ-उतार असणारच . त्यांना व्यवस्थित तोंड देणं हेच यश ! हे त्यांना खरं तर समजावून सांगायला हवं . ज्ञान खूप परंतु अनुभवाची कमतरता यामुळे त्यांची गती आणि जीवनाची गती यात अंतर पडत चालले आहे .
समाजातील वावर वाढवणं , लोकांच्या प्रत्यक्ष सहवासात रमणे, नातेसंबंध जपणे आणि मित्रत्व जपताना तन-मन-धन समर्पित करणे हे त्यांना शिकवायला हवे. जीवनात कोणतीही शैक्षणिक परीक्षा महत्त्वाची नाही तर या परीक्षेला आणि त्यातून येणाऱ्या यश अपयशाला तोंड देण्याची "परीक्षा" अधिक महत्त्वाचे आहे ,हे त्यांना पटवायला हवं . परिस्थिती कुठलीही असो चांगली किंवा वाईट ....ती तात्पुरती असते. त्यामुळे कुठलाही बदल नीट स्वीकारणे आणि आयुष्याचा आनंद घेणे हेच ध्येय ठेवलं तर आयुष्य किती सुंदर, सोपं आणि सहज होऊन जाईल ! आत्मघात करण्याचा विचार देखील कोणाच्या मनात येणार नाही. आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करण्याची गरज उरणार नाही.

Address

Shree Swami Polyclinic, 5, Pranjal Society, Shivateerth Nagar, Paud Road, Kothrud
Pune
411038

Opening Hours

Tuesday 6:30pm - 9:45pm
Wednesday 6:30pm - 9pm
Thursday 6:30pm - 5pm
Saturday 6:30pm - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shraddha-Manas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shraddha-Manas:

Share