Shiv Hospital And Diabetes Care Center

Shiv Hospital And Diabetes Care Center Diabetes Care Center

16/08/2026

डायबिटीस मधील गुंतागुंती
Diabetic complications
Awareness, Not Fear
🩺 हा व्हिडिओ फक्त माहिती आणि जनजागृतीच्या उद्देशाने आहे.

07/08/2026
03/08/2026

इन्सुलिन योग्य साठवण
Insulin storage

30/07/2026

इन्सुलिन सिरिंज वापरण्याची योग्य पद्धत Proper way of using insulin syringe

हात स्वच्छ धुवा साबण आणि पाण्याने.
इन्सुलिन तपासा – योग्य प्रकारचे इन्सुलिन आहे का, कालबाह्य (expiry) नाही ना ते पाहा. जर ते ढगाळ (cloudy) इन्सुलिन असेल तर बाटली हलक्या हाताने 10–20 वेळा उलटी-पालटी करा. जोरात हलवू नका.
सिरिंजमध्ये हवा भरा – जितके युनिट इन्सुलिन घ्यायचे आहे तितकी हवा सिरिंजमध्ये भरा.
हवा बाटलीत सोडा आणि बाटली उलटी करून आवश्यक तेवढे इन्सुलिन सिरिंजमध्ये भरा.
हवेचे बुडबुडे (air bubbles) असल्यास हलके टॅप करून बाहेर काढा.
इंजेक्शनची जागा निवडा – पोट (बेंबीपासून किमान 2 इंच दूर), मांडी, वरचा हात किंवा नितंब. प्रत्येक वेळी जागा बदलत (rotate) रहा.
त्वचा हलकी चिमटीत घ्या आणि 90° कोनात (किंवा अतिशय बारीक व्यक्तींमध्ये 45°) सुई टोचा.
इन्सुलिन हळूहळू पूर्ण दाबून द्या.
सुई सुमारे 10 सेकंद तशीच ठेवून मग बाहेर काढा.
महत्त्वाच्या सूचना:
इन्सुलिन डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार आणि युनिटनुसारच घ्या.
ए�

🩸 रक्त न देता गंभीर रक्ताल्पतेवर (Severe Anaemia) यशस्वी उपचारअवघ्या १२ दिवसांत लक्षणीय सुधारणा!शिव हॉस्पिटल, राहुरी येथ...
28/07/2026

🩸 रक्त न देता गंभीर रक्ताल्पतेवर (Severe Anaemia) यशस्वी उपचार
अवघ्या १२ दिवसांत लक्षणीय सुधारणा!
शिव हॉस्पिटल, राहुरी येथे दाखल झालेल्या एका रुग्णामध्ये:
🔴 हिमोग्लोबिन: 3.1 g/dL
🔴 प्लेटलेट्स: 43,000/cmm
रुग्णाची सखोल तपासणी करून, सतत वैद्यकीय देखरेखीखाली रक्त न देता, केवळ तोंडावाटे (Oral) व शिरेद्वारे (IV) हेमॅटिनिक्स तसेच आवश्यक उपचार देण्यात आले.
अवघ्या १२ दिवसांनंतर...
✅ हिमोग्लोबिन: 3.1 ➜ 6.0 g/dL
✅ प्लेटलेट्स: 43,000 ➜ 2,14,000/cmm
✅ आर बी सी काउंट (तांबड्या पेशी):2.39➡️3.91mil./cmm
रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.
⚠️ टीप: प्रत्येक रुग्णाची प्रकृती व आजाराची कारणे वेगवेगळी असतात. उपचाराची पद्धत व परिणाम रुग्णाच्या स्थितीनुसार बदलू शकतात. योग्य उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
📍 डॉ. मंगेश कुंभकर्ण यांचे शिव हॉस्पिटल
कोर्ट एरिया, राहुरी
📞 संपर्क: 7796106362

हिपॅटायटिस म्हणजे यकृताची (लिव्हरची) सूज होय.हा आजार विषाणूंमुळे होतो आणि योग्य वेळी तपासणी व उपचार केल्यास नियंत्रित कर...
27/07/2026

हिपॅटायटिस म्हणजे यकृताची (लिव्हरची) सूज होय.
हा आजार विषाणूंमुळे होतो आणि योग्य वेळी तपासणी व उपचार केल्यास नियंत्रित करता येतो.
लक्षणे: थकवा, भूक न लागणे, मळमळ, कावीळ, पोटदुखी.
कसा पसरतो?
• दूषित अन्न व पाणी (A, E)
• संक्रमित रक्त किंवा सुई (B, C)
• असुरक्षित लैंगिक संबंध
• संक्रमित आईकडून बाळाला होऊ शकतो
प्रतिबंध:
✅ हिपॅटायटिस A व B चे लसीकरण
✅ स्वच्छ अन्न व पाणी
✅ सुरक्षित सुई व रक्ताचा वापर
✅ नियमित तपासणी
"वेळेत तपासणी करा, यकृताचे आरोग्य जपा!"
डॉ.कुंभकर्ण यांचे शिव हॉस्पिटल ,कोर्ट एरिया ,राहुरी
संपर्क 77 96 10 63 62

26/07/2026


इन्सुलिन सिरिंजवरील लाल आणि नारंगी रंगातील फरक
🔴 लाल (Red) कॅप / मार्किंग
U-40 इन्सुलिन सिरिंज
1 mL मध्ये 40 युनिट्स इन्सुलिन मोजण्यासाठी.
फक्त U-40 इन्सुलिनसाठी वापरावी.
🟠 नारंगी (Orange) कॅप / मार्किंग
U-100 इन्सुलिन सिरिंज
1 mL मध्ये 100 युनिट्स इन्सुलिन मोजण्यासाठी.
फक्त U-100 इन्सुलिनसाठी वापरावी.
⚠️ महत्त्वाची सूचना: U-40 इन्सुलिनसाठी U-40 सिरिंज आणि U-100 इन्सुलिनसाठी U-100 सिरिंजच वापरा. चुकीची सिरिंज वापरल्यास इन्सुलिनचा डोस चुकीचा होऊ शकतो, ज्यामुळे रक्तातील साखरेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
डॉ. कुंभकर्ण यांचे शिव हॉस्पिटल, कोर्ट एरिया, राहुरी
संपर्क-7796106362

24/07/2026

आषाढी एकादशी स्पेशल ...डायबिटीस आणि उपवास
and fasting

Address

Court Area, Nagar Manmad Road Rahuri
Ahmednagar

Telephone

+917796106362

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Hospital And Diabetes Care Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shiv Hospital And Diabetes Care Center:

Shortcuts

Share

Category