07/09/2026
Placental Calcification म्हणजे काय? नॉर्मल आहे का? | Dr.Pooja Pol
प्रेग्नन्सीच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये “Placental Calcification” किंवा “Calcified Placenta” असं लिहिलेलं पाहून अनेक गर्भवती महिलांना काळजी वाटते. पण हे नेमकं काय असतं? आणि बाळासाठी ते धोकादायक असतं का?
या व्हिडिओमध्ये Dr. Pooja Pol, Fetal Medicine Specialist, SonoFitz Ahilyanagar अगदी सोप्या भाषेत सांगत आहेत की प्लेसेंटल कॅल्सिफिकेशन म्हणजे काय आणि ते ट्रायमेस्टरनुसार कसं बदलतं.
प्रेग्नन्सी जसजशी पुढे जाते, तसतसं प्लेसेंटामध्ये काही नैसर्गिक बदल होतात आणि कॅल्सिफिकेशन दिसू शकतं. त्यामुळे फक्त रिपोर्टमध्ये कॅल्सिफिकेशन दिसलं म्हणून लगेच घाबरण्याची गरज नाही.
महत्त्वाचं म्हणजे:
✔️ बाळाची ग्रोथ व्यवस्थित आहे का?
✔️ Doppler normal आहे का?
✔️ बाळामध्ये इतर काही abnormal findings आहेत का?
✔️ कॅल्सिफिकेशन कितव्या ट्रायमेस्टरमध्ये दिसत आहे?
जर बाळाची वाढ आणि बाकीचे parameters नॉर्मल असतील, तर फक्त placental calcification असल्यामुळे घाबरण्याची गरज नसते.
तुमच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये “Placental Calcification” लिहिलं असेल, तर त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
Dr. Pooja Pol
Fetal Medicine Specialist
SonoFitz, Ahilyanagar
हा व्हिडिओ गर्भावस्थेतील सामान्य माहितीसाठी आहे. तुमच्या रिपोर्टनुसार योग्य मार्गदर्शनासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
#गर्भावस्था #गर्भावस्थेतीलमाहिती #प्लेसेंटा #सोनोग्राफी