Sai Ortho Care - Spine And Joint Replacement Centre, Akluj

  • Home
  • India
  • Akluj
  • Sai Ortho Care - Spine And Joint Replacement Centre, Akluj

Sai Ortho Care - Spine And Joint Replacement Centre, Akluj SAI ORTHO CARE delivers expert orthopedic solutions for all ages. Experience precision and personalized treatment at Akluj's leading ortho centre.

From minor injuries to complex spine and joint replacements, Dr. Shriraj and team offer comprehensive care.

15/07/2026

टाचेमागे गाठ आणि वेदना दुर्लक्षित करू नका! 👣

सकाळी उठल्यावर टाचेमागे तीव्र वेदना होते का?
बूट घातल्यावर टाचेमागे त्रास वाढतो का?

ही लक्षणे हॅगलंड डिफॉर्मिटी (Haglund Deformity) ची असू शकतात.

योग्य वेळी निदान केल्यास बहुतेक रुग्णांना औषधे, फिजिओथेरपी, योग्य फुटवेअर आणि हील रेजच्या मदतीने आराम मिळू शकतो. काही मोजक्या रुग्णांमध्येच शस्त्रक्रियेची गरज भासते.

टाचेची वेदना सहन करू नका. योग्य उपचार घ्या आणि पुन्हा वेदनामुक्त चालायला सुरुवात करा.

📍 Sai Ortho Care – Spine & Joint Replacement Centre, Akluj
👨‍⚕️ डॉ. श्रीराज एस. भोंगळे-जाधव
Consultant Orthopaedic & Spine Surgeon

13/06/2026

प्रत्येक पाठदुखी किंवा मानदुखीसाठी MRI आवश्यक नसतो!

बहुतेक साध्या पाठदुखी व मानदुखीच्या समस्या योग्य औषधे, फिजिओथेरपी, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांमुळे बऱ्या होऊ शकतात.

लक्षणे, तपासणी आणि गरज यानुसारच MRI करावा. अनावश्यक तपासण्या टाळा आणि योग्य उपचारांवर भर द्या.

दुखणे समजून घ्या, घाबरू नका!

26/05/2026

“गुडघा बदलल्यानंतर पूर्ण बेड रेस्ट घ्यावी लागते.”
➝ हे चुकीचे आहे. ऑपरेशननंतर लवकर चालणे आणि फिजिओथेरपी सुरू करणेच रिकव्हरीसाठी महत्त्वाचे असते.

“टोटल नी रिप्लेसमेंटनंतर पुन्हा चालता येत नाही.”
➝ योग्य उपचार आणि व्यायाम केल्यास बहुतेक रुग्ण पूर्वीपेक्षा चांगले चालू शकतात.

“ही शस्त्रक्रिया खूप धोकादायक असते आणि वयस्कर लोकांना करता येत नाही.”
➝ आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया सुरक्षित झाली आहे आणि अनेक ज्येष्ठ रुग्णांना याचा चांगला फायदा होतो.

“गुडघा बदलल्यावर आयुष्यभर वेदना राहतात.”
➝ प्रत्यक्षात बहुतेक रुग्णांमध्ये वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात आणि दैनंदिन कामे सहज करता येतात.

“वाकडे झालेले पाय किंवा गुडघे सरळ होऊ शकत नाहीत.”
➝ टोटल नी रिप्लेसमेंटमुळे अनेक रुग्णांमध्ये वाकडे झालेले गुडघे सरळ करण्यात मदत होते आणि चालण्याची पद्धत सुधारते.

13/04/2026

“कंबरदुखी साधी आहे की Sciatica? योग्य ओळख खूप महत्त्वाची आहे!
लक्षणं समजून घ्या आणि वेळेत उपचार घ्या.

पाठीच्या कण्यातील (Spine) नसांवर आलेल्या दाबामुळे होणारा तीव्र वेदना, मुंग्या येणे किंवा पायात जाणारा त्रास आता नियंत्रण...
07/04/2026

पाठीच्या कण्यातील (Spine) नसांवर आलेल्या दाबामुळे होणारा तीव्र वेदना, मुंग्या येणे किंवा पायात जाणारा त्रास आता नियंत्रणात आणणे शक्य आहे — Transforaminal Root Block या आधुनिक आणि सुरक्षित उपचार पद्धतीमुळे 🙌
👉 ही एक मिनिमली इन्वेसिव्ह (छोट्या प्रक्रियेची) इंजेक्शन पद्धत आहे
👉 थेट त्रासदायक नसाजवळ औषध देऊन सूज आणि वेदना कमी केली जाते
👉 सर्जरी टाळण्यास मदत होऊ शकते
👉 जलद आराम आणि लवकर दैनंदिन आयुष्यात परतण्यास मदत
💡 स्लिप डिस्क, सायटिका किंवा नर्व रूट कम्प्रेशनमध्ये अत्यंत प्रभावी उपचार
आपल्या वेदनेला दुर्लक्ष करू नका — योग्य वेळी योग्य उपचार घ्या!
📞 सल्ल्यासाठी संपर्क करा
Dr. Shriraj S Bhongale-Jadhav
MBBS MS ORTHO ( FISS, FIJR)
Joint Replacement & Spine center,Akluj

07/03/2026

“तुमचा गुडघा दुखतोय का? मग या ५ चुका तुम्ही करत नाही ना ते नक्की बघा.”

05/03/2026

“सायटिकामुळे चालणे-बसणेही कठीण झाले होते.
योग्य तपासणी आणि उपचारांनंतर आता रुग्णाला १००% आराम मिळाला आहे.
रुग्णाच्या चेहऱ्यावरचे समाधानच आमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस.”

30/01/2026

गुडघा बदल शस्त्रक्रियेचे (Knee Replacement Surgery) फायदे –
दुखणं खूप कमी होतं
अनेक वर्षांचं गुडघ्याचं असह्य दुखणं शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच प्रमाणात कमी होतं किंवा पूर्णपणे जातं.
चालणं-फिरणं सोपं होतं
बसणं, उठणं, चालणं, जिने चढणं-उतरणं हे काम पुन्हा सहज करता येतं.
दैनंदिन कामात स्वावलंबन
इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची कामं करता येतात – घरात, शेतात किंवा बाहेर.
जीवनमान सुधारतं
वेदनांशिवाय हालचाल करता येत असल्यामुळे मन प्रसन्न राहतं, झोप सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.
औषधांवर अवलंबन कमी होतं
वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शनची गरज कमी होते.
गुडघ्याचा वाकडेपणा (वाकलेला/आत गेलेला गुडघा) सुधारतो
पाय सरळ होण्यास मदत होते, चालण्याची ढब सुधारते.
दीर्घकाळ टिकणारा फायदा
योग्य काळजी घेतली तर बदललेला गुडघा अनेक वर्षे चांगला टिकतो.
वय अडथळा नसतो
योग्य तपासणीनंतर वृद्ध रुग्णांनाही ही शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करता येते.

Address

Bypass Road, Sujaynagar 10, Opp. Bharat Gas Office
Akluj
413101

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Ortho Care - Spine And Joint Replacement Centre, Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share