डॉ हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र, अकोला

  • Home
  • India
  • Akola
  • डॉ हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र, अकोला

डॉ हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र, अकोला अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समितीचा सेवाभावी उपक्रम

25/09/2025

नवीन ब्लड कलेक्शन सेंटर
25/09/2025

नवीन ब्लड कलेक्शन सेंटर

माफक दरात उपलब्ध
20/06/2025

माफक दरात उपलब्ध

23/05/2025
29/04/2025
29/04/2025
28/04/2025
28/04/2025
सेवा हे अहंकाराचे हरण करण्याचे माध्यम झाले पाहिजे. - शैलेश पोतदार 0 डॉ हेडगेवार रुग्णालयाचा ७ वा वर्धापन दिन व कृतज्ञता ...
28/04/2025

सेवा हे अहंकाराचे हरण करण्याचे माध्यम झाले पाहिजे. - शैलेश पोतदार

0 डॉ हेडगेवार रुग्णालयाचा ७ वा वर्धापन दिन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

अकोला : महाराष्ट्रातील सरकारी व राष्ट्रीय कंपनी महाबीज अकोला, वेस्टर्न कोल्ड फिल्डस नागपुर, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन पुणे, यांनी शहरातील नामांकित अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समितीचा सेवाभावी उपक्रम डॉ हेडगेवार रुग्णालयाच्या सेवाकार्याची दखल घेत रुग्णालयाला सीएसआर निधिच्या माध्यमातून डायलिसिस व पॅथोलॉजी उपकरण उपलब्ध करून दिले त्यानिमित्त शनिवारी अभिरुचि गार्डन येथे ७ वा वर्धापन दिन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ हेडगेवार रुग्णालय संभाजीनगरचे मेडिकल डायरेक्टर डॉ महेश देशपांडे होते. प्रमुख वक्ते म्हणून रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख शैलेश पोतदार, डब्ल्यूसीएल नागपुरचे महाप्रबंधक जी सितारामन, डॉ. शशी शंकर, महाबीज अकोलाचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ, अवनिश देशमुख, योगेशजी कुंभेजकर, प्रकल्प अध्यक्ष बाबासाहेब पाठक, अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समितीचे अध्यक्ष संजीव सोमाणी, प्रकल्प प्रमुख डॉ विनायक देशमुख उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ महेश देशपांडे, डॉ रणजीत सपकाळ, जी सितारामन, वसुंधरा देशमुख, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोहळ्याचे प्रमुख वक्ते शैलेश पोतदार यांनी आपल्या उद्बोधनात आम्हाला जी शिकवण मिळाली आहे त्यामध्ये थांबणे हा शब्दच नाही, समाजामध्ये जेव्हा दु:ख दिसते, कष्ट दिसतात त्यावेळला प्रत्येक जण ते कष्ट आणि दु:ख दूर करायला पुढे येतो. पुढे त्यांनी शुद्ध, निस्वार्थ, निरपेक्ष सेवेसारखे दुसरे कोणतेही पुण्यकार्य नाही. सेवा हे अहंकाराचे हरण करण्याचे माध्यम झाले पाहिजे. मी प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा करतो आहे. हा भाव जेव्हा मनामध्ये येतो. त्या वेळला निस्वार्थ आणि निरपेक्ष भावना मनात उत्पन्न होते. जी माणसाच्या अहंकाराचे हरण करते अशी आमची हिंदू सेवा दृष्टी आहे. असे त्यांनी आपल्या उद्बोधनात विशद केले.
या मध्ये वेस्टर्न कोल फील्ड्स, नागपुर रु. ४८ लक्ष, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन, पुणे रु. ४८ लक्ष, महाबीज, अकोला रु. २.५ लक्ष, यांनी सीएसआर मधून तर वसुंधरा देशमुख यांनी रु. २२ लक्ष रुपये तसेच महेंद्र पाटील जळगाव खांद्देश, प्रशांत लोहिया, रोहन सोनटक्के, साधना गोयनका, राम मोरगावकर यांनी वैयक्तिक निधि दिला. दिलेल्या निधितून घेतलेल्या उपकरणाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सोबतच उपस्थित सर्व कंपन्यांच्या अधिकार्यांनचा, वैयक्तिक दानदात्यांचा तसेच रुग्णालयाला वेळोवेळी सहकार्य करणार्याच अविनाश पाटील, नितिन देशमुख, अभिजीत मानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब पाठक, संचालन पुजा परांजपे व सचिन मुलमुले, वैयक्तिक गीत पुरुषोत्तम डिक्कर, आभार संदीप हातवळणे यांनी मानले तर पसायदान महेश जोशी यांनी गायले. कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, जयंत मसने, सागर शेगोकर, नीलेश देव, सुभाष मुंगी, विद्या भारती जालना जिल्हा अध्यक्ष पद्माकर सबनीस, यांच्यासह अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील गणमान्य डॉक्टर्स, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समितिचे सदस्य, डॉ हेडगेवार रुग्णालयाची कार्यकारी समिति व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Address

Mukharji Banglow, Raut Wadi
Akola
444001

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र, अकोला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category