Yadgire Hospital

Yadgire Hospital Yadire hospital is pioneer super specialty hospital in Amravati city. Dr. Atul & Rohini Yadgire started hospital.

आपणा सगळ्यांना यादगिरे हॉस्पिटल व परिवारातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
28/03/2017

आपणा सगळ्यांना यादगिरे हॉस्पिटल व परिवारातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. रस्त्यात किंवा आपल्या आसपास एखाद्या व्यक्तीला च...
19/03/2017

प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. रस्त्यात किंवा आपल्या आसपास एखाद्या व्यक्तीला चक्कर आली किंवा काही जखम झाली तर तत्परतेने त्याला मदत करणे हे सच्च्या माणुसकीचे लक्षण आहे. प्रथमोपचाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेहमीच्या जीवनात अपघातग्रस्त माणसांना किंवा अचानकपणे आजारपण उद्भवलेल्या माणसांना प्रथमोपचाराची नितांत गरज असते.
प्रथमोपचाराचे उद्दिष्ट.
आयुष्य वाचवणे.
तातडीची मदत मिळणे.
अपघातग्रस्त/आजारी माणसाच्या आरोग्यात होणारी गुंतागुंत कमी करणे.
प्रथमोपचार देणा-यांनी करावयाचे काम.
वेळच्यावेळी गरजू माणसापर्यंत पोचणे.
अशा वेळी स्वत: शांत राहून, घाबरून न जाता मदत करणे.
पुढ्यात असलेल्या समस्येची पूर्ण माहिती असणे.
प्रथमोपचाराची साधने कशी वापरावीत ह्याची माहिती असणे.
गरजू व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविणे.

15/03/2017
Tracing the roots of our ancient art of Surgery, hope all Surgeons and all those who love Surgery will enjoy it!शल्य कौश...
14/02/2017

Tracing the roots of our ancient art of Surgery, hope all Surgeons and all those who love Surgery will enjoy it!
शल्य कौशल्य
चंद्रशेखर साठ्ये
मागील महिन्यात लंडनला रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सला एका अभ्यासक्रमासाठी गेलो होतो. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड ही फारच नावाजलेली संस्था आहे. त्यांची फेलोशिप ज्याला फेलोशिप ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स एफआरसीएस म्हणतात ही सर्जन्स - शल्यविशारदांकरिता फारच प्रतिष्ठेची मानली जाते. मध्य लंडनमध्ये त्यांची भव्य व्हिक्टोरियन इमारत आहे. त्यात दुसऱ्या मजल्यावर ‘हंटेरियन म्युझियम’ नावाचे एक संग्रहालय आहे. त्यात शल्यक्रियाशास्त्राच्या इतिहासाविषयी व रॉयल कॉलेजच्या इतिहासाविषयी अनेक exibits आणि माहिती दिलेली आहे.
सर्जरी - शल्यक्रियाशास्त्र हे सध्याच्या घडीला अतिशय प्रतिष्ठेचे प्रगत शास्त्र मानले जाते. कात्री, सुरी, ब्लेड ही शल्यक्रियाशास्त्रज्ञांची मूलभूत औजारे. न्हाव्यांचीही मूलभूत औजारे हीच. खरे तर पूर्वी शल्यक्रिया या न्हावीच करीत असत. 10 व्या शतकात चर्चमधील धर्मगुरुंना विशिष्ट पद्धतीने केस कापावे लागत. त्यामुळे चर्चमधील धर्मगुरु वस्तऱ्याने एकमेकांचे केस कापत. हा वस्तरा वापरायचे कौशल्य शिकल्याने धर्मगुरु गावातील चर्चमध्ये येणाऱ्या लोकांच्या शरीरावरील गाठी कापून काढणे आणि गळू कापून पू काढणे आदि कामेही करु लागले.
1215 मध्ये पोप ओनोरियस तिसरा याने फतवा काढला की धर्मगुरुंनी लोकांचा शारीरिक व्याधी निवारणाकडे अजिबात लक्ष देऊ नये, त्याचप्रमाणे त्यांनी शल्यक्रिया करु नये. त्यामुळे धर्मगुरुंचे आणि इतर जनतेचे केस कापण्याचे कौशल्याचे काम करणारी ‘न्हावी’ ही जमात 13 व्या शतकात युरोपात उदयास आली.
कात्री, सुरी, ही अवजारे हाताळतांना त्यांनी केस नखे कापण्यासोबत हळूहळू गावातील लोकांचे दुखणारे दात काढणे, पू झालेला असेल तर तो चिरुन त्याचा निचरा करणे, छोट्या मोठ्या गाठी काढणे आदि उद्योग सुरु केले. 13-14 व्या शतकात विविध आजारासाठी उपाय म्हणून ‘रक्त मोक्षण’ ही पद्धत प्रचलित होती. न्हाव्यांनी यातही प्राविण्य मिळवले. हे न्हावी-शल्यचिकित्सक युद्धभुमीवर सैन्यासोबत जाऊन तेथे युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमांवर उपचार व प्रसंगी अॅम्प्युटेशन (हात किंवा पाय कापून काढणे) अशा शस्त्रक्रियाही करत असत.
1540 मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याने लंडनमध्ये ‘कंपनी ऑफ बार्बर सर्जन्स ही न्हावी-शल्यचिकित्सकांची संघटना स्थापन करुन तिला राजमान्यता दिली. ही संघटना न्हावी शल्यचिकित्सकांना परवाने देण्याचे काम करीत असे. त्याकाळात इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड व केंब्रिज ही दोनच विद्यापीठे होती. तेथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास होत असे पण वैद्यकीय व्यावसायिक शस्त्रक्रिया हे हलक्या दर्जाचे काम समजत असत त्यामुळे ते शस्त्रक्रिया करीत नसत.
कंपनी ऑफ वार्बर सर्जन्स - न्हावी शल्य चिकित्सकांची संघटना - याचे सदस्य हे काही विद्यापीठातुन वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसत पण ते विविध शस्त्रक्रिया करीत. हळूहळू त्यांनी मुतखडे व पित्ताशयातील खडे काढण्याच्या शस्त्रक्रिया करणेही सुरु केले तसेच मोडलेली हाडे बसवणे, त्यांना लेप लावणे हेही काम त्यांनी सुरु केले.
राजे महाराजांच्या करमणूकीसाठी, गाणी बजावणी करण्यासाठी त्याकाळात पुरुषांचे अंडाशय काढून त्यांना तृतीयपंथी - हिजडे बनवण्याची प्रथा होती हे कामही (शस्त्रक्रियेने पुरुषांचे अंडाशय काढून टाकणे) न्हावी सर्जन करु लागले.
आता या सर्व कामांसाठी न्हावी शल्य चिकित्सकांना शरीररचनाशास्त्र शिकणे आवश्यक होऊ लागले. त्यामुळे ऑक्ससफर्डमध्ये शिकलेल्या एका वैद्यकीय व्यावसायिकांची ‘रीडर ऑॅफ अनाटॉमी फॉर कंपनी ऑफ बार्बरसर्जन्स’ अशी नियुक्ती केली गेली. हा शरीररचनाशास्त्र न्हावी सर्जन्सना शरीररचनाशास्त्राचे धडे देत असे. त्याकाळात शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी मानवी देहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मानवी मृतदेह सहजासहजी उपलब्ध होत नसत त्यामुळे एकतर राजाने, कायद्याने फाशी/मृत्युदंडाची शिक्षा दिलेल्या गुन्हेगारांचे देहांवर यांना काम भागवावे लागे, पण ते काही रोज मिळत नसत. तेव्हा नुकत्याच मेलेल्या पुरलेल्या माणसांच्या कबरी रात्री गुपचुप खणून तेथून मृतदेह कंपनी ऑफ बार्बर सर्जन्सच्या तळघरात आणले जात व तेथे त्यांचे गुप्ततेत शवविच्छेदन केले जाई. मानवी शरीरचना शास्त्राचा अभ्यास अशा रीतीने शल्यचिकित्सकांनी केला, व त्याआधारे विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त चित्रे काढली, पुस्तके लिहिली. 1628 मध्ये विल्यम हार्वे याने मानवी शरीरातील रक्ताभिसरण (हृदयाकडून रक्त शरीराच्या सर्व भागात जाते व तेथून ते हृदयाकडे परत येते) सिद्धांताची पुष्टी ही असेच प्रत्यक्ष शवविच्छेदन करुन केली. आणि याकरिता त्याने त्याच्या स्वतःच्या वडिलांचे आणि बहिणीचे (अर्थातच त्यांच्या मृत्यूपश्चात) शवविच्छेदन केले. यावरुन त्या काळातील वैद्यकीय अभ्यासकांच्या अडचणी, आणि त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येते.
हे न्हावी शल्यचिकित्सक लंडन आणि युरोपात हळूहळू भरभराटीस आले ते त्यांच्या व्यवसायाची खूण म्हणून - जाहिरात म्हणून - खिडकीत नारळाची करवंटी (ज्यात ते रक्तमोक्षण केल्यावर वाहणारे रक्त जमा करीत) रुग्णांचा काढलेल्या दातांच्या माळा, आदि वस्तू लावत. विद्यापिठ शिक्षण नसल्यामुळे दुसऱ्या न्हावी शल्यचिकित्सकाकाडे उमेदवारी करुन नंतर कंपनी ऑफ बार्बर सर्जन्सकडून परवाना घेऊन हे व्यवसाय सुरु करीत. त्यांच्यापैकी काही विद्यापीठातही शिकायला जात पण त्याकाळात शल्यक्रिया करणे हे हीन दर्जाचे समजले जात असे त्यामुळे विद्यापिठात त्यांना ‘तोकडे कपडे’ घालून जावे लागे जेणेकरुन वैद्यकीय शिक्षण घेणारे इतर विद्यार्थी जे की ‘लांब कपडे’ घालत त्यांच्यापासुन यांना वेगळे ओळखले जाई.
‘अॅम्बॉईस पेरे’ ज्यास आधुनिक सर्जरीचा जनक असे संबोधले जाते हाही मूळचा न्हावीच होता. फ्रेंच ब्रिटिश युद्धातील जखमींना त्याच्या कौशल्याने पुर्नजन्मच मिळाला. हे सर्व करत असतांना हे सर्व न्हावी शल्यचिकित्सक त्यांचे मूळचे काम केशकर्तनही करत होते.
18 व्या शतकाच्या मध्यात न्हावी व शल्यचिकित्सकांत वेगळेपणाची भावना सुरु झाली. परिणामतः 1745 मध्ये (म्हणजे जवळजवळ 200 वर्षानी) कंपनी ऑफ बार्बर सर्जन्सची विभागणी कंपनी ऑफ बार्बर्स आणि कंपनी ऑफ सर्जन्स अशी झाली. इ.स.1800 मध्ये कंपनी ऑफ सर्जन्सला रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स असे नाव देण्यात आले.
‘जॉन हंटर’ हा 1748 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी लंडनमध्ये आला. त्याचा भाऊ ‘विल्यम हंटर’ हा त्याकाळी लंडनमध्ये नावाजलेला शरीर रचना शास्त्रज्ञ होता. जॉन हंटरने त्याच्या भावासोबत शरीररचना शास्त्रात काम करायला सुरुवात केली. त्याने मानवी मृतदेहांचे जतन करण्याच्या नव्या पद्धती अवलंबल्या त्याचप्रमाणे विच्छेदित केलेले अवयवही त्याचे व्यवस्थित जपून ठेवले. जॉन हंटरचे ‘शवविच्छेदन टेबल’ अजुनही रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या हंटेरियन म्युझियममध्ये जपून ठेवलेले आहे. त्याचा मृत्यू 1793 मध्ये झाला, त्यावेळी त्याने जपून ठेवलेले जवळजवळ 17000 स्पेसिमेन्स (शवविच्छेदित भाग) त्याच्या लंडनमधील लेस्टंर स्केवेअरच्या घरात होते. हे सर्व पुढे ब्रिटिश शासनाने विकत घेतले व रॉयल कॉलेजला दान केले. त्यांचे उत्कृष्ट संग्रहालय रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या दुसऱ्या मजल्यावर पहायला मिळते. दुसऱ्या महायुद्धात यातील काही भाग बॉबवर्षावात खराब झाले, पण बरेचसे भाग लंडनवासीयांनी भुयारांत सुरक्षित नेऊन ठेवले होते.
या हंटेरियन संग्रहालयाला भेट दिल्यावर मध्ययुगात शरीरचना शास्त्राच्या अभ्यासात संशोधकांना किती अडचणीतून मार्ग काढावा लागला याची जाणीव होते. मानवाची ‘अज्ञाताचा शोध’ घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही यातून प्रतीत होते. शल्यक्रियाशास्त्राच्या प्रगतीसाठी न्हावी व शरीररचना शास्त्रज्ञांनी दिलेले योगदानही यातून लक्षात येते.

Challenging  the  Conventions  in  CancerOn World Cancer Day but I thought I will share a few 'contrarian' thoughts :Fac...
12/02/2017

Challenging the Conventions in Cancer
On World Cancer Day but I thought I will share a few 'contrarian' thoughts :
Facts

On World Cancer Day but I thought I will share a few ‘contrarian’ thoughts : Facts : Cancer incidence is rising We are not making great headway in management of cancer so overall cancer…

12/02/2017

One of the largest studies of mammography found that mammograms have NO impact on breast cancer mortality -- so what's the benefit of annual mammograms?

One-third of adults in India use to***co in some form or the other. Five per cent of them consume smoke as well as use s...
05/02/2017

One-third of adults in India use to***co in some form or the other. Five per cent of them consume smoke as well as use smokeless to***co.Smokeless to***co se in India is among the highest in the world and more Indians use smokeless to***co than ci******es and bidis combined.
***cocancer

28/01/2017

New research shows that the metastatic process (cancer spread) is enhanced by fat intake. Mice given a high fat diet, including palmitic acid (a major component of palm oil which is found in lots of household products) developed the most aggressive cancer spread. The study identifies for the first t...

18/01/2017

Address

Congress Nagar Road
Amravati
444601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yadgire Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category