15/06/2026
हेच खरे Gen Z!हीच खरी जबाबदार भावी पिढी!
एमबीबीएस आणि बीडीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअर, उच्च शिक्षण किंवा व्यवसायाची वाट निवडण्याऐवजी डॉ. वरुण जोशी आणि डॉ. गायत्री मगरे यांनी आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वर्ष राष्ट्रसेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
'सेवांकुर भारत' या उपक्रमातून प्रेरणा घेत, हे युवा डॉक्टर "एक वर्ष देश के नाम" या भावनेने समाजकार्य आणि राष्ट्रकार्यासाठी पूर्णकालिक विस्तारक म्हणून कार्य करणार आहेत.
आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात सेवा, संवेदनशीलता आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार जपणारी अशी तरुण पिढी पाहून अभिमान वाटतो. अशाच तरुणांच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित आहे.
डॉ. वरुण जोशी आणि डॉ. गायत्री मगरे यांना त्यांच्या या राष्ट्रसेवेच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
#भारतमातेचेजवान #राष्ट्रसेवा #सेवांकुरभारत #युवाशक्ती #डॉक्टर #राष्ट्रनिर्माण #संस्कारितपिढी #एकवर्षदेशकेनाम