Saishri children's hospital & Dental clinic, bh. SBI Bank, Garkheda, A'bad

  • Home
  • India
  • Aurangabad
  • Saishri children's hospital & Dental clinic, bh. SBI Bank, Garkheda, A'bad

Saishri children's hospital & Dental clinic, bh. SBI Bank, Garkheda, A'bad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saishri children's hospital & Dental clinic, bh. SBI Bank, Garkheda, A'bad, Hospital, Near pahade corner, bh SBI bank, Mandir-Pundliknagar Road, Aurangabad.

16/01/2022
23/09/2019

डेंग्यू
सध्या डेंग्यूची साथ पसरली आहे, त्यावरील माहिती व प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊयात-
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो.

लक्षणे -
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात​.

एकदम जोराचा ताप चढणे
डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
चव आणि भूक नष्ट होणे
छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
मळमळणे आणि उलट्या
त्वचेवर व्रण उठणे

प्रतिबंध-
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.

औषधोपचार-

डेंग्‍यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत, तथापि रोगलक्षणानुसार उपचार करावे. या रुग्‍णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि झटके प्रतिबंधक औषधे देऊ नयेत. डेंग्‍यू तापाचे व्‍यवस्‍थापनः -

डेंग्‍यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्‍यास त्‍या रुग्‍णाला संपूर्ण विश्रांती (बेड रेस्‍ट ) घेणेबाबत सल्‍ला देणे.
रुग्‍णाचे तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्‍या खाली राहण्‍यासाठी ताप प्रतिबंधक औषधे देणे व रुग्‍णांना ओल्‍या कपडयाने पुसून घेणे.
ज्‍या रुग्‍णांना जास्‍त प्रमाणात वेदना होतात त्‍यांना वेदनाशामक औषधे देण्‍याची आवश्‍यकता भासू शकते.
ज्‍या रुग्‍णांना मोठया प्रमाणात उलटया, जुलाब, मळमळ व घाम येतो अशा रुग्‍णांच्‍या शरीरातील क्षार / पाणी कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्‍या फळांचा रस व ओ.आर.एस.चे द्रावण दयावे.

Quality Pediatric Health Services are available now, near you...
03/02/2019

Quality Pediatric Health Services are available now, near you...

Address

Near Pahade Corner, Bh SBI Bank, Mandir-Pundliknagar Road
Aurangabad
431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saishri children's hospital & Dental clinic, bh. SBI Bank, Garkheda, A'bad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category