22/07/2026
🌹 स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अभिवादन! 🌹
✅व्यसनमुक्त आदरणीय अजितदादा पवार✅
“महान माणसे शरीराने आपल्यात नसली, तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची प्रेरणा समाजाला कायम दिशा देत राहते.”
* लहानपणापासूनच सहकार चळवळ आणि ग्रामीण विकासाशी त्यांचा जवळचा संबंध होता.
राजकीय प्रवास
* सहकारी संस्थांमधून सार्वजनिक जीवनाची सुरुवात.
* १९९१ मध्ये बारामती मतदारसंघातून प्रथमच विधानसभेत निवडून आले.
* त्यानंतर अनेक वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवडून आले.
* महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले.
* कृषी, जलसंपदा, वित्त, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली.
* विविध सरकारांमध्ये काम करताना प्रशासनातील कार्यक्षमता आणि तातडीच्या निर्णयांसाठी त्यांची विशेष ओळख निर्माण झाली.
कार्यशैली
अजितदादांची कार्यशैली अशी मानली जात असे:
* जलद निर्णयक्षमता
* वेळेचे काटेकोर नियोजन
* विकासकामांवर भर
* अधिकाऱ्यांकडून कामात शिस्त आणि जबाबदारीची अपेक्षा
* बारामतीच्या विकासासाठी विशेष योगदान
उल्लेखनीय योगदान
* ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास
* सिंचन आणि जलसंपदा प्रकल्प
* सहकार क्षेत्राची मजबुती
* राज्याच्या अर्थसंकल्पीय नियोजनात सक्रिय भूमिका
* शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी विविध उपक्रम
“सत्तेचा उपयोग स्वतःसाठी नव्हे, तर जनतेच्या विकासासाठी व्हावा, हीच खरी लोकसेवा.”
आज अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्र, मुख्यालय भंडारा येथे व्यसनमुक्त स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अभिवादन व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य मा. यशवंत सोनकुसरे हे उपस्थित होते. त्यांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी, सुसंस्कृत व जबाबदार जीवन जगावे, असे आवाहन केले.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच मा. यशवंत सोनकुसरे हे देखील व्यसनमुक्त जीवन जगत समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत असून, त्यांच्या विचारांतून उपस्थितांना सकारात्मक संदेश मिळाला.
💐 “व्यसनमुक्त व्यक्ती म्हणजे सशक्त कुटुंब, सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र.”
आयोजक
अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्र, मुख्यालय भंडारा
Ajit Pawar Sunetra Ajit Pawar
Parth Ajit Pawar