I E C Health Beed

I E C Health Beed आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड

08/09/2026

*महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित बळकटी देणाऱ्या ‘प्रगती’प्रकल्पास राज्य मंत्रीमंडळ...
08/09/2026

*महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित बळकटी देणाऱ्या ‘प्रगती’प्रकल्पास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता*

*४,२५० कोटींच्या प्रगती प्रकल्पाला मंजुरी; पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर*

मुंबई, दि.08.09.26 : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘प्रगती’ (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration) या राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

सन २०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ₹४,२५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ७० टक्के म्हणजे सुमारे ₹२,९७५ कोटी कर्ज, तर ३० टक्के म्हणजे ₹१,२७५ कोटी राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे.

असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचाराला प्रकल्पात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, CKD, COPD, स्ट्रोक, मानसिक आरोग्य, डायबेटिक रेटिनोपॅथी, फॅटी लिव्हर, पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पिस सेवांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर screening, counselling, जनजागृती, Behaviour Change Communication आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे capacity building यावर भर दिला जाणार आहे. Breast, Cervical आणि Oral Cancer यांच्या तपासणी व निदान सुविधाही अधिक सक्षम करण्यात येणार असून, कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचारासाठी आवश्यक तंत्रज्ञान व मनुष्यबळाला बळकटी दिली जाणार आहे.

‘महाराष्ट्र हेल्थ टेक्नॉलॉजी मिशन’च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाला गती देण्यात येणार आहे. डिजिटल आरोग्य नोंदी, आरोग्य माहिती प्रणालींचे एकत्रीकरण, टेलिमेडिसिन आणि विविध डिजिटल तंत्रज्ञानाधारित सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आरोग्य सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचविणे, विविध स्तरांवरील सेवांमध्ये समन्वय वाढविणे आणि रुग्णाला सातत्यपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

पाच जिल्ह्यांतील रुग्णालयांना मिळणार मोठी बळकटी देण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि नांदेड येथे प्रत्येकी ५०० खाटांची नवीन जिल्हा रुग्णालये, पुणे येथे २०० खाटांचे संदर्भसेवा रुग्णालय (RRH), तर लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकूण १,६०० खाटांची क्षमता वाढणार असून, त्यासाठी अंदाजे ₹१,५०० कोटींचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. जिल्हास्तरावरच निदान, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने तृतीय स्तरावरील रुग्णालयांवरील अनावश्यक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

‘प्रगती’ प्रकल्पामुळे आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलणार असून, नागरिकांना अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि एकात्मिक आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. असंसर्गजन्य आजार (NCD)आणि कर्करोगाचे वेळेत निदान, उपचार व पाठपुरावा, मानसिक आरोग्य, पॅलिएटिव्ह केअर, डिजिटल हेल्थ आणि रुग्णांच्या सातत्यपूर्ण उपचार व्यवस्थेला या प्रकल्पातून बळ मिळणार आहे.

आरोग्य सेवांचे एकत्रीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापनातील सुधारणा यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढून नागरिकांचा आरोग्यावरील स्वखर्च कमी करण्यास तसेच Universal Health Coverage आणि SDG-3च्या उद्दिष्टपूर्तीस चालना मिळणार आहे

07/09/2026

बीड...
आज दिनांक 7/09/26 रोजी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे पोषण सप्ताह साजरा करण्यात आला.

06/09/2026

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’; कामगिरीवर ठरणार अधिकाऱ्यांची पुढची जबाबदारी!

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन; उत्कृष्ट काम करणाऱ्यांना संधी, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य.

#मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीच्या आधारे अधिकाऱ्यांना संधी देण्याची नवी कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच पुढील तीन वर्षात काय करणार याचे नियोजन याचा भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळीही केला जाणार आहे.

या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात केवळ सेवाज्येष्ठतेला नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला महत्त्व मिळणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारी देण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासही मदत होणार आहे.

🟠 तीन वर्षांच्या कामगिरीचा ‘रिपोर्ट कार्ड’:

३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती अद्ययावत करून त्यांचे गुणांकन केले जाणार आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

या गुणांकनानुसार अधिकाऱ्यांचे अ, ब, क, ड अश्या चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. म्हणजेच, तीन वर्षांची कामगिरी आता अधिकाऱ्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. व दरवर्षी असे गुणांकन केले जाणार आहे.

🟠 रुग्णसेवेपासून डिजिटल कामकाजापर्यंत ११ कसोट्या:
अधिकाऱ्यांचे गुणांकन करताना केवळ कागदोपत्री कामकाजाचा विचार न करता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

लोकाभिमुखता आणि तक्रार निवारणापासून सुरुवात करून नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण व संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि CSR निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे.

आरोग्य संस्थांमध्ये आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाहीही गुणांकनाचा भाग असेल. अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळाचे व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार व अपघातांच्या काळातील कामगिरीलाही महत्त्व दिले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रमांची अंमलबजावणी, शासनाच्या विशेष अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र, पॅलेटिव्ह केअर अभियान, कर्करोगमुक्त महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांतील योगदानाचाही विचार केला जाणार आहे.

त्यासोबतच आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य विभागाच्या विविध पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे,महाकर्मी पोर्टलवरील कामकाज, तसेच एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी या डिजिटल व योजनाधारित कामगिरीलाही गुण दिले जाणार आहेत.याच बरोबर पुढील तीन वर्षात कार्याचे काय नियोजन असणार आहे याचाही विचार केला जाणार आहे .

🟠 गुणवत्तेसोबत सचोटीलाही तितकेच महत्त्व:
अधिकाऱ्यांच्या नामनिर्देशनासाठीही स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील आणि किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित अथवा प्रस्तावित नसणे, अपहाराच्या प्रकरणात सहभाग नसणे आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नसणे आवश्यक आहे.
उत्कृष्ट चारित्र्य आणि निर्विवाद सचोटी हा देखील नामनिर्देशनाचा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केवळ कामाची आकडेवारी नव्हे, तर अधिकाऱ्याची प्रशासकीय प्रतिमा आणि प्रामाणिकपणालाही महत्त्व मिळणार आहे.

🟠 ‘काम करणाऱ्याला संधी’चा स्पष्ट संदेश
सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची योग्य दखल आणि त्यानुसार पुढील संधी मिळावी, हा या निर्णयाचा केंद्रबिंदू आहे.

यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णसेवा, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास चालना मिळणार आहे. नियुक्त्या आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपात गुणवत्ता व पारदर्शकतेला अधिक महत्त्व मिळणार असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजातही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

आबिटकरांच्या नेतृत्वाखाली ‘परफॉर्मन्स बेस्ड’ प्रशासन
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्यानुसार जबाबदाऱ्या आणि संधी देण्याची ही पद्धत महत्त्वाची ठरणार आहे.

या प्रक्रियेला प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय अनुभवाची साथ मिळणार आहे. तीन वर्षांची कामगिरी, १०० गुणांचे मूल्यांकन आणि स्पष्ट श्रेणीकरण यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येणार आहे.

‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित ही व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागातील पारंपरिक कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आकाराला येणारी ही कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती आरोग्य विभागासाठी आदर्श व नाविन्यपूर्ण ठरणार असून लोकाभिमुख आरोग्यसेवा प्रत्यक्ष साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Prakash Abitkar

आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आढावा बैठक #पुणे, दि. ५ स...
06/09/2026

आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आढावा बैठक

#पुणे, दि. ५ सप्टेंबर : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कामकाजाचा तसेच माध्यम व जनसंपर्क यंत्रणेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील NCCRC येथे शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) ही आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस डॉ. विजय कंदेवाड, संचालक (प्राथमिक), पुणे, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, पुणे येथील ब्युरो प्रमुख तसेच जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी उपस्थित होते. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

🔵 माध्यमांशी समन्वय वाढवून योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा

बैठकीच्या दुसऱ्या सत्रात माध्यम व सोशल मीडिया कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध आरोग्य सेवांची अधिकृत व वस्तुनिष्ठ माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा, असे निर्देश श्री. काटकर यांनी दिले.

राज्यातील तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रिंट, डिजिटल, सॅटेलाइट न्यूज चॅनेल आणि सोशल मीडिया माध्यमांचे नियमित निरीक्षण करावे. आरोग्य विभागाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या, वृत्त, व्हिडिओ, पोस्ट तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया व संदेश यांची तात्काळ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाशी संबंधित चुकीची, दिशाभूल करणारी अथवा अपूर्ण माहिती प्रसारित झाल्यास संबंधित कार्यालयांकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊन तातडीने तथ्यात्मक खुलासा करावा, असे निर्देश देण्यात आले. महत्त्वाच्या माध्यमांतील बातम्यांना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रभावी ‘मीडिया रिस्पॉन्स मेकॅनिझम’ विकसित करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या योजना व उपक्रमांची अधिकृत आणि सकारात्मक माहिती सोशल मीडिया माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दैनंदिन नियोजन करावे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, सूचना, प्रतिक्रिया व प्रश्नांचे वर्गीकरण करून संबंधित कार्यालयांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

🔵 जिल्हानिहाय सोशल मीडिया अहवाल नियमित सादर करण्याचे निर्देश

प्रत्येक जिल्ह्यातील सोशल मीडिया कामकाजाचा नियमित आढावा घेण्यासाठी जिल्हानिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या अहवालामध्ये सोशल मीडिया पोस्ट व कंटेंटची संख्या, आरोग्यविषयक जनजागृती मोहिमा, महत्त्वाच्या आरोग्यविषयक उपक्रमांची प्रसिद्धी, सोशल मीडिया Reach व Engagement, नागरिकांच्या प्रतिक्रिया व तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या, चुकीच्या अथवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवरील कार्यवाही तसेच स्थानिक पातळीवरील सकारात्मक बातम्या व यशोगाथांचा समावेश असावा, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच पुढील दिवस व आठवड्यासाठी प्रस्तावित जनजागृती उपक्रमांचे नियोजन करून त्याचा जिल्हानिहाय अहवाल सादर करावा. जिल्ह्यांकडून प्राप्त अहवालांचे राज्यस्तरीय एकत्रित संकलन करून त्याचा नियमित आढावा सादर करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. काटकर यांनी दिल्या.

आरोग्य विभागाच्या सेवा आणि योजनांची अचूक माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे, तसेच नागरिकांच्या प्रश्नांना व माध्यमांच्या वृत्तांना तातडीने प्रतिसाद मिळणे, यासाठी आरोग्य विभागाची माहिती, जनसंपर्क व सोशल मीडिया यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar
Sanjay Shripatrao Katkar


06/09/2026
NRC बीड मध्येरक्षाबंधन : डॉ संध्या हुबेकर बीड: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संचलित जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथील ...
03/09/2026

NRC बीड मध्ये
रक्षाबंधन : डॉ संध्या हुबेकर
बीड: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संचलित जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथील राष्ट्रीय पोशाहार पुनर्वसन केंद्रात नुकतेच राखी पौर्णिमा निमित्ताने कुपोषित बालकांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम इन्चार्ज डॉ संध्या हुबेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी NRC मध्ये ऍडमिट कुपोषित बालकांना फ्रुट बास्केट आणि भेटवस्तू देऊन आणि राखी बांधून त्यांना औक्षण करून डॉ संध्या आणि टीम यांनी बालकांना औक्षवंत आणि सुदृढ आयुष्याचा आशीर्वाद दिला.
विशेष म्हणजे भरती बालकांचे माता पालक सुद्धा या अनोख्या प्रोग्राम मुळे हरखून गेले आणि त्यांनी सुद्धा NRC स्टाफ चे आभार व्यक्त केले.
बीड येथील NRC नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चांगली वाटचाल करीत आहे हे विशेष.या प्रसंगी आहार समुपदेशिका यांनी माता पालक यांना बॅलन्स डाएट बाबत महत्वपूर्ण टिप्स दिल्या. डॉ संध्या हुबेकर यांनी आवाहन केले की कुपोषण मुक्त बीड चा संकल्प करू या.

28/08/2026

Address

Z. P. Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I E C Health Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share