31/12/2025
जिल्ह्यात पहिल्यांदाच फक्त २ दिवसांच्या, १.५ किलो वजनाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया.
श्री सिद्धिविनायक सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटल मधे आता नवजात व बाल शस्त्रक्रिया विभाग देखील सुरू.
बीड: बीड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरणाऱ्या एका ऐतिहासिक वैद्यकीय यशामध्ये, फक्त २ दिवसांचे, १.५ किलो वजनाचे अकाली (प्रीटर्म) बाळ यांच्यावर अॅनोरेक्टल मालफॉर्मेशन (गुदद्वार न उघडणे) या गंभीर जन्मजात आजारावर बीडमध्ये प्रथमच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया बीड शहरातील श्री सिद्धिविनायक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्राम गृह शेजारी, नगर रोड बीड येथे पार पडली.
या रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
ही अतिशय गुंतागुंतीची व नाजूक बालशस्त्रक्रिया प्रसिद्ध बालशल्यचिकित्सक एमसीएच सर्जन डॉ. नागेश उंदरे यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान सुरक्षित व दक्ष भूल व्यवस्थापन भूलतज्ज्ञ डॉ. तुकाराम बडे यांनी केले. यावेळी या रुग्णालयातील आरएमओ डॉ. झिशान मोमीन, ओटी तंत्रज्ञ दयानंद राठोड, शिवाजी वांडरे, राम मंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
बाळाची शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर असून समाधानकारक सुधारणा होत आहे. अधिक उपचारांसाठी बाळाला याच रुग्णालयाच्या NICU मध्ये भरती केले आहे.
ही कामगिरी वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून, बीडच्या आरोग्यसेवेसाठी हा एक अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
बीड जिल्ह्यात अद्ययावत व प्रगत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री सिद्धिविनायक सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटल ओळखले जाते.
या रुग्णालयात कर्करोग , किडनी, हृदयरोग व कॅथलॅब, नेत्ररोग, कान नाक घसा, जॉइंट रिप्लेसमेंट, मणक्यांचे आजार, छातीरोग, अशा विविध एक ना अनेक आजारावर उपचार व शस्त्रक्रिया आधीपासूनच विविध शासकीय योजनेतून मोफत करण्यात येत आहेत.
आता नवजात व बाळांसाठी शस्त्रक्रिया विभाग सुरू करून त्यासाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
श्री सिद्धिविनायक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता बाल शक्यचिकित्सक व त्या साठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना छ. संभाजीनगर, पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांकडे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली, ह्यासाठी खाजगी रुग्णालयात यासाठी ३ ते ४ लाख रुपयाचा खर्च लागतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही उच्च दर्जाच्या उपचारांचा लाभ श्री सिद्धिविनायक सुपरस्पेशियालीटी हॉस्पिटल च्या माध्यमातून बीड शहरातच अगदी मोफत मिळणार आहे.