Dr Kishor warpe

Dr Kishor warpe डॉक्टर आणि समाजसेवक

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातील संकुचित व प्रतिगामी विचारांना आव्हान दिलं. त्यांनी पुरोगामी विचार...
03/01/2026

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातील संकुचित व प्रतिगामी विचारांना आव्हान दिलं. त्यांनी पुरोगामी विचारांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत, समाजात स्त्रियांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य समर्पित केलं. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जातीव्यवस्था व अज्ञानाविरुद्ध प्रखर लढा देत, सामाजिक न्याय व समतेची शिकवण दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

“डॉ. बाबा आढाव यांना विनम्र श्रद्धांजली 🙏🌸”सत्यशोधक परंपरेचा दीप हातात घेऊन आयुष्यभर समाजातील अन्यायाविरुद्ध लढणारे, वंच...
08/12/2025

“डॉ. बाबा आढाव यांना विनम्र श्रद्धांजली 🙏🌸”

सत्यशोधक परंपरेचा दीप हातात घेऊन आयुष्यभर समाजातील अन्यायाविरुद्ध लढणारे, वंचितांच्या हक्कांसाठी झगडणारे डॉ. बाबा आढाव यांचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत.

महात्मा जोतिराव फुले–सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांना त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवले— अन्याय, अंधश्रद्धा, विषमता आणि शोषणाविरुद्ध कठोर भूमिका घेत समाजाच्या तळागाळातील प्रत्येक माणसाला “मानव” म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केले.

‘एक गाव, एक पाणवठा’, असंघटित कामगारांची संघटना, सामाजिक भेदभावाविरुद्धचा सततचा लढा— ही त्यांच्या सत्यशोधक वृत्तीची जिवंत उदाहरणे आहेत.

बाबांची साधेपणातील महानता, कार्यातील प्रामाणिकता आणि अन्यायाविरुद्धची निर्भीड भूमिका नेहमीच प्रेरणा देत राहील.

सत्य, न्याय आणि मानवतेसाठी झटणाऱ्या या ज्येष्ठ समाजसुधारकास विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏🌸

सरकार येडेचाळे करू नये
29/08/2025

सरकार येडेचाळे करू नये

29/08/2025

सर्व समाज बांधवांना विनंती आहे स्वतःच्या तब्येतची काळजी घ्यावी कारण मुंबई चे वातावरण गावगड्यातील बांधवांना सूट होणार नाही त्यात पाऊस जोर धरून आहे आणि आपली सोय चांगली नाई तरी सर्वांनी पाणी आणि जेवण व झोपच्या वेळा पाळा म्हणजे आजारी पडणार नाही
काळजी घ्या 🙏🙏
#मराठासेवकडॉकिशोरवरपे
#मुंबई 🚩🚩

मुंबईकरांनो,तुमच्या शहरात येणारी मराठा माणसं साधी, भोळी आहेत.गावखेड्यातले शेतकरी, कष्टकरी—यातील ९०% लोक पहिल्यांदाच मुंब...
28/08/2025

मुंबईकरांनो,
तुमच्या शहरात येणारी मराठा माणसं साधी, भोळी आहेत.
गावखेड्यातले शेतकरी, कष्टकरी—
यातील ९०% लोक पहिल्यांदाच मुंबईच्या गगनचुंबी इमारती बघणार आहेत.
त्यांनी आतापर्यंत या इमारती फक्त टीव्हीवर पाहिल्या होत्या.

आता ते जेव्हा इथे येतील,
तेव्हा इमारतींसोबत तुमचं मोठं मनही त्यांना दिसू द्या.
शक्य असेल तर
त्यांना प्यायला घोटभर पाणी,
आणि खायला अर्धा भाकरी
माणुसकीच्या नात्याने द्या.

ही मदत त्यांच्या जगण्यात कायम लक्षात राहील,
आणि तुमच्या मुंबईचं नाव अजून मोठं करेल.

एक मराठा लाख मराठा

28/08/2025
 #मुंबईला आलोच 🚩🚩
28/08/2025

#मुंबईला आलोच 🚩🚩

Address

Warpe Clinic Samrat Chowk Pangari Road Beed
Bhir
431122

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Kishor warpe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category