23/08/2022
चाळीसगाव/रांजणगाव 21 ऑगस्ट:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे यशवंत सर्वांगिण विकास संस्था आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने " महिला आरोग्य मेळावा २०२२" घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. निलांबरी तेंडुलकर (स्री रोग तज्ञ) आणि डॉ. पायल पवार (मानसोपचार तज्ञ) यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. पायल पवार यांनी महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शन करताना त्यांनी मन म्हणजे काय? ते कसे आजारी पडू शकते याविषयी माहिती दिली तसेच दैनंदिन जीवन जगताना ताणतणावाचा आणि कामकाजाचा प्रभाव आपल्या मानसिकतेशी कशाप्रकारे जुळलेला आहे हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि हसत खेळत समजावून सांगितले.