Ayuryog Ayurvedic and Panchkarma Clinic

Ayuryog Ayurvedic and Panchkarma Clinic It's New beginning of Health and New beginning of Ayurvedic Lifestyle. By means of Ayurveda, Panchka

First Branch:
Akurdi : Shop no. 77, Ground Floor, E – Wing, Mayur Samruddhi, Akurdi, Pune – 35
Time:
Mon-Sat: Morning: 9:30 AM – 1:00 PM,
Evening: 5:30 PM – 9:30 PM
Second Branch:
Chinchawad : Kohinoor, 5 Ganesh Nagar, Near Satav Lab, Chinchwad Station, Pune – 19
Time:
Every Wednesday:
Morning : 10:00AM–01:00PM
Evening : 06:00PM–09:00PM
Every Friday :
Morning : 10:00AM–01:00PM
Evening : 06:00PM–09:00PM

आचार्य महर्षी चरक जयंतीनिमित्त शतशः नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻
25/07/2020

आचार्य महर्षी चरक जयंतीनिमित्त शतशः नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻

आयुर्योग आयुर्वेदिक व पंचकर्म क्लिनिकआज 3 वर्षे पूर्ण 👍सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏                                       #आय...
01/07/2020

आयुर्योग आयुर्वेदिक व पंचकर्म क्लिनिक
आज 3 वर्षे पूर्ण 👍
सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏

#आयुर्योग #आयुर्वेदिक #आयुर्वेद

जागतिक आरोग्य दिन २०२०International Health Day 2020दरवर्षीपेक्षा आजचा आरोग्य दिनाचे औचित्य फारच वेगळे आहे. विश्वातील जवळ...
07/04/2020

जागतिक आरोग्य दिन २०२०
International Health Day 2020

दरवर्षीपेक्षा आजचा आरोग्य दिनाचे औचित्य फारच वेगळे आहे. विश्वातील जवळपास सर्व देश शक्य त्या युद्धपातळीवर कोरोनाच्या विषाणूशी लढत आहेत.

यामध्ये वैयक्तिक प्रतिकारशक्ती, स्थानिक तापमान, विषाणूची ताकत व त्यातील बदल. हे सर्व मुद्दे महत्वाचे आहेतच.

पण या सर्वांपेक्षा हा आजार थांबण्यासाठी महत्वाचे ठरले ते
स्वस्थवृत्त अर्थात
● वेळोवेळी ची शारीरिक स्वच्छता
● आजार पसरू नये म्हणूनचे रोगप्रतिबंधक उपाय
● निर्जंतुकीकरण
● समाजात अंतर ठेवून राहण्याचा नियम
● आणि महत्वाचे हे सर्व करताना जागरूकता, संयमीपणा, कॉमन सेन्स, आत्मविश्वास इ.

यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले ते म्हणजे आरोग्यम् धनसंपदा.
तरी आपण हे सर्व नियम पाळून हा लढा यशस्वी करूयात. स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य सांभाळा. सर्वांनी काळजी घ्या आणि इतरांना ही काळजी घेण्यास प्रवृत्त करा.

https://www.instagram.com/p/B-q8m14Dhkt/?igshid=192bedg9lx5w9

अन्तर्राष्ट्रीय महिला दिनस्य शुभाशयाः।👧👩👵👩‍⚕️👩‍🎓👩‍🏫👩‍⚖️👩‍🔬👩‍🚀 ..... 💐🙏
08/03/2020

अन्तर्राष्ट्रीय महिला दिनस्य शुभाशयाः।

👧👩👵👩‍⚕️👩‍🎓👩‍🏫👩‍⚖️👩‍🔬👩‍🚀 ..... 💐🙏

जीवनशैलीजन्य आजार आणि आयुर्वेदक्रांतिसूर्य प्रतिष्ठान वार्षिक स्मरणिका २०२० मधील प्रकाशित लेख(टीप: मुद्रणातील चुका समजून...
27/01/2020

जीवनशैलीजन्य आजार आणि आयुर्वेद
क्रांतिसूर्य प्रतिष्ठान वार्षिक स्मरणिका २०२० मधील प्रकाशित लेख
(टीप: मुद्रणातील चुका समजून वाचा, धन्यवाद) 👍🏻

#आयुर्योग #आयुर्वेदिक #आयुर्वेद

तिळातील स्निग्धता, गुळातील गोडवा,आपल्यासर्वांच्या आयुष्यात आणि समाजात, प्रेम आणि मधुरता निर्माण करो मकरसंक्रमणाच्या शुभे...
15/01/2020

तिळातील स्निग्धता, गुळातील गोडवा,
आपल्यासर्वांच्या आयुष्यात आणि समाजात,
प्रेम आणि मधुरता निर्माण करो
मकरसंक्रमणाच्या शुभेच्छा 🙏🏻
😊 तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला 😊

नूतनवर्षस्य शुभाशया: २०-२० 💐👍
01/01/2020

नूतनवर्षस्य शुभाशया: २०-२० 💐👍

कृषिवलदिनस्य शुभाशया: 🙏🙏
23/12/2019

कृषिवलदिनस्य शुभाशया: 🙏🙏

World AIDS Day2019 theme : Communities make the differenceम्हणजेच समाजाद्वारे केलेले किंवा होणारे बदलहा आजार होऊ नये यास...
01/12/2019

World AIDS Day

2019 theme : Communities make the difference
म्हणजेच समाजाद्वारे केलेले किंवा होणारे बदल

हा आजार होऊ नये यासाठी अथवा झाल्यास त्यासाठी समाजाने जी पावले उचलली आहेत ती आणखी जोमाने करावीत आणि आणखी कोणकोणती पावले उचलू शकतो, याकडे लक्ष द्यावे.

ही पावले उचलण्यात आयुर्वेदाचा नक्कीच उपयोग समाज करतोय व तो आणखी करावा. या आजारात अनेक पायऱ्या असतात, त्या सर्व पायऱ्यात आयुर्वेद नक्की उपयोगी येऊ शकतो. या पायऱ्या कोणत्या ?

● HIV infection होऊ नये यासाठी
- आयुर्वेदवर्णित सदवृत्त, स्वस्थवृत्त व सदाचार पालन, शारीरिक पापकर्मे होऊ नयेत याकडे लक्ष देणे
● HIV infection झाल्यास non-symptomatic phase जास्तीत जास्त काळ रहावी यासाठी (अर्थात HIV test केल्यास व Positive आल्यास, त्यामुळे test करणे महत्वाचे)
- आयुर्वेदवर्णित दिनचर्या, ऋतुचर्या यांचे पालन, प्रतिकारक्षमता वाढविणारी औषधे घेणे
● AIDS मध्ये रूपांतर झाल्यास opportunistic infection कमी व्हावेत यासाठी
- आयुर्वेदिक पंचकर्म आणि रसायन औषधांचा वापर करणे

समाजाने घेऊन पुढाकार, आयुर्वेदाचा घेऊन आधार
करू AIDS चा प्रतिकार, दूर सारू अंधःकार

#आयुर्योग #आयुर्वेदिक #आयुर्वेद #अष्टांगहृदय #वाग्भट्ट

जागतिक मूळव्याध दिवसWorld Piles Dayमूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतील भागात असलेल्या रक्तवाहिन्यांचे जाळे सैल सुटते आणि ...
20/11/2019

जागतिक मूळव्याध दिवस

World Piles Day

मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतील भागात असलेल्या रक्तवाहिन्यांचे जाळे सैल सुटते आणि त्यामुळे हाताला कोंब किंवा मोड लागतो. बऱ्याचदा यामध्ये वेदना व रक्तस्त्राव ही लक्षणे दिसतात. या स्थितीलाच मूळव्याध म्हणतात.

मुख्यतः मूळव्याध होऊ नये या दृष्टीने मलावष्टंभ न होणे महत्वाचे आहे. म्हणजेच पोट व्यवस्थित साफ होणे व ते होत असताना जोर दयावा न लागणे हे महत्वाचे आहे. जर याकडे लक्ष दिले नाही तर याची प्रवृत्ती मूळव्याधाकडे होऊ शकते.

मलावरोध / मलावष्टंभ होऊ नये यासाठी -
● जड पदार्थ कमी प्रमाणात खावेत
● रात्री झोपताना दूध व तूप घ्यावे
● सकाळी योगासने करावीत
● सकाळी लवकर उठावे
● चावून खावे लागतील अशा पदार्थांचा आहारात समावेश जास्त असावा
बेकरी प्रोडक्ट कमी खावेत
● संतुलित आहार घ्यावा

"लक्ष द्या मलावरोधकडे आणि टाळा मूळव्याधाला"

https://shop.ayuryogclinic.com/

https://www.instagram.com/p/B5FDWxxHsrO/?igshid=1lvuh705oa6g6

#आयुर्योग #आयुर्वेदिक #आयुर्वेद #अष्टांगहृदय #वाग्भट्ट

सर्वांना दीपावलीच्या आरोग्यदायी शुभेच्छा 🙏🙏     #दिवाळी  #दीपावली  #दिवाळी2019  #आरोग्य    #शुभेच्छा
27/10/2019

सर्वांना दीपावलीच्या आरोग्यदायी शुभेच्छा 🙏🙏

#दिवाळी #दीपावली #दिवाळी2019 #आरोग्य #शुभेच्छा

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 🌱🌿‘हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितम् |मानं च तत्व यत्रोक्तं आयुर्वेदः स उच्यते ॥आयुष्य हे ...
25/10/2019

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 🌱🌿

‘हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितम् |
मानं च तत्व यत्रोक्तं आयुर्वेदः स उच्यते ॥
आयुष्य हे हितकर, अहितकर, सुखदायक किंवा दुःखदायक रीतीने जगता येऊ सकते. मात्र आयुष्यासाठी हितकर काय व अहितकर काय आणि आयुष्याचे मान ज्यामध्ये समजावले आहे त्याला आयुर्वेद म्हणतात.

आयुष्याचा वेद म्हणजेच आयुर्वेद.

त्याचप्रमाणे या आयुर्वेद शास्त्राचे मुख्य प्रयोजन -
रोगांचे निवारण करणे किंवा पीडितांची चिकित्सा करणे व त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शरीराला, मनाला रोगच होऊ न देणे म्हणजे नेहमी आरोग्यसंपन्न, निरोगी राहणे.

आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, सद्वृत्त पालन तसेच आहार-निद्रा-ब्रह्मचर्य या त्रयोपस्तंभाच्या संबंधीचे नियम वगैरे सगळ्या गोष्टी आरोग्यरक्षणाच्या उद्देशाने सांगितलेल्या आहेत.

प्रकृतीनुरूप आहार आचरण ठेवले, दैनंदिन व्यवहारात – आचरणात आयुर्वेदाने सांगितलेल्या नियमांचे पालन केले, आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली, वेळेवर शरीरशुद्धी केली, रसायन कल्पाची योजना केली, शरीरधातूंचे रक्षण केले, योगसाधना केल्यास, शरीर, मन तसेच आत्मा प्रसन्न राहून खर्‍या अर्थाने आरोग्याचा अनुभव घेता येईल.

त्याचप्रमाणे आज धन्वंतरी जयंतीनिमित्त सर्वांना आरोग्य लाभो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻

धन्वंतरी स्तोत्र -
ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः।
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम ।।
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम ।।
श्री धन्वंतरये नम: 🙏🏻🙏🏻🙏🏻

https://shop.ayuryogclinic.com/blogs/

https://www.instagram.com/p/B4B6lWyHuJz/?igshid=cc6gywevjbx0

#आयुर्वेददिवस #धन्वंतरी #आयुर्योग #आयुर्वेदिक #आयुर्वेद #वाग्भट्ट

Address

Chinchwad Gaon Road
Chinchwad
411033

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 9pm
Thursday 10am - 1pm
6pm - 9pm
Friday 10am - 1pm
6pm - 9pm
Saturday 10am - 1pm
6pm - 9pm

Telephone

+919890913566

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayuryog Ayurvedic and Panchkarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category