08/03/2023
आपण सर्वांनी अनुभवले असेल वर्षागणिक उन्हाळ्याचे प्रमाण हळूहळू वाढतच आहे . मागील वर्षापेक्षा येणाऱ्या वर्षात उन्हाचे प्रमाण अधिकच असते. वाढत्या उन्हाळ्यामागे बरीच कारणे आहेत. अमर्यादित झालेली वृक्षतोड, प्रदूषण, ओझोनचे कमकुवत झालेले आवरण इत्यादी. वाढता उन्हाळा आपल्या आरोग्यावर परिणाम करीत असतो, त्याचबरोबर आपल्या त्वचेवर देखील याचा अपायकारक परिणाम होत असतो.
उन्हाळ्यामध्ये अतिरिक्त उष्म्यामुळे शरीरातील पाण्याचे पर्यायाने त्वचेतील ओलाव्याचे देखील प्रमाण कमी होते. वाढत्या उन्हाचे त्वचेवरती काही अपायकारक परिणाम होत असतात.
१) उन्हामुळे त्वचा कोरडी रुक्ष होते होते. Dryness.
२) गोऱ्या लोकांची त्वचा उन्हामुळे दग्ध होते. Burn.
३) सावळ्या किंवा कृष्ण वर्ण असणाऱ्या लोकांची त्वचा अजूनच काळी पडते. Tanning.
४) सतत शरीरावरती घाम राहिल्यामुळे बुरशीजन्य विकार म्हणजेच गजकर्ण नायटा उठण्याचे प्रमाण वाढते.
५) त्वचा दग्ध झाल्याने चेहऱ्यावरती काळे डाग पडतात.
उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो-
सर्वात प्रथम आपण जी गोष्ट करू शकतो ती म्हणजे त्वचेचे उन्हापासून संरक्षण Protection
१)उन्हात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण सनकोट वापरू शकतो टोपी किंवा हॅट चा वापर करणे हितकारक असते.
२)आपला चेहरा रुमाल किंवा स्कार्फ ने बांधावा.
३) उन्हाळ्यात सन स्क्रीन लोशनचा वापर करावा , सन स्क्रीन लोशन घेत असताना त्याचा सन प्रोटेक्शन फॅक्टर किमान 30 असणे आवश्यक आहे.
४) त्वचा तजेलदार दिसण्यासाठी मॉइश्चरायझर चा वापर करावा.
५) तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य तो फेसवॉश वापरावा.
६) दिवसातून किमान तीन वेळा आपला चेहरा पाण्याने फेसवॉशने धुवावा.
७) शरीरावर येणारा अतिरिक्त घाम कोरड्या कापडाने नियमितपणे पुसून घ्यावा.
८) घामोळ्यांसाठी घामोळ्या नाशक पावडर वापरू शकता.
९) त्वचेवर खाज येत असेल तर कॅन्डीड पावडर वापरू शकता.
उन्हाळ्यात निरोगी तजेलदार त्वचेसाठी घ्यावयाचा आहार
१) उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. आपल्या वजनाच्या प्रत्येक वीस किलोग्रॅम साठी एक लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
२) ऋतुमानानुसार येणारी फळे योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
३) कलिंगड आवळा संत्री मोसंबी द्राक्षे नारळ पाणी यांचे सेवन या ऋतूमध्ये मुबलक प्रमाणात करावे.
उन्हाळ्यात त्वचेची निगा कशी राखावी?
१) क्लीनसिंग- दुधाने चेहरा क्लीनसिंग करावा.
२) स्किन टोनिंग- गुलाब जलाने चेहऱ्याला हलका मसाज करून आपण स्किन टोनिंग करू शकतो.
3) स्क्रबिंग- चेहऱ्यावरील मृत पेशी काढण्यासाठी मध कॉफी पावडर आणि लिंबू यांचा वापर करून चेहरा स्क्रब करू शकतो.
४) मॉइश्चरायझर- चेहरा तजेलदार आणि ओलसर दिसण्यासाठी लोणी अथवा दुधाची साय आणि मध यांचा वापर करू शकतो.
डॉ. सागर पाटील.
त्वचा आणि सौदर्य शास्त्र तज्ञ
श्री आसावरी क्लिनिक
पाग नाका चिपळूण.
7709884279