Prime Marathi

Prime Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prime Marathi, Medical and health, Ramtirtha, Daryapur.
(1)

पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या एका टीएमसी कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममत...
09/08/2026

पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या एका टीएमसी कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी कांचरापारा येथे दाखल झाल्या. त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. 'चोर, चोर!' अशा घोषणा देत एका आंदोलकाने त्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यांच्यावर चिखल आणि चपलाही फेकण्यात आल्या. भाजपने आरोप केला की, माजी मुख्यमंत्री कांचरापारा येथे आंदोलने भडकवण्यासाठीच आल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली.

नागरी सहकारी बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकां...
09/08/2026

नागरी सहकारी बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून तुम्हीही रिझर्व्ह बँकेबाबतची मानसिकता बदला, असे आवाहन सहकारमंत्री अमित शाह यांनी देशातील शहरी सहकारी बँकांना केले आहे.

अमित शहांच्या प्रमुख उपस्थितीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनयूसीएफडीसी) नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासह सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील १,४०० हून अधिक शहरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील अन्य भागधारक उपस्थित होते.

सीमा सुरक्षा आणखी कडक होणार आहे. आता लष्करी जवान या भागात गस्त घालतील, पण हरित ऊर्जेच्या नावाखाली होणारी कोणतीही हालचाल ...
09/08/2026

सीमा सुरक्षा आणखी कडक होणार आहे. आता लष्करी जवान या भागात गस्त घालतील, पण हरित ऊर्जेच्या नावाखाली होणारी कोणतीही हालचाल देखील सुरक्षेच्या रडारखाली असेल. केंद्र सरकारने सौर, पवन आणि हायब्रीड ऊर्जा प्रकल्पांसंदर्भात नवीन सुरक्षा नियम जारी केले आहेत.

या नियमांनुसार, नियंत्रण रेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमांच्या १ किलोमीटरच्या परिघात कोणत्याही नवीन प्रकल्पाच्या कामाला परवानगी दिली जाणार नाही. या भागातील जमीन, बांधकाम आणि ऊर्जा प्रकल्पांसंदर्भातील सुरक्षा उपाययोजना लक्षणीयरीत्या अधिक कडक असतील. सीमेच्या इतक्या जवळ उभारले जाणारे मोठे ऊर्जा प्रकल्प केवळ वीज निर्मितीपुरते मर्यादित नाहीत. तिथे जमीन, परदेशी कंपन्या, कर्मचारी, ड्रोन आणि इतर तांत्रिक संसाधनांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. हा निर्णय सीमावर्ती भागातील सुरक्षा आणि विकास यांच्यात संतुलन साधण्याचा एक प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरविणाऱ्या हवाई दलातील विंग कमांडरला अटक करण्य...
09/08/2026

भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरविणाऱ्या हवाई दलातील विंग कमांडरला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित अधिकारी हा पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून पँग डाँग लाई या चीनी रिटेल कंपनीने अनोखे रजा धोरण लागू केले आहे. अलीकडेच कंप...
09/08/2026

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून पँग डाँग लाई या चीनी रिटेल कंपनीने अनोखे रजा धोरण लागू केले आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी "अनहॅपी लिव्ह" सुरू केली आहे. या नवीन धोरणांतर्गत, जर कर्मचाऱ्यांना मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत असेल, तर ते दरवर्षी 10 दिवसांपर्यंतची रजा घेऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष यू डोंगलाई म्हणतात की, कोणताही कर्मचारी नाखूश असताना किंवा दबावाखाली असताना त्याला काम करण्यास
भाग पाडले जाऊ नये.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
09/08/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*

अमेरिकेच्या सिनेटने रशिया आणि त्याचे पेट्रोलियम उत्पादनांचे प्रमुख खरेदीदारांवर दंड आकारणाऱ्या विधेयकाला बहुमताने मंजुरी...
08/08/2026

अमेरिकेच्या सिनेटने रशिया आणि त्याचे पेट्रोलियम उत्पादनांचे प्रमुख खरेदीदारांवर दंड आकारणाऱ्या विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली आहे. चीन, भारत यांच्यासह पाच देशांवर १०० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टॅरिफ लावणे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शक्य होणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सिनेटरने ट्रम्प प्रशासनाला धोक्याचा इशारा देत, भारताशी शत्रूत्व पत्करणे परवडणार नाही, असे म्हटले आहे.

मुलांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामापासून वाचवण्यासाठी आणि डिजिटल विश्वात त्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासा...
08/08/2026

मुलांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामापासून वाचवण्यासाठी आणि डिजिटल विश्वात त्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी संसदेत एक खासगी विधेयक सादर केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार बैजयंत पांडा यांनी तयार केलेल्या 'सेफगार्डिंग हेल्दी इंटरनेट एन्व्हायर्नमेंट्स फॉर लिटल डिजिटल-नेटिव्स' (SHIELD) विधेयक २०२५ मध्ये मुलांनी सोशल मीडिया खाती तयार करणे, डेटा गोपनीयता, ऑनलाइन गेमिंग आणि वैयक्तिकृत जाहिरात यांसाठी अधिक कठोर नियमांचा प्रस्ताव आहे. सततच्या गदारोळामुळे आणि कामकाज तहकूब झाल्यामुळे शुक्रवारी हे विधेयक संसदेत औपचारिकपणे सादर करता आले नाही.

शील्ड विधेयक १८ वर्षांखालील सर्व व्यक्तींना अल्पवयीन मानते. १३ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना आई वडील अथवा पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मिडिया अथवा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर आपले खाते उघडता येणार नाही. टेक कंपन्या मुलांच्या ऑनलाईन वर्तणुकीवर लक्ष ठेवतील. त्यांचे प्रोफाइलिंग करण्यावर किंवा त्यांच्या डेटाच्या आधारे वैयक्तिकृत जाहिराती दाखवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. मुलांचा डेटा केवळ सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या मयदिपर्यंतच जतन केला जाईल. खाते निष्क्रिय झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत तो हटवलाच पाहिजे. पालकांच्या विनंतीनुसार डेटा कायमस्वरूपी हटवणे अनिवार्य असेल.

भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील काही भागावर चीनने ताबा मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याबाबत सोशल मीडियावर चर्चांन...
08/08/2026

भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील काही भागावर चीनने ताबा मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे. या सर्व उलट-सुलट चर्चेवर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण दिले आहे. अरुणाचल प्रदेशमधील सुबनसिरी भागावर चीनने ताबा मिळवल्याचे सर्व दावे खोटे आहेत, त्याला काही आधार नाही. अशा अफवांना बळी पडू नये. भारतीय सेनेशी घुसखोरीच्या दाव्यांसंदर्भात चर्चा सुरू आहेत, असेही पेमा खांडू यांनी नमूद केले.

भारत, चीन, स्लोव्हाकिया, अझरबैजान आणि हंगेरी या देशांवर 100 टक्के शुल्क लावण्याचा विधेयक अमेरिकेच्या सिनेटने मंजुरी दिली...
08/08/2026

भारत, चीन, स्लोव्हाकिया, अझरबैजान आणि हंगेरी या देशांवर 100 टक्के शुल्क लावण्याचा विधेयक अमेरिकेच्या सिनेटने मंजुरी दिली आहे.
-

Address

Ramtirtha
Daryapur
444705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prime Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share