Dr Rohan & Dr Supriya Kulkarni

Dr Rohan & Dr Supriya Kulkarni Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Rohan & Dr Supriya Kulkarni, Medical and health, Deore hospital , Datta Mandir chowk, Deopur, Dhule.

15/08/2026

स्वातंत्र्यदिनानिमित्त महिला व गर्भवती मातांसाठी मोफत स्त्री आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

धुळे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महिला व गर्भवती मातांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देवरे हॉस्पिटल, दत्त मंदिर चौक, देवपूर, धुळे येथे रविवार, दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 1:00 पर्यंत

मोफत गर्भवती माता व स्त्री आरोग्य तपासणी शिबिराचे

आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुप्रिया रोहन कुलकर्णी (MBBS, MS ObGy, KEM Mumbai) यांच्याकडून महिला व गर्भवती मातांची तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध स्त्रीरोगांचे वेळेत निदान व्हावे तसेच गर्भावस्थेदरम्यान माता व बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जावी, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
शिबिरामध्ये स्त्रीरोग तपासणी, बीपी, रक्तगट, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर तपासणी आणि थायरॉईड प्रोफाइल यांसारख्या तपासण्या उपलब्ध असतील तसेच निवडक महिलांसाठी पॅप स्मिअर टेस्ट* मोफत करण्यात येणार आहे. गर्भवती मातांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शनासोबत सोनोग्राफी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याशिवाय शिबिराच्या निमित्ताने डिलिव्हरी व सिझेरियनसाठी नोंदणी, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया नोंदणी तसेच आवश्यक औषधे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिलांनी कोणतीही लक्षणे नसली तरी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व लक्षात घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुक महिला व गर्भवती मातांनी *826108109* या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्थळ : देवरे हॉस्पिटल, दत्त मंदिर चौक, देवपूर, धुळे, दिनांक : 16 ऑगस्ट 2026, रविवार, वेळ : सकाळी 9:00 ते दुपारी 1:00 पर्यंत
आजची तपासणी — उद्याच्या निरोगी मातृत्वाची आणि आरोग्यपूर्ण जीवनाची सुरुवात आहे.

🇮🇳 *स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🇮🇳*​महिला आणि गर्भवती मातांच्या* उत्तम आरोग्यासाठी *देवरे हॉस्पिटल, देवपूर,ध...
07/08/2026

🇮🇳 *स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🇮🇳

*​महिला आणि गर्भवती मातांच्या* उत्तम आरोग्यासाठी *देवरे हॉस्पिटल, देवपूर,धुळे* येथे *'मोफत स्त्री आरोग्य तपासणी शिबिर'* आयोजित करण्यात आले आहे.

​👩‍⚕️ तज्ञ मार्गदर्शन: *डॉ. सुप्रिया रोहन कुलकर्णी*
MBBS, MS ObGy(KEM Mumbai)
- स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ

​🗓️ *दिनांक: १६ ऑगस्ट २०२६ (रविवार)*
⏰ *वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी १:००*
🏥 *स्थळ: देवरे हॉस्पिटल, दत्त मंदिर चौक, देवपूर, धुळे.*

​🆓*शिबिरातील मोफत सुविधा:*

​स्त्रीरोग तपासणी व बी.पी.,
​रक्त गट,
हिमोग्लोबिन आणि रक्तातील साखर तपासणी,
​थायरॉईड प्रोफाईल,
​पॅप स्मीअर टेस्ट (निवडक),

​🎁 *विशेष सवलती (३०% सवलत):*

​डिलिव्हरी / सिझेरियन खर्च (फक्त नोंदणीसाठी),
​दुर्बीण (लॅप्रोस्कोपी) शस्त्रक्रिया नोंदणी,
​गर्भवती मातांसाठी सोनोग्राफी,
​सर्व औषधे,

​📝 *महत्त्वाची सूचना:*
​शिबिरात येताना कृपया आपले जुने रिपोर्ट आणि फाईल्स सोबत नक्की घेऊन या.

*​पूर्वनोंदणी आवश्यक आहे.*
​📞 नाव नोंदणीसाठी आजच संपर्क करा: *8261081091*

​🙏 कृपया हा मेसेज आपल्या परिसरातील, कुटुंबातील आणि ओळखीच्या सर्व महिलांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या मोफत शिबिराचा लाभ घेता येईल. 🙏

Address

Deore Hospital , Datta Mandir Chowk, Deopur
Dhule
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Rohan & Dr Supriya Kulkarni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share