SHREE DATTA ASTRO VASTU

SHREE DATTA ASTRO VASTU REIKI - Reiki is technique for relaxation that also promotes healing. It is based on the idea that a

25/10/2022

वास्तु शास्त्र
वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे. जीवनाचे संवर्धन आणि संगोपन करणे आणि जीवन अधिक समृद्ध करणारे विज्ञान आहे, जे आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते.
आपण आपला बहुतेक वेळ हा आपल्या घरामध्ये, ऑफिस किवा ईतर ठिकाणी घालवत असतो, मग हे सगळे वास्तु नुसार असणे गरजेचे आहे. हे देखील खरं आहे की विश्वातील सर्वच गोष्टींशी निगडित उर्जा असते. ज्या जागेवर इमारत उभारली आहे त्या जमिनीशी संबंधित उर्जेची कंपने वास्तुशी निगडित असतात.
वास्तूचे मुख्य उद्दीष्ट नकारात्मक दूर करणे आणि वास्तुतील सकारात्मक उर्जा वाढविणे हे आहे, जेणेकरुन एखादी व्यक्ती, कुटुंब किंवा वास्तुत राहणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय, जीवन समृद्ध आणि प्रगतीशील होईल.

वास्तुशास्त्र परिपूर्ण माहिती व अभ्यास यासाठी
श्रीदत्त ज्योतिष अभ्यास मंडळ, डोंबिवली आयोजित ऑनलाईन अभ्यास वर्ग सुरु होत आहेत
अधिक माहिती व ऍडमिशन साठी संपर्क -

8928255320 श्री दत्त ज्योतिष
9372560940 अभिजित कुलकर्णी ; 9139263988 गौरी करमरकर ; 8411010091 वीणा लवाटे
9869863475 दीपक राणे ; 9773116998 अविनाश देशपांडे

Thank you REIKI
24/09/2022

Thank you REIKI

22/09/2022
20/09/2022

टॅरो विद्येची पार्श्वभूमी

चित्रांच्या आधारे भविष्य कथन करणारी ही कला १७ व्या शतकात उगम पावली असे मानले जाते. सर्वप्रथम मध्ययुगीन कालखंडात युरोपात टॅरोचा वापर सुरू झाला. इटलीत तिचा मोठा वापर होत होता. त्यानंतर जगभर तेथूनच या पद्धतीचा प्रसार झाला. काहींच्या मते भारतातूनच ही भविष्यकथन पदधती तेथे गेली. पुरातन किंवा ऐतिहासिक काळात आपल्या भारतात ही विद्या होती किंवा नाही ह्याचे मी ठाम विधान आपण करु शकत नाही. आजच्या घटकेला मात्र है शास्त्र इंजिप्त आणि इटली म्हणजेच युरोप मार्गे सर्व जगभर पसरले आहे. म्हणूनच ह्या पत्त्यांवर असलेली चित्रे हि पाश्चात्य संस्कृती, बायबल, मोझेस थोडक्यात त्यांच्या पुराणाला अनुसरुन आहेत.
असे असले तरी अखेर मानवी जीवन हे काही वेगळे असते का ? जसे त्यांच्या संस्कृतीतही आईचे मुलावरचे प्रेम हे आपल्याकडील तत्सम प्रेमापेक्षा कमी नसतेच सुखदुःखाच्या भावना सर्व मानवी समाजात सारख्याच आहेत. म्हणूनच टॅरा चित्रांचा संदर्भ/अन्वय आपल्या समाज/वैयक्तिक जीवनाशी जोडून त्यातून मिळणाऱ्या संदेशांचे आकलन करणे आवश्यक आहे.
ज्योतिष शास्त्राला ग्रह-गणिताचा आधार असतो. त्याला ठोस खगोल शास्त्रीय विज्ञानाची पार्श्वभूमी आहे. हस्तसामुद्रिकात मनुष्याच्या हातावरच्या रेखाच त्याचा जीवनाचा आलेख दाखवितात. त्याच्या प्रकृति / प्रवृत्तीप्रमाणे ह्या रेषा बदलणे हे तर्कसंगत आहे. असा कुठला आधार ह्या 'टॅरो कार्ड पद्धतीत आहे ही शंका रास्त आहे. तिचा माझ्या दरष्टीने असलेला खुलासा थोडक्यात खाली देत आहे.

प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्राणी ह्यांच्याभोवती त्यांचे स्वत:चे असे नैसर्गिक आवरण असते. आपण त्यास ऑरा असे देखिल म्हणतो. ह्या आवरणातून उमटणारी स्पंदने व्यक्तीवर व चराचरावर परिणाम करीत असतात आणि त्यांचा एकमेकांशी समन्वय असतो. आल्हाददायक निसर्गाच्या सोंदर्याने माणूस मोहित होतो, आनंदी होतो आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटतो. याउलट बीभत्स किंवा भयप्रद गोष्टींनी माणसाच्या देहबोलीवर आपोआप परिणाम होतो. म्हणजेच वातावरणातील ही स्पंदनेच हे कार्य करीत असतात.

'टॅरो कार्ड' पिसताना, हाताळताना, निवडताना संबंधीत कार्ड नैसर्गिकपणे जातकाच्या हातून निघतात. एक उत्तम टॅरो कार्ड रीडर त्या कार्डावरील चित्रांचा अर्थ व तर्क या आधारे समोरील व्यक्तीच्या मनात,भविष्यात डोकाउ शकतो.

20/09/2022

टॅरो या शब्दाचा अर्थ गुढविद्या, अज्ञात - अज्ञाताचा शोध असा आहे. म्हणजेच जे दृष्टीस पडत नाही त्याचा सूक्ष्म अभ्यास, यतार्थ तर्क, कल्पनेचा विलास.

18/09/2022

*पत्त्यांची गंम्मत*
♥️ ♠️ ♦️ ♣️ 🃏

पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो,आणि खेळणारा जुगारी वाटतो, ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात.
*बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.
पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दस्सी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.

*1)* 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे
*2)* 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु.
प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.
*3)* या सर्व पत्त्याची बेरीज 364
*4)* एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.
*5)* 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.
*6)* 52 पत्यातील 12 चित्र पत्ते
म्हणजे 12 महिने
*7)* लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
*1)* दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश
*2)* तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि
महेश
*3)* चौकी म्हणजे चार वेद
(अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेवेद)
*4)* पंजी म्हणजे पंच प्राण
(प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)
*5)* छक्की म्हणजे षड रिपू
(काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर,
लोभ)
,*6)* सत्ती- सात सागर
*7)* अठ्ठी- आठ सिद्धी
*8)* नववी- नऊ ग्रह
*9)* दस्सी- दहा इंद्रिये
*10)* गुलाम- मनातील वासना
*11)* राणी- माया
*12)* राजा-सर्वांचा शासक
*13)* एक्का- मनुष्याचा विवेक
*14)* समोरचा भिडू - प्रारब्ध

मित्रांनो, लहानपणा पासून पत्ते बघीतले असतील, काहींनी खेळले असतील परंतू त्या पत्त्यांच्या संचा बद्दल माहीती होती का ?
त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.
*पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!*

Address

Dombivli
421202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHREE DATTA ASTRO VASTU posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to SHREE DATTA ASTRO VASTU:

Shortcuts

Share