21/02/2023
सर्व वैद्यकीय सुविधा एकाच रुग्णालयात
विभागनिहाय सुसज्ज अत्याधुनिक यंत्रणा
रेडिओलॉजी विभाग
रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा रेडिओलॉजी विभाग कार्यरत असून एम.डी. डॉक्टरांची सेवा त्यासाठी उपलब्ध आहे. त्यात सि.टी. स्कॅन, सोनोग्राफी व एक्स-रे या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार कुठलीही सि.टी.स्कॅन चाचणी अवघ्या ७०० ते ३१०० रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला आहे. यात सोनोग्राफी चाचणी ३०० ते ८०० रुपयांपर्यंत तर एक्स-रे प्रति कॉपी अवघ्या १५० रुपयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
रुग्णालयात सर्वप्रकारच्या सोनोग्राफीतून विविध आजारांचे व्यवस्थित आणि अचूक निदान शोधले जावे, यासाठी ३०० एमए क्षमतेचे सॅमसंग कंपनीचे अत्याधुनिक तीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहेत. तर १०० एम ए क्षमतेचे अॅलंजर्स कंपनीचे सोनोग्राफी यंत्रही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. याद्वारे सर्व प्रकारच्या सोनोग्राफी व टूडी इको (हृदययाचा एक्सस्त्रे) ची सुविधाही उपलब्ध आहे. एक्स-रे डेव्हलपिंगसाठी सीआर सिस्टीम या द्वारे डिजिटल व गुणवत्तापूर्ण एक्स-रे रिपोर्ट मिळणार आहे.
अतिदक्षता विभाग (I.C.U.)
रुग्णालयात १४ खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. या ठिकाणी २४ तास डॉक्टर व परिचारिकांची उपलब्धता रुग्णसेवेसाठी आहे. आयसीयूसाठी ९ व्हेन्टिलेटर्सची उपलब्धता आहे. फिलिप्स व नोकेअर या कंपनींच्या ही व्हेन्टिलेटर्स असून यामुळे रुग्णांना उत्कृष्ट कृत्रिम श्वाच्छोश्वास देण्याची हमी रुग्णालयाने घेतली आहे. या शिवाय कृत्रिम श्वाच्छोश्वासासाठी ६ बायोपॅफ यंत्रेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या कक्षात तीन भूलतज्ज्ञासह ३० जणांचा स्टॉफ कार्यरत आहे. येथील प्रत्येक बेडसाठी फिलिफ्स कंपनीचे अत्याधुनिक मॉनिटर्स उपलब्ध आहेत. या शिवाय फिजिओथेरपीची सेवा देखील या विभागात उपलब्ध आहे. या विभागाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे अतिदक्षता विभागात सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्यातील अत्याधुनिक यंत्रांमुळे प्रत्येक बेडवरील प्रत्येक रुग्णांच्या सद्य:स्थितीवर या रूममध्ये काटेकोरपणे २४ तास लक्ष ठेवले जाते. या ठिकाणी दोन स्वतंत्र आयसोलेशन रूम अत्याधुनिक यंत्रांनी सज्ज आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रूममधील फ्लोरिंग ही अँटिबॅक्टिरीयल अशी आहे.
अर्थोपेडिक विभाग ...
या विभागात कृत्रिम खुबा व गुडघेरोपण, या शिवाय अपघातातील जखमी, खेळांच्या व अपघातील दुखापती, मणक्याच्या शस्त्रक्रिया, टाचेचे हाड वाढल्याच्या शस्त्रक्रिया, संधिवातापासून होणारे दुखणे, हाडातील ठिसूळपणा, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, संधिवात, गुडघ्याचे व खांद्याचे दुर्बिणीद्वारे लिगामेंटची शस्त्रक्रिया, लहानमुलांचे वेडेवाकडे हाडे व व्यंग दुरुस्ती शस्त्रक्रिया तसेच सर्व जुनाट व्याधींवर परिपूर्ण उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. या विभागासाठी स्वतंत्र हायटेक ऑपरेशन थिएटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
फिजिओथेरपी विभाग
रुग्णालयातील फिजिओथेरपी हा विभाग अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज करण्यात आला आहे. यात संधिवात, आम वात, मानेचा व कमरेचा स्पॉन्डेलिसीस, गुडघ्याचा अर्थोरायटीस (गुडघे दुखी), कंबरदुखी, सियाटीका, जखडलेला खांदा, टाच दुखी, गुडघा, सांधेरोपणानंतरचे उपचार व व्यायाम, लकवा, फेशीयल पालसी, फूट ड्रॉप, सेरेबल पालसी, डाऊन सिन्ड्रोम, सीओपीडी, मधुमेह सेल्युलायटीस, खेळाशी निगडित समस्या, वेटलॉस व डायट मॅनेजमेंट, डोकेदुखी व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या रिकव्हरीसाठी विविध प्रकारचे व्यायाम व उपचार उपलब्ध आहेत.
स्त्री रोग व प्रसूती विभाग
या विभागासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर
आय.सी.यु. सपोर्टसह सिझेरियन, गर्भपिशवीचे ऑपरेशन, स्तनाच्या गाठी, मासिकपाळी संबंधीच्या समस्यांवर उपचार व मार्गदर्शन, दुर्बिणीद्वारे महिलांच्या सर्व शस्त्रक्रिया, कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया, प्रसुतीपूर्व सर्व सोनोग्राफी अत्यल्प दरात केले जातात. या शिवाय आवश्यक असलेल्या गरोदर महिलांच्या सिझेरियनसाठी अत्याधुनिक यंत्रांसह ऑपरेशन थिएटर देखील उपलब्ध आहे.
रुग्णालयात कोणत्याही आजारावरील तातडीच्या उपचारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी ११ बेडचे स्वतंत्र रिकव्हरी रूम सज्ज ठेवण्यात आले आहे.
ऑपरेशन थिएटर
रुग्णालयात तब्बल चार वेगवेगळे ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहेत. त्यात आर्थोपेडिक, मेंदूविकार, स्त्रीरोग, नेत्ररोग व जनरल सर्जरी यासाठी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्स कार्यरत आहेत. यात आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटरमध्ये सीआर्म हे अॅलेंजर कंपनीचे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध आहे. या शिवाय कार्डियाक मॉनिटर, पीसीएफओ मशीन अॅनेस्थेशिया मशीन, लॅमिनार फ्लो यासह सर्व साहित्य निर्जंतुकीकरणासाठी पास बॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे कितीही जिकरिची शस्त्रक्रिया या ठिकाणी यशस्वीरीत्या पूर्ण केली जात आहे.
स्टरलायझेशन विभाग
या विभागात ऑटोक्लेव यंत्राद्वारे संपूर्ण रुग्णालयातील ऑपरेशनचे साहित्य, कपडे, बेडशिट्स, परिचारिकांचे गणवेश, ऑपरेशन थिएटरमधील गणवेश हे दररोज निर्जंतूक केले जातात. यामुळे रुग्णालयात कार्यरत संपूर्ण स्टाफला हे निर्जंतूक केलेले कपडेच वापरावे लागतात. प्रत्येक बेडवर निर्जंतूक केलेल बेडशिटच घालावे लागतात. यामुळे रुग्णांना होणारा कुठलाही प्रकारचा संभाव्य संसर्ग रोखण्यास मदत होते.
एनआयसीयू
लहान मुलांवर उपचारासाठी हा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. यात पाच बेड आणि मुलांच्या सुरक्षितेसाठी पाच वॉर्मर, दोन फोटा थेरपी एक व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारी असलेल्या बालकांवर अत्याधुनिक उपचार करणे सोपे झाले आहे. या शिवाय महिलांसाठी या कक्षात स्वतंत्र स्तनपान कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यात माता आपल्या नवजात शिशूला स्तनपान करू शकतात.
स्पेशल, सेमी-स्पेशल रुम्स व जनरल वॉर्ड
रुग्णालयात १०० खाटांचा महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र जनरल वॉर्डची व्यवस्था आहे. याशिवाय रुग्णालयात इच्छुक रुग्णांसाठी स्पेशल रुम व सेमी स्पेशल रुमची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब
रुग्णालयात सर्व रोगनिदान सुविधांसाठी येथील अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब २४ तास रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे.
Áरक्त, रक्तातील शुगरपासून ते कर्करोगापर्यंत सर्व चाचण्या केल्या जातात.
Áशरीरावरील गाठींच्या FNAC यासह शरीरातील गाठ काढल्यानंतरची HISTO PATH ही तपासणी देखील लॅब मध्ये केली जाते.
Áगर्भाशयाच्या मुखाची PAPSMEAR ही तपासणी या ठिकाणी होते.
Á मधुमेहासाठी उपयुक्त Hb1C या तपासणीसह सर्व हार्मोनल तपासण्या या लॅबमध्ये केल्या जातात.
रुग्णालयात आयसीयू व विविध विभागांमध्येही उपकरणांना विजेची मोठ्या प्रमाणावर गरज असते. ही गरज भागविण्यासाठी रुग्णालयाने स्वत:चा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला असून या माध्यमातून संपूर्ण रुग्णालयात उपकरणांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य होत आहे. या शिवाय वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र दोन जनरेटर्स व संगणक प्रणालीसाठी यूपीएस उपलब्ध करून देण्यात आले आहे.
माेतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम ...
रुग्णालयात दर गुरुवारी २१ रुग्णांवर मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रिया तसेच डोळ्यावरील साय काढणे या शस्त्रक्रिया केल्या जातात. आतापर्यंत हजारावर रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे काम देवकर रुग्णालयाने केले आहे. विशेष म्हणजे नाममात्र दरात म्हणजेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ २५०० रुपये तर फेको शस्त्रक्रिया अवघ्या ६००० रुपयात केली जात आहे. रुग्णांचा निवास व भोजनाची व्यवस्था तसेच प्राथमिक औषधी याच दरात रुग्णालयातर्फे देण्यात येत आहे. याशिवाय डोळ्यांच्या सर्व आजारांचे निदान व उपचार, चष्म्याचा नंबर काढणे, डोळ्यातले मास काढणे यावरही उपचार केले जातात.
जनरल सर्जरी विभाग
रुग्णालयात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह जनरल सर्जरी विभाग कार्यरत आहे. या विभागात आतड्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, हर्निया, अॅपेंडिक्स, थायरॉईड, मुळव्याध भगंदर, हायड्रोसिल, स्तनाच्या गाठी, पायातील कुरुप काढणे, अंगावरील चरबीच्या गाठी काढणे, बद्धकोष्ठता, पोटाची सर्जरी, जठर व आतड्याच्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, अल्सर, पित्ताशय यावरील शस्त्रक्रिया, यकृताच्या आजारावर उपलचार केले जातात. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, डायबेटीक फुट केअर इत्यादी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया व उपचार उपलब्घ आहे. तसेच या विभागातील बहुतांशी शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
गॅस्ट्रोस्कोपी विभाग
याविभागांतर्गत अॅसिडीटी, मळमळ होणे, उलटी होणे, उलटीतून रक्त पडणे, पोटात गॅसेस होणे, जेवतांना गिळायला त्रास होणे, आतड्यातील जखमा व गाठी तसेच आतड्यासंबंधीचे आजार व पोटातील कृमी होणे या तपासण्या दर बुधवारी सवलतीच्या दरात म्हणजेच अवघ्या १५०० रुपयात केल्या जातात. तसेच कोलोनोस्कोपी अंतर्गत संडासद्वारे रक्त जाणे, संडासच्या जागेवरील आजार.
किडनी व मूत्रविकार विभाग
याविभागांतर्गत रुग्णालयात शुगर (मधुमेह) संबंधीत किडनीचे आजार, उच्च रक्तदाब संबंधी किडनीचे आजार, लघवी व किडनीचे इन्फेक्शन, किडनी ट्रान्सप्लांट संबंधी मार्गदर्शन व उपचार, क्रिएटीनीन वाढणे, दुर्बिणीने लेसरद्वारे मुतखड्याचे आॅपरेशन, पुरुषग्रंथीच्या (Prostate) आजारासाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मुत्रमार्गाचे कर्करोग, निदान व शस्त्रक्रिया, पुरुष वंध्यत्व निदान व उपचार, स्त्रीयांचे मुत्रमार्गाचे आजार व उपचार केले जातात. इतर किडनी संबंधित आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. याशिवाय किडनी रुग्णांसाठी डायलिसीसची सुविधा 24x7 उपलब्ध आहे. यात पेरीटोनीयल डायलिसीस, प्लास्मोफेरसीस, किडनी बायाॅप्सी, पर्मकॅथ आणि डायलिसीस कॅथ बसवणे, लहान मुलांचे किडनीचे आजार यावर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा
न्यूरोसर्जन-
* डॉ. प्रशांत साठे
* डॉ. मनोज पाटील
गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी-
* डॉ. आशिष पाटील
किडनी विकार तज्ज्ञ-
* डॉ. अमित भंगाळे
मेंदूविकार तज्ज्ञ-
* डॉ. चेतन चौधरी
प्लास्टिक सर्जरी-
* डॉ. श्रीराज महाजन
* डॉ. प्रणव ठुसे
कार्डियालॉजी-
* डॉ. हर्षल पाटील
बालरोग शस्त्रक्रिया विभाग -
* डॉ. मिलिंद जोशी
मुत्रविकार तज्ज्ञ
* डॉ. हेमंत केळकर
* डॉ. अभय चौधरी
* डॉ. नीरज चौधरी
कॅन्सर तज्ज्ञ -
* डॉ. सचिन इंगळे
मेडिसीन-
* डॉ. शशिकांत गाजरे
* डॉ. पंकज महाजन
* डॉ. मंदार पंडित
* डॉ. तेजस राणे
* डॉ. श्रीकांत पुरी
बालरोग विभाग
* डॉ. राजेश पाटील
* डॉ. शैलजा पवार
* डॉ. अविनाश खेलवडे
* डॉ. अमित नारखेडे
* डॉ. मजिद खान
* डॉ. हितेंद्र भोळे
अस्थिरोग विभाग-
* डॉ. सुनिल नाहाटा
* डॉ. मनिष चौधरी
* डॉ. नरेंद्र भोळे
* डॉ. उमेश वानखेडे
* डॉ. हषीता नाहाटा
* डॉ. अभिजीत पाटील
* डॉ. अजय सोनवणे
* डॉ. पराग नाहाटा
* डॉ. गौरव बाफना
रेडिऑलॉजी-
* डॉ. मनिष सुरवाडे
* डॉ. प्रणाली तोष्णीवाल
* डॉ. कल्याणी वाणी
स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र
*डॉ. सिमा पाटील
* डॉ. अनिता बाविस्कर
* डॉ. गजाननसिंग पाटील
* डॉ. शाहीद खान
* डॉ. प्रियांका वायकोळे
* डॉ. प्रियांका देवरे
फिजिओथेरपी -
* डॉ. अमित नेमाडे
जनरल सर्जरी-
* डॉ. समीर चौधरी
* डॉ. रोहन पाटील
नेत्रतज्ज्ञ-
* डॉ. प्रेमलता महाजन
* डॉ. वृषाली पाटील
* डॉ. दिपक पाटील
* डॉ. अाम्रपाली काकलिया
भूलतज्ज्ञ -
* डॉ. प्रियंका एन. पाटील
* डॉ. दिपाली साठे
* डॉ. गणेश भारुडे
* डॉ. उदय पाटील
* डॉ. सुनिल तायडे
त्वचा विकार तज्ज्ञ -
* डॉ. सुभा महाजन
* डॉ. स्वप्नील पाटील
मानसोपचार तज्ज्ञ -
* डॉ. सतीश पाटील
* डॉ. कांचन नारखेडे
छाती व दमा विकार तज्ज्ञ-
* डॉ. चेतन चौधरी
पॅथॉलॉजी -
* डॉ. अतुल सोनार
संधीवात तज्ज्ञ-
* डॉ. आस्था गनेरीवाल
दंतरोग तज्ज्ञ -
* डॉ. अश्विनी मराठे
* डॉ.प्रियंका पंडित