03/08/2026
🌧️ वर्षा ऋतू आणि वाढलेला वात
पावसाळ्यात हे त्रास वारंवार होतात का?
✔️ पोट फुगणे
✔️ अंग जड वाटणे
✔️ गॅसेसचा त्रास
✔️ शौचास कडक किंवा वारंवार होणे
✔️ सांधे दुखणे
✔️ सूज येणे
✔️ अंगावर खाज किंवा पुरळ येणे
✔️ मासिक पाळी अनियमित होणे
यामागील मुख्य कारण:
पावसाळ्यात निसर्गतः वातदोष वाढतो, त्यामुळे ही लक्षणे अधिक जाणवू शकतात.
उपाय
🌿 १. बस्ती चिकित्सा (पंचकर्म)
वातदोषासाठी आयुर्वेदातील सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक म्हणजे बस्ती.
बस्तीमध्ये गुदमार्गाद्वारे औषधी तेल किंवा काढा पक्वाशयात दिला जातो. यामुळे वाढलेला वात संतुलित होण्यास मदत होते आणि वरील त्रास कमी होण्यास सहाय्य होते.
🥣 २. आहार-विहार
• दुपारी झोपू नये.
• सूर्योदयापूर्वी उठावे.
• कोमट पाणी प्यावे.
• कडधान्ये मर्यादित प्रमाणात घ्यावीत.
• तळलेले पदार्थ टाळावेत.
• पालेभाज्या कमी खाव्यात.
• गरम, ताजे व पातळ अन्न सेवन करावे.
🌱 योग्य ऋतुचर्या आणि वेळेवर केलेली बस्ती चिकित्सा पावसाळ्यातील वातजन्य त्रासांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.
📍 Dr. Nisha Patil
essence
Savita Hospital, Jalgaon