12/02/2025
⭕ *भारत देश कॅन्सरच्या विळख्यात*
▪️ सामान्य माणसाने कॅन्सर हे नाव ऐकले, घेतले, किंवा वाचले तरी त्याला धडकी भरवते, कारणच तसे आहे, कॅन्सर हा सामान्य रोग नाही कारण त्यावरचे सगळे उपचार व उपचार प्रणाली अजूनही परिपूर्ण नाही असे म्हटले तरी वावगे ठरत नाही, शिवाय आपल्या वैदकीय क्षेत्रातील मंडळींना त्या रुग्णाचे किती दिवस उरले आहेत हे सांगण्याची घाई जडली आहे, त्यामुळे तो रुग्ण व त्याचे नातेवाईक त्याच दिवशी अर्धमेले होतात व रुग्णाच्या बरा होण्याच्या आशा सोडतात, मुळात जर डॉक्टरांनीच आधी हार मानली असेल तर रुग्ण कुठून जिंकणार आणि इथेच कॅन्सर आपली दहशत निर्माण करतो आणि विजयाचा पाया रोवतो.
▪️आज भारतात जसा हृदयविकार दिवसेंदिवस वाढत आहे, अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत तसे आता कॅन्सरचे झाले आहे, कोरोना किंवा त्या सारख्या दुसऱ्या महामारी पेक्षा घातक रोग कॅन्सर आहे, पण आपल्या समाजाची शोकांतिका अशी आहे की वाढलेल्या कॅन्सर चा धोका कोणीच गांभीर्याने घेत नाही आहे.
▪️आपले वजन अचानक का घटले, आपल्या शरीरात का वेदना होत आहेत, आपल्या शरीरावर कसली गाठ आहे, कसले लाल चट्टे उठले आहेत, आपल्या शरीरातील लाल पेशी कमी होवून प्लेटलेट्स व सफेद पेशी अप्रमाणात का वाढल्या आहेत याचा जास्त विचार होताना दिसत नाही, कारण बेफिकिरी, आपल्याला कॅन्सर होवू शकत नाही किंवा आपल्या फॅमिली डॉक्टर यांना आपल्या आजाराचे तेवढे गांभीर्य वाटत नसते म्हणून आणि इथेच कॅन्सरला वाढण्याची संधी दिली जाते, कारण कॅन्सर हा सायलेंट किलर आहे तो आपल्या शरीरात कधी आला व कधी वाढला व कधी पसरला हे कळत नाही व जेव्हा कळते तेव्हा खूपच उशीर झालेला असतो, पण तरी सुद्धा आपण योग्य त्या उपचार प्रणाली कडे धावत नाही उलट सुलट उपचार करत बसतो आणि जीव गमावून बसतो, बर या मध्ये नुसता जीव जात नाही, तर उपचारासाठी प्रचंड पैसा जातो, कुटुंबाचे मानसिक स्वास्थ जाते, सगळी सुख चैन निघून जाते.
▪️मुळातच कॅन्सर एवढा का वाढला याचे कोडे सरकार सोडवताना दिसत नाही, याची प्रमुख कारणे माहीत असून सुध्दा आपण दुर्लक्ष करत असतो, उदाहरणं वाढलेले प्रदूषण, मिलावट पदार्थ, खराब किंवा जास्त जळलेले तेल, शिळ अन्न, फ्रोजन फूड, फास्ट फूड, हानिकारक रंग, केमिकल दूषित पाणी, त्याच पाण्यात तयार झालेले मासे, भाज्या, इंजेक्शन देवून कृत्रिमरित्या वाढविलेले बकरे, कोंबड्या, त्यांची अंडी, हानिकारक सॉफ्ट ड्रिंक, अती प्रमाणात कॅफ्फेन असलेले एनर्जी ड्रिंक, अती चहा, अती कॉफी, अती दारू, गुटखा, तंबाखूजन्य इतर पदार्थ, रासायनिक खते व त्यांच्या पासुन निर्माण झालेले धान्य ज्यात आर्सेनिक सारखे घातक विषद्रव्य आणि सर्वात मुख्य म्हणजे वाढत्या मोबाईल आणि कॅमेरा व त्याच्या हाई पॉवर लाइट्स च्या वापरा मुळे वाढलेले किरणोत्सर्ग ( रेडिएशन )
▪️बर सरकार वर सगळेच सोडून चालणार नाही, मान्य सरकारने सुध्दा या गोष्टींमध्ये लक्ष घातले पाहिजे व जे समाजासाठी घातक ठरत आहे त्यावर नियंत्रण अथवा बंदी आणली पाहिजे, पण आपली म्हणजेच समाजाची सुध्दा खूप मोठी जिम्मेदारी आहे, आपण पण आपल्या स्वतःवर व आपल्या कुटुंबावर या सगळ्या गोष्टी टाळण्याची किंवा नियंत्रित करण्यासाठी पत्थे लादली पाहिजेत, जेणे करून आपला धोका कमी होईल, शरीर सुदृढ राहील, आपली शारीरिक प्रतिकारशक्ती वाढेल व आपण या घातक आजारांना रोखू.
▪️ बऱ्याच oncologist म्हणजेच कॅन्सर वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून असे कळले आहे की जवळ जवळ ८८ प्रकारचे कॅन्सर असतात, त्यात रक्ताचा, पोटाचा ( म्हणजे नुसते पोट नाही तर पोटातील सगळ्या अवयवांचा ), स्तनाचा, त्वचेचा, हाडांचा, मेंदूचा कॅन्सर खूपच घातक असतो कारण यावर उपचार जरी केले तरी त्याला यश मिळेल याची खात्री देता येत नसते.
▪️कॅन्सर म्हणजे मानवांच्या अवयवांमध्ये निर्माण झालेली त्याच्याच पेशींची अनियंत्रित वाढ, या पेशी अनियंत्रित वाढल्या मुळे ते अवयव निकामी होते व पर्यायाने माणूस मृत्यूच्या दाढेत लोटला जातो, याच पेशींना कॅन्सर पेशी बोलतात.
▪️सध्याची जी उपचार प्रणाली आहे ती तीन प्रकारे कार्य करते, पाहिले कार्य जर तो बाधित निकामी अवयव शस्त्रक्रिया करून काढता आला तर नक्कीच काढला जातो व उर्वरित भागात रेडिएशन ( किरणोत्सर्गी उपचार ) दिल जाते जेणेकरून काही उरल्या सुरल्या पेशी नष्ट केल्या जातात. दुसरी उपचार पद्धती ही केमोथेरपी नावाने प्रसिद्ध आहे, यात एक ठराविक औषध मानवाच्या शरीरात सोडले जाते व त्या पेशींना नष्ट करते, पण या उपचार प्रणालीचे खूप दुष्परिणाम पाहायला मिळतात, जसे की केस गळणे, वजन घटणे, जेवणाची भूक संपणे, शरीर कृश होणे वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा सामान्य पणॆ हीच उपचार प्रणाली वापरली जाते कारण अजून या पेक्षा प्रगत उपचार प्रणाली अमलात आल्या नाही आहेत. तिसरी प्रणाली डायरेक्ट रेडिएशन जसे मगाशी सांगितले की रेडिएशन म्हणजे बाधित अवयावर थेट किरणोत्सर्ग वापरणे आणि त्या पेशी नष्ट करणे, पण या सगळ्या उपचार प्रणाली बघितल्या तर एक लक्षात येते की त्या बाधित अवयव आणि त्या अनियंत्रित पेशींसोबत शरीरातील चांगल्या पेशी सुध्दा मारते.
▪️या सगळ्यामुळे होते काय की माणूस आपली शरीराची प्रतिकारशक्ती गमावून बसतो व कृश होतो, व हे सगळे बघून बघून तो मनातून खचतो, शिवाय या उपचार प्रणाली खूपच वेदनादायी असतात यामुळे माणूस आपली जगण्याची उमेद घालवतो आणि शेवटी शेवटी मृत्यू मागतो किंवा स्वतःच तो कवटाळतो आणि कॅन्सर मुळे जे मृत्यू प्रमाण वाढले आहे ते या मुख्य कारणामुळेच, यातून पण जे धीराने त्या आजाराशी लढतात व मनात तीव्र इच्छा आणि विश्वास बाळगतात ते ह्या आजारावर मात करून परत एक सुदृढ आयुष जगतात.
▪️पण यांचा टक्का खुच कमी आहे, कारण बहुतेक कॅन्सर बाधित आपली जगण्याची आशा या रोगाचे निदान झाल्याझाल्या सोडतात आणि हेच आपल्या समाजाचे अपयश आहे, हेच आपल्या वैदकीय मंडळींचे अपयश आहे, कारण जर या मंडळींनी त्यांना आधार दिला, धीर दिला व या आजारावर मात करण्याची शाश्वती दिली तर तो रुग्ण कधी हरणार नाही, सगळ्या वेदना पण सहन करेल व परत व्यवस्थीत आहार, शरीराची प्रतिकारशक्ती, मानसिक दृढता मिळवून या आजाराला हरवून टाकेल.
▪️आजच्या या लेखामुळे १० जणांना जरी फायदा झाला त्यांना मी जागे केले असे मानले तर या लेखाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असे मानेनं व प्रयागराजच्या कुंभात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त झाले असे मी दृढ मनाने मानेनं...तुम्ही सुध्दा या लेखाला दुसऱ्यांपर्यंत पोचवून हे मानू शकता व स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि इतरांना मदत करू शकता शिवाय सरकारला सुध्दा या गंभीर विषयावर जाग आणू शकता.
जय हिंद !!
श्री सचिनसिंह