24/03/2026
प्रभावी फिजिओथेरपीसाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! 🩺✨
फिजिओथेरपी म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर ती एक शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आहे. योग्य निकाल किंवा तुमच्या दुखण्यातून आराम मिळवण्यासाठी रुग्णाने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.
*१. *फिजिओथेरपी घेताना रुग्णाने घ्यावयाची काळजी:*
* *नियमितता (Consistency):* उपचारात खंड पडू देऊ नका. फिजिओथेरपिस्टनी सांगितलेले व्यायाम दिलेल्या वेळेतच पूर्ण करा.
*सविस्तर माहिती द्या:* तुम्हाला होणारा त्रास, वेदनेची तीव्रता आणि जुने आजार (उदा. बीपी, शुगर) याबद्दल डॉक्टरांना स्पष्ट कल्पना द्या.
*Home Exercise Program:* क्लिनिकमध्ये उपचारांनंतर घरी जे व्यायाम करायला सांगितले आहेत, ते न विसरता करा. त्याशिवाय पूर्ण गुण येणार नाही.
*योग्य कपड्यांची निवड* : व्यायाम करताना अडथळा येणार नाही असे सैल आणि सुटसुटीत कपडे वापरा.
*घाई करू नका* : शरीर बरे होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे 'शॉर्टकट' न शोधता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण कोर्स करा.
२. *फिजिओथेरपी कुणाकडून घ्यावी* ?
योग्य फिजिओथेरपिस्ट निवडताना खालील बाबी तपासा:
*पदवीधारक डॉक्टर* (Qualified BPT/MPT): नेहमी शासनमान्य विद्यापीठातून 'बॅचलर ऑफ फिजिओथेरपी' (BPT) किंवा 'मास्टर ऑफ फिजिओथेरपी' (MPT) पदवी घेतलेल्या तज्ज्ञांकडेच जावे.
*नोंदणीकृत डॉक्टर:* संबंधित डॉक्टर 'महाराष्ट्र राज्य ओ.टी./पी.टी. कौन्सिल' कडे नोंदणीकृत आहेत का, याची खात्री करा.
*अनुभव आणि कौशल्य* : तुमच्या त्रासाशी संबंधित (उदा. अस्थिरोग, मज्जासंस्था किंवा स्पोर्ट्स इंज्युरी) विशेष अनुभव असलेल्या डॉक्टरांची निवड करा.
*वैयक्तिक लक्ष:* जो डॉक्टर तुमच्या समस्येचे नीट निदान करून तुम्हाला वेळ देतो, त्यांच्याकडून उपचार घेणे फायदेशीर ठरते.
*महत्वाची टीप: चुकीच्या व्यक्तीकडून घेतलेले उपचार तुमच्या त्रासात वाढ करू शकतात. त्यामुळे नेहमी तज्ज्ञ आणि अनुभवी तज्ञ् फिजिओथेरपिस्टचाच सल्ला घ्या* .