Elixer Ayurved

Directions

Elixer Ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Elixer Ayurved, Hospital, wadanage , kolhapur, Kolhapur.

आज (29 जुलै) व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा...आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृतीतील गुर...
29/07/2026

आज (29 जुलै) व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा...
आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा पवित्र दिवस आहे. महर्षी व्यासांनी वेदांचे विभाजन, महाभारत, अठरा पुराणे आणि अनेक ग्रंथांची निर्मिती करून मानवजातीला ज्ञान, धर्म आणि जीवनमूल्यांचा अमूल्य ठेवा दिला. त्यांच्या या महान कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. गुरु केवळ शिक्षण देत नाहीत, तर योग्य विचार, सुसंस्कार, चारित्र्य आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. आपल्या जीवनात आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्ती हे सर्वच गुरुच्या भूमिकेत असतात.

आजच्या या पावन दिवशी आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांच्या ज्ञानाचा, संस्कारांचा आणि मार्गदर्शनाचा आदर राखत समाजहित, राष्ट्रहित आणि मानवतेच्या सेवेसाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.

सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम आणि सर्वांना व्यासपौर्णिमा तथा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#व्यासपौर्णिमा #गुरुपौर्णिमा #गुरु #गुरुशिष्य_परंपरा #भारतीय_संस्कृती #ज्ञान #प्रणाम

*आज (२५ जुलै) आषाढी एकादशी...*आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या दिवसापासून चतुर्मास म्हणजेच ...
25/07/2026

*आज (२५ जुलै) आषाढी एकादशी...*

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या दिवसापासून चतुर्मास म्हणजेच ४ महिन्यांचा व्रतवैकल्ये, उपासना याला महत्त्व देणारा कालावधी सुरू होतो, ज्यामध्ये देव ४ महिने निद्रा घेतात. यामुळे या एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ असेही म्हणतात. एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हा महिना म्हणजे पंढरपूरच्या वारीचा काळ असतो. पंढरपूरचा श्री विठ्ठल म्हणजे असंख्य भक्तांचे आराध्यदैवत. आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात. त्यांच्यासोबत अनेक लोक अनेक दिंड्यांतून वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला चालत येतात. श्री पांडुरंगासह संत ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम यांचा जयघोष केला जातो. सर्व जण श्री पांडुरंगापुढे अनन्य भक्तिभावाने नतमस्तक होतात.

पांडुरंगाच्या दर्शनाने सर्व दु:खांचे हरण होते, आत्मिक समाधान लाभते, अशी वारकऱ्यांची, भक्तांची श्रद्धा आहे. आषाढी वारीला सुमारे ७५० वर्षांची परंपरा लाभली आहे. या दिवशी उपवास करून ईश्वरचिंतन केले जाते. श्री विठ्ठलास शतश: नमन...

‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल...’

#श्री_विठ्ठल #आषाढीएकादशी #पंढरीचीवारी #वारकरीसंप्रदाय #नमस्कार

13/07/2026

तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी – सुवर्णप्राशन संस्कार!

प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची भूक चांगली असावी, शरीराने ते सुदृढ असावे, अभ्यासात आणि खेळात ते नेहमी हुशार असावे. हाच विचार करून आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी १६ महत्त्वाचे संस्कार सांगितले आहेत, ज्यातील एक अत्यंत गुणकारी संस्कार म्हणजे 'सुवर्णप्राशन संस्कार'.

सुवर्णप्राशन संस्कार २०२६ च्या प्रमुख तारखा:

१५/०७/२०२६ (बुधवार)
११/०८/२०२६ (मंगळवार)
०८/०९/२०२६ (मंगळवार)
५/१०/२०२६ (सोमवार)
०१/११/२०२६ (रविवार
२९/११/२०२६ (रविवार)
२६/१२/२०२६ (शनिवार)

तुमच्या पाल्याला दर पुष्य नक्षत्राला किंवा सलग ६ महिने सुवर्णबिंदूचे ड्रॉप्स देऊन त्यांच्या आरोग्याचा पाया मजबूत करा.

तज्ज्ञ डॉक्टर:

डॉ. युवराज अण्णासाहेब देवणे (एम.डी. आयुर्वेद)
डॉ. कीर्ती युवराज देवणे (एम.डी. आयुर्वेद)

पत्ता:
Elixir Ayurved
अ‍ॅडव्हान्स आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर,
पार्वती गल्ली, वडणगे.

अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
9175325099

#सुवर्णप्राशन #संस्कार

11/07/2026

Address

Wadanage , Kolhapur
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Elixer Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category