29/10/2018
*.....अॅलर्जी व अस्थमा- आता भीती कशाची.....*
*अलर्जी व अस्थमा असणाऱ्या पेशंटना त्या आजाराबद्दल जागरूक करणे हे या लेखाचे उद्दीष्ट आहे ....(कृपया आपले मित्र व नातेवाईक ज्यांना अॅलर्जी किंवा अस्थमाचा त्रास आहे त्यांना जरूर फोरवर्ड करावे)*
अॅलर्जी व अस्थमा हा आजच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा विषय आहे, अॅलर्जीचे आजार आजकाल वाढताना दिसत आहेत. बदलती जीवनशैली व खाण्याच्या सवयी, प्रदूषण यांमुळे अॅलर्जीचे प्रमाण वाढत आहे
अलर्जीबद्दल बरेच समज व गैरसमज आहेतअॅलर्जीचे उपचार केल्याने अॅलर्जी चे बरेच त्रास कमी होऊ शकतात हे बरयाच लोकांना माहीत नाहीत्यामुळे त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे
अॅलर्जी म्हणजे काय?
एखाद्या गोष्टीचा इतरांच्या शरीराला त्रास होत नाही अशा पदार्थामुळे एखाद्याला त्रास होणे,
हा शरीराच्या इम्युनीटीचा अॅबनॉर्मल रिस्पॉन्स आहे.
नवजात बाळापासून ते कोणत्याही वयात ती होऊ शकते, अन्नपदार्थाची अॅलर्जी शक्यतो लहान मुलांमध्ये दिसते.
*अॅलर्जीची लक्षणे* -
(आपल्याला खालील त्रास वारंवार होतो का?)
*सततची सर्दी*- सतत व जास्त दिवस सर्दी होणे, नाक गळणे, नाक चोंदणे, वारंवार शिंका येणे,नाकाला खाज येणे, नाक चोळणे, घशात खरखर/घरघर होणे, झोपल्यावर जास्त प्रमाणात
घोरणे, कान दुखत राहणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे. (अलर्जीक राइनाईटीस)
सतत सर्दी होत राहिल्याने चेहर्याची ठेवण बदलत जाते. त्याच प्रमाणे सायनुसाईटीस्,
Adenoid च्या ग्रंथी वाढणे ही complicationsहोतात. अॅलर्जीची ट्रिटमेंट केल्यास सर्दीबरोबर सायनुसाईटीस् व Adenoid चे त्रास बरयाच प्रमाणात कमी होतात.
*खोकला* - वारंवार उदभवणारा खोकला विशेषत: रात्री किंवा पहाटे,
*दमा(अस्थमा)*,--श्वास घेणे कठीण होणे. धाप लागल्यासारखे होणे, छातीत शिटीसारखा आवाज येणे,रात्री झोपल्यावर छातीत घरघर वाजणे. खेळताना किंवा पळताना लवकर दमल्यासारखे होणे. धूळ, धूर, हवामानातील बदल, फुलांचे परागकण,पाळीव प्राणी आणि फवारण्याचा
स्प्रेज यामुळे त्रास होणे. (अस्थमा)
*त्वचा* - त्वचेवर लाल चट्टे उठणे, गांधी उठणे (Urticaria), अंगावर व चेहरयावर सुज व खाज येणे (Angioedema)
लहान बाळांच्या गालावर, काखेमध्ये, गळ्याभोवती,छातीवर, पायावर लाल चट्टे पडणे व त्यावर खाज येणे -(अटोपिक डर्माटायटीस)
*फुड अॅलर्जी* - एखादा पदार्थ खाल्यानंतर पोट दुखणे,उलटी, जुलाब होणे, अंगावर पित्त येणे व खाज येणे व अंगाला सुज येणे, धाप लागणे, डोके दुखणे व तोच पदार्थ पुन्हा खाल्यावर
पुन्हा तीच लक्षणे दिसत असल्यास त्या पदार्थाची अलर्जी असू शकते. (फूड अॅलर्जी)
*डोळे* - डोळे सतत लाल होणे व पाणी येणे, खाज येणे.(अलर्जीक Conjunctivitis)
*अॅनाफायलेक्सीस* - यामध्ये अॅलरींमुळे सिरियस रिअॅक्शन येऊन धाप लागणे,हृदयाचे ठोके वाढणे, कमी होणे, बी.पी. कमी होणे या गोष्टी होतात
या गोष्टी वारंवार होत असल्यास तर आपल्याला अॅलर्जी किंवा अस्थमा असू शकतो. त्यासाठी
योग्य डॉक्टराचा सल्ला घेणे आवश्यक आहे
अॅलर्जी कशा पासून होते ?
*इनडोअर अलर्जेन -*
धुळ, धुळीतील कीटानु (Dust Mite ), पेपरवरील धुळ,झुरळ व त्याच्या अंगाचे भाग, प्राण्यांच्या
अंगावरील लव, ओल्या भिंतीवरील बुरशी, डासांचे कॉईल व मॅट, उदबतीचा धुर.
*आऊटडोअर अलर्जेन-*
वेगवेगळी झाडे, वेली, फुले, गवत, पिके यांच्या परागकणा(pollens) मुळे अॅलर्जी होऊ शकते,
कीटक व प्रदुषण हे सुध्दा महत्वाचे घटक आहेत.
*खाद्यपदार्थ(फूड अॅलर्जी)*-
वेगवेगळ्या खाद्यपदार्थामुळे होऊ शकते. शेगदाणे,अंडी,दुध,सोयाबिन चिकन मटन,मासे या पासुन अॅलर्जी चे प्रमाण जास्त आहे पण इतर कोणत्याही खाद्यपदार्था मुळे अॅलर्जी होऊ शकते.
*अॅलर्जीचे निदान* - अॅलर्जीचे निदान करणे हे खूप महत्वाचे आहे, कारण पेशंटला नक्की कशाची आहे कळले तर ती गोष्ट टाळणे शक्य होते. त्याच प्रमाणे टाळणे शक्य नसेल तर त्या ऑलजींची इम्युनोथेरपी चालू करता येते.
*अॅलर्जीक् स्कीन प्रिक टेस्ट (अॅलर्जी टेस्ट)*- या मध्ये नक्की कशाची ऑलर्जी आहे हे अचुकपणे ओळखता येते. ही टेस्ट *वेदनारहीत(Painless) व रक्तस्त्रावविरहीत(Bloodless)* असते.
ऑलर्जीच्या पेशंटसाठी अॅलर्जीक् स्कीन प्रिक टेस्ट ही अत्यत महत्वाची व अवश्यक टेस्ट आहे.
*सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंटनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून (जाहिरात बघून) कोणतीही अलर्जी टेस्ट करू नये त्याचा अॅलर्जीच्या उपचारामध्ये कोणताही फायदा होत नाही*
अॅलर्जीचे निदानसाठी अॅलर्जीक् स्कीन प्रिक टेस्ट हीच GOLD STANDARD टेस्ट आहे व ती
स्वतः तज्ञ डॉक्टरांनी करणे आवश्यक आहे
*फुड चैलेंज टेस्ट* - फुड अॅलर्जीचे निदान करण्यासाठी अत्यंत महत्वाची टेस्ट.
एखाद्या खाद्यपदार्थाची अॅलर्जी असण्याची दाट शंका असताना व स्किन प्रिक टेस्टमध्ये अपेक्षित
निदान मिळत नसेल तर ही टेस्ट केली जाते. यामध्ये पेशंटला तो खाद्यपदार्थ थोड्या-थोड्या
प्रमाणात खायला देऊन. हळूहळू त्याचे प्रमाण वाढविले जाते. जर पेशंटला त्याचा त्रास होऊ लागला तर त्याचा लगेचच उपचार करता येतो तसेच अॅलर्जीचे निदान होते. म्हणजे भविष्यात त्या पदार्थामुळे होणारा त्रास टाळता येतो. जर कोणताही त्रास झाला नाही तर त्या पदार्थाची ऑलर्जी नाही याची खात्री होते.
*स्पायरोमेट्री टेस्ट (Pulmonary Fuction Test)*-
ही अस्थमाचे निदान व उपचार यामध्ये अत्यंत उपयुक्त व महत्वाची अशी चाचणी आहे.
यामध्ये फुप्फुसाची क्षमता मोजली जाते. याच प्रमाणे श्वसनलिका किती प्रमाणात अरुंद झाली आहे, हे कळते.
या मशिनद्वारे अस्थमा कुठल्या स्टेजमध्ये आहे हे समजू शकते.
यावरुन पेशंटला कोणते उपचार चालू करता येईल हे ठरवता येते त्याचप्रमाणे उपचार चालू केल्यानंतर फुप्फुसाच्या क्षमतेत किती वाढ झाली हे मशिनद्वारे तपासता येते.
*फिनो (FeNo)*- यामध्ये श्वासामधील नायट्रस ऑक्साईड मोजला जातो. या मध्ये श्वासनलिकेला सूज किती प्रमाणात आहे ते दिसते.
*अलर्जी उपचार*
फारमॅकॉलॉजीक उपचार - यामध्ये सिरप,टैबलेट, इंजेक्शन, नेजल स्प्रे. इनहेलर यांचा समावेश होतो.
*अलेर्जेन स्पेसिफिक इम्युनोथेरपी*-
अॅलर्जी मुळापासुन बरी करण्याची ट्रीटमेंट. हि ऑलर्जीची आधुनिक,शास्त्रोक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाची उपचारपद्धती आहे
यामध्ये ऑलजीक टेस्टींग मधुन ज्या गोष्टीमुळे ( ऑलर्जेन) त्रास होतो हे कळले की त्याविरुद्ध आपणस्पेसिफिक इम्युनोथेरपी चालू करु शकतो, त्यामुळे अॅलर्जीमुळे शरीरात होणारे बदल थांबतात व या थेरपीमुळे शरीरातील अॅलजींचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते व अॅलर्जी बरी होवू शकते.
या उपचारा मुळे शरीराचा त्या अॅलजींबद्दलचा रिस्पॉन्स बदलत जातो व इम्युनोथेरपीमुळे पुढे
होणारे ऑलजींचे प्रॉब्लेम (Complications)थांबविणे शक्य होते
इम्युनोथेरपी ही अॅलर्जिक सर्दी , अॅलर्जिक अस्थमा, स्कीन अॅलर्जी(पित्त, गांध्या), अॅलर्जीक डोळ्याचे आजार,फूड अॅलर्जी यासाठी फायदेशिर ठरते.
अस्थमाच्या पेशंटची सुरुवातीची इन्हेलर्सची ट्रिटमेंट सुरु झाल्यानंतर अॅलर्जी टेस्ट केली जाऊ शकते. अॅलर्जी टेस्टिंग केल्याने तो अस्थमा अॅलर्जिक आहे किंवा कोणत्या वस्तूच्या अॅलर्जीने तो त्रास वाढला आहे हे समजते व त्यानंतर त्या अॅलर्जीची ट्रिटमेंट म्हणजे इम्युनोथेरपी चालू केली जाते. ग्लोबल इनिशियेटिव्ह फॉर अस्थमा या(GINA) जागतिक संघटनेने इम्युनोथेरपीला मान्यता दिलेली आहे. या उपचाराने शरीरातील अॅलर्जी कमी होत जाते. अॅलर्जी पूर्णपणे बरी होऊ शकते व त्यामुळे अॅलर्जीमुळे होणारा अस्थमाचा त्रास खूप कमी होतो.
अॅलर्जीच्या इतर सर्व ट्रिटमेंटचा फायदा हा ट्रिटमेंट चालु असेपर्यंतच होतो; पण
इम्युनोथेरपीचा फायदा हा दीर्घकाळासाठी राहतो. त्याचप्रमाणे इम्युनोथेरपीमुळे नवीन अॅलर्जी येण्याचे प्रमाणही कमी होते. इम्युनोथेरपी ही अॅलर्जी मुळापासूनबरी करण्याची एकमेव ट्रिटमेंट आहे व अॅलर्जीच्या प्रत्येक पेशंटला इम्युनोथेरपीचा पर्याय देणे आवश्यक आहे. इम्युनोथेरपी ही
अत्यंत सुलभ व सर्वसामान्यांना परवडणारी उपचारपद्धती आहे.
अॅलर्जी ,अस्थमाचे योग्य उपचार केल्याने त्याचे बरेच त्रास कमी होऊ शकतात. यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अॅलर्जी किंवा अस्थमाचे निदान होताच पेशंटनी घाबरून न जाता त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन उपचारकरणे आवश्यक आहे
*(सदर लेखाचे लेखक हे* *MBBS,MD,DCH,FCPS* *असून त्यांनी अॅलर्जी व अस्थमाचे विशेष प्रशिक्षण Leicester University, London.येथून पूर्ण केले आहे* )
*ओम साई अॅलर्जी अस्थमा स्पेशालिटी क्लिनिक*
शाहुपूरी, कोल्हापूर .
अधिक माहितीसाठीसाठी संपर्क फोन नं: 0231-2669067,7385177805.