22/10/2026
स्तनांच्या कर्करोगाबाबत जागरूक व्हा, स्व-तपासणी करायला शिका!
स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी स्तनांमध्ये होणारे बदल वेळेत ओळखणे महत्त्वाचे आहे.
कोल्हापूर कॅन्सर सेंटर (KCC-CCA) तर्फे जाणून घ्या स्तनांची स्व-तपासणी करण्याच्या ६ सोप्या स्टेप्स. दर महिन्याला स्वतःसाठी काही मिनिटे द्या आणि आपल्या स्तनांमधील बदलांबाबत जागरूक राहा.
स्तनांमध्ये गाठ, आकारात बदल किंवा इतर असामान्य लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्व-तपासणीसोबत आवश्यक वैद्यकीय तपासणीही महत्त्वाची आहे.
लवकर निदानासाठी जागरूक व्हा. स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीपासून निदान आणि उपचारांपर्यंत, KCC-CCA आपल्या सेवेत!
📍 कोल्हापूर कॅन्सर सेंटर (KCC-CCA), गोकुळ शिरगाव, कोल्हापूर
📞 अपॉइंटमेंटसाठी: 8888024444
🌐 kolhapurcancercentre.com
हा व्हिडिओ शेअर करा आणि स्तनांच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हातभार लावा.