Shree Life Care

Shree Life Care We are well equipped with advanced facilities and team

Shree Life Care Hospital and IVF Center is the town's first In-vitro Fertilisation Test Tube Baby Center, with multidisciplinary services into Maternity, Gynaecology, Pediatrics, and Dental Health.

तुमच्या हृदयाची काळजी आता आम्ही घेऊ
30/06/2026

तुमच्या हृदयाची काळजी आता आम्ही घेऊ

२४ आठवड्यांचे गर्भाशय... Hb फक्त ६... आणि तरीही यशस्वी लॅप्रोस्कोपिक हिस्टरेक्टॉमी!काही केसेस या केवळ शस्त्रक्रिया नसतात...
26/06/2026

२४ आठवड्यांचे गर्भाशय... Hb फक्त ६... आणि तरीही यशस्वी लॅप्रोस्कोपिक हिस्टरेक्टॉमी!

काही केसेस या केवळ शस्त्रक्रिया नसतात... त्या संपूर्ण टीमच्या अनुभवाची, कौशल्याची आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असतात.

नाशिक येथील ४४ वर्षीय महिला पाळीच्या तीव्र त्रासामुळे श्री लाईफ केअर हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागात दाखल झाल्या. सुरुवातीला ही एक नेहमीची स्त्रीरोगाची समस्या वाटत होती. मात्र तपासणी सुरू होताच परिस्थितीची गंभीरता लक्षात यायला लागली.

रुग्णाचे हिमोग्लोबिन अवघे ६ ग्रॅम होते. शरीर आधीच तीव्र रक्तक्षयाशी झुंज देत होते. त्यात सोनोग्राफीमध्ये एक प्रचंड आकाराचा फायब्रॉईड आढळला. गर्भाशयाचा आकार इतका वाढला होता की तो जवळपास २४ आठवड्यांच्या गर्भधारणेइतका झाला होता.

यापूर्वी रुग्णाला नाशिकमध्ये पारंपरिक ओपन हिस्टरेक्टॉमीचा सल्ला देण्यात आला होता. कारण एवढ्या मोठ्या गर्भाशयावर लेप्रोस्कोपी करणे हे कोणत्याही सर्जनसाठी मोठे आव्हान असते.

पण प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते...

सर्वप्रथम रुग्णाचा रक्तक्षय दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन युनिट रक्त देऊन हिमोग्लोबिन १० ग्रॅमपर्यंत वाढविण्यात आले. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

ओपन सर्जरी नव्हे... तर लेप्रोस्कोपिक हिस्टरेक्टॉमी!

डॉ. योगेश लाडे यांनी हा पर्याय सुचवला. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर पूर्ण विश्वास दाखवत संमती दिली.

यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये सुरू झाली कौशल्य, संयम आणि अचूकतेची खरी परीक्षा...

डॉ. योगेश लाडे आणि डॉ. मयूर तिरमखे यांनी अत्यंत बारकाईने आणि नियोजनपूर्वक ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

शस्त्रक्रियेनंतर जे समोर आले ते स्वतःच या यशाची साक्ष देणारे होते...

तब्बल २ किलो वजनाचे गर्भाशय यशस्वीपणे काढण्यात आले होते!

पण याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेला रक्तस्राव अवघा ५ मिलीपेक्षाही कमी होता.

ही बाब मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीच्या अचूकतेची आणि सर्जिकल टीमच्या कौशल्याची साक्ष देणारी आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. अभा बूब यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या दक्षतेमुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडली.

आज रुग्ण सुखरूप असून जलदगतीने बऱ्या होत आहेत.

ही केवळ एका यशस्वी शस्त्रक्रियेची कथा नाही...

ही कथा आहे योग्य नियोजनाची...विश्वासाची...आधुनिक तंत्रज्ञानाची...आणि अशक्य वाटणारे आव्हान स्वीकारण्याच्या धैर्याची...

🏥

दुर्मिळ पण जीवघेण्या ‘स्कार इक्टोपिक’ गर्भधारणेवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रियागर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयु...
16/06/2026

दुर्मिळ पण जीवघेण्या ‘स्कार इक्टोपिक’ गर्भधारणेवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आनंददायी घटना असते. परंतु काही वेळा अत्यंत दुर्मिळ स्वरूपाच्या गर्भधारणा आईच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करू शकतात. अशाच एका दुर्मिळ आणि आव्हानात्मक Scar Ectopic Pregnancy (स्कार इक्टोपिक गर्भधारणा) असलेल्या रुग्णेवर आमच्या रुग्णालयात दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

मागील आठवड्यात एक गर्भवती महिला सोनोग्राफी अहवालासह आमच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात दाखल झाल्या. अहवालाचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर डॉ. योगेश लाडे व डॉ. मयुर तिरमखे यांच्या टीमने त्यांना स्कार इक्टोपिक गर्भधारणा असल्याचे निदान केले.

सामान्यतः गर्भाची वाढ गर्भाशयाच्या मुख्य पोकळीत होते. मात्र काही अत्यंत दुर्मिळ प्रसंगी, पूर्वी झालेल्या सिझेरियन प्रसूतीमुळे गर्भाशयावर पडलेल्या व्रणाच्या (Scar) जागी गर्भाची वाढ होऊ लागते. यालाच Scar Ectopic Pregnancy असे म्हणतात. ही स्थिती लाखो गर्भधारणांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात आढळत असली तरी ती वेळेत ओळखली गेली नाही तर गर्भाशय फुटणे, अनियंत्रित रक्तस्त्राव होणे आणि आईच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होणे अशा गुंतागुंती उद्भवू शकतात.

या रूग्णाच्या बाबतीत आजाराचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात झाले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या स्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच उपचारांच्या विविध पर्यायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व बाबींचा विचार करून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्कार इक्टोपिकवरील शस्त्रक्रिया ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. गर्भ हा जुन्या सिझेरियनच्या व्रणामध्ये वाढत असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. अनेकदा अशा रुग्णांना रक्तपिशव्या देण्याची आवश्यकता भासते. मात्र डॉ. योगेश लाडे व डॉ. मयुर तिरमखे यांच्या टीमने अत्यंत अचूक नियोजन, आधुनिक दुर्बिणी तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियेतील कौशल्य यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. विशेष म्हणजे संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव अत्यल्प झाला आणि रुग्णाला रक्त देण्याची गरज भासली नाही.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णेची प्रकृती उत्तम असून त्या जलदगतीने बऱ्या होत आहेत. वेळेवर झालेले अचूक निदान, योग्य उपचार नियोजन आणि अनुभवी वैद्यकीय टीमच्या समन्वयामुळे रुग्णेला संभाव्य जीवघेण्या गुंतागुंतींपासून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या संपूर्ण प्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. आभा बूब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

महिलांसाठी संदेश :
पूर्वी सिझेरियन प्रसूती झालेल्या महिलांनी गर्भधारणा झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर सोनोग्राफी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळातच गर्भाचे योग्य स्थान निश्चित झाल्यास अशा दुर्मिळ पण गंभीर स्थितींचे निदान वेळेत होऊन सुरक्षित उपचार करणे शक्य होते.

 #सक्सेस_स्टोरीमागील महिन्यात एक ४८ वर्षीय महिला रुग्ण अतिरक्तस्त्राव होतो म्हणून आमच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल...
06/04/2026

#सक्सेस_स्टोरी

मागील महिन्यात एक ४८ वर्षीय महिला रुग्ण अतिरक्तस्त्राव होतो म्हणून आमच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्या डॉ योगेश लाडे सर व डॉ.मयुर तिरमखे सर यांच्या टीमने प्राथमिक तपासणी केल्यानंतर सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.सोनोग्राफी रिपोर्ट बघितल्यानंतर गर्भाशय काढणे फायदेशीर राहील असे सरांनी सांगितले.
रुग्णाच्या दोन सिझेरियन डिलिव्हरी, उच्च रक्तदाब, सहा महिन्यापूर्वी येवून गेलेला हृदयविकाराचा झटका या सर्व कारणांमुळे दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करणे अवघड होते परंतु आमच्या टीमने हे आव्हान स्वीकारून रुग्णाची शस्त्रक्रिया कमीत कमी रक्तस्त्राव व रक्तदाब नियंत्रित ठेवून यशस्वी केली.
दोन दिवस रुग्णालयात आवश्यक ते उपचार केल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला,यावेळी रुग्ण व नातेवाईक यांनी योग्य ते उपचार वेळेत मिळाल्यामुळे उपचार करणाऱ्या टीमचे आभार मानले. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ.योगेश लाडे, डॉ.मयुर तिरमखे, भूलतज्ञ डॉ.आभा बूब, डॉ.बी.एस.ढाकणे सर यांनी परिश्रम घेतले.

03/02/2026
 #जीवनदान_देणारे_हातगेल्या आठवड्यात २९ वर्षीय  #सेंट्रल_प्लासेंटा_प्रिव्हीया असलेली गर्भवती रुग्ण ( सर्वसाधारणपणे प्रसूत...
25/01/2026

#जीवनदान_देणारे_हात

गेल्या आठवड्यात २९ वर्षीय #सेंट्रल_प्लासेंटा_प्रिव्हीया असलेली गर्भवती रुग्ण ( सर्वसाधारणपणे प्रसूती होते त्यावेळी अगोदर बाळ बाहेर येते आणि नंतर प्लासेंटा (वर) पण या रुग्णाचा प्लासेंटा गर्भाशयाच्या मुखाशी असल्याने अगोदर प्लासेंटा बाहेर येणार होता.) नियमित तपासणीसाठी आमच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात उपचारासाठी दाखल झाली.
३७ आठवड्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर डॉ.योगेश लाडे सरांनी सिझेरियन डिलिव्हरी चा निर्णय घेतला. रुग्ण आणि नातेवाईकांना प्लासेंटा प्रिव्हिया बाबतचे संभाव्य धोक्यांबाबत ( उदा. सिझेरियन करतांना अतिरक्तस्त्राव,रक्तदाब वाढणे,रक्तस्त्राव न थांबलयास गर्भाशय काढावे लागणे) याबाबत अगोदरच सविस्तर माहिती दिलेली होती. सर्व धोके जाणून घेऊन नातेवाईक आणि रुग्ण यांनी सिझेरियन डिलिव्हरी करण्यास समंती दिली.
रुग्ण आणि नातेवाईकांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून डॉ.योगेश लाडे व डॉ.मयुर तिरमखे सरांच्या टीमने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. प्लासेंटाप्रिव्हिया असल्या कारणाने अतिरक्तस्त्राव होण्याचा धोका जास्त असतो परंतु अत्यंत कमीत कमी रक्तस्त्राव झाला आणि गर्भाशय ही काढण्याची गरज पडली नाही. त्यामुळे फक्त एक पिशवी रक्त देवून या महिलेची सिझेरियन डिलिव्हरी करण्यात आली .सिझेरियन डिलिव्हरी नंतर आई व बाळ सुखरूप असल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आला.किचकट व गुंतागुंतीची सिझेरियन डिलिव्हरी निर्विघ्न पार पडल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी डॉक्टर्स टीम व स्टाफचे आभार व समाधान व्यक्त केले.
या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी जनरल सर्जन डॉ.राजेश माळी, हृदयरोगतज्ञ डॉ.संकेत मुळे, भूलतज्ञ डॉ.बी.एस.ढाकणे, डॉ.अभा बूब, बालरोगतज्ञ डॉ.शंतनू सरवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नववर्षाच्या शुभेच्छा !
01/01/2026

नववर्षाच्या शुभेच्छा !

Address

Satprishi Mala, Opposite To Bus Stand
Kopargaon
423601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Life Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category