16/07/2026
!! भावपूर्ण श्रद्धांजली!!
निःशब्द 😔🙏
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.
माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात कबरच आहे, हे विसरुन चालत नाही.
*outlet.?*
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir... मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा.आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी विपश्यना, ध्यान साधनेचा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दूःख, उपेक्षा..पिस्तोलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोप्प नाही का.?
*म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा.बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*
*हसा ! बोला ! रडा ! भांडा !*
*व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!*