25/04/2026
Review By Patient
पेशंट सुमित जाधव यांचा घराच्या छतावरून पडून गंभीर अपघात झाला होता. त्यांच्या पायाचे दोन ठिकाणी हाड मोडले होते, हाताचे हाड मोडले होते तसेच जबड्यालाही दुखापत झाली होती. आम्ही अनेक दवाखान्यांमध्ये फिरलो, पण सर्वत्र ऑपरेशनसाठी २–३ लाख रुपयांचा खर्च सांगितला जात होता. आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातील असल्यामुळे खूप चिंतेत पडलो होतो.
त्यावेळी आम्हाला कोणीतरी डॉ. चेतन जाजू सरांचे जाजू हॉस्पिटल सुचवले. आम्ही येथे आलो तेव्हा हॉस्पिटलची सुविधा पाहून 5-स्टार हॉस्पिटलसारखा अनुभव आला आणि खर्चही तसाच होईल असे वाटले.
पण येथे आल्यावर मॅनेजर वसीम सर यांनी आम्हाला खूप समजावून सांगितले की काळजी करू नका. त्यांनी आम्हाला धीर दिला आणि उपचारासाठी एकही रुपया भरण्याची गरज नाही असे सांगितले. त्यांनी पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत संपूर्ण उपचार होईल असे सांगितले.
डॉ. चेतन जाजू सरांनी देखील आम्हाला खात्री दिली की पेशंट पूर्णपणे बरा होईल. त्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. सरांनी स्वतः दररोज ४–५ वेळा येऊन पेशंटची तपासणी केली आणि आम्हाला धीर दिला.
अपघात इतका गंभीर होता की आमचा सुमित जिवंत राहील की नाही याचीही खात्री नव्हती. पण आज सर्व काही व्यवस्थित झाले आहे आणि आज आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे. आम्ही खूप आनंदाने घरी जात आहोत.
येथील स्टाफ खूप सहकार्य करणारा, कुशल आणि काळजी घेणारा आहे. इतर हॉस्पिटलपेक्षा येथे खूप चांगली सेवा मिळाली. हॉस्पिटलची स्वच्छता तर 5-स्टार हॉटेलसारखी आहे.
आमच्या सारख्या गरीब कुटुंबासाठी एवढ्या चांगल्या सुविधा पूर्णपणे मोफत मिळणे म्हणजे खूप मोठे भाग्य आहे. अपघात गंभीर होता आणि पेशंटची परिस्थितीही खूप नाजूक होती, पण ऑपरेशन यशस्वी झाले.
डॉ. चेतन जाजू सरांचे मनःपूर्वक आभार. जाजू हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचेही खूप खूप धन्यवाद.
पंतप्रधान आयुष्मान भारत योजना ही खरोखरच गरीब रुग्णांसाठी खूप मोठा आधार आहे.
धन्यवाद 🙏