27/12/2018
वैशाली आपल्या दीड वर्ष्याच्या बाळाला घेऊन आली . रात्रीतून अचानक खूप उलट्या अन जुलाब सुरू झाले होते त्याला !
" मॅडम ,अचानक च झाले हो मोठे मोठे जुलाब ,सकाळी मी त्याला ,माझी बहिण ऍडमिट आहे ,तिला बघायला म्हणून हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेले . तिथे छान होता ,खेळला पण ,आणि घरी येऊन 4 तास नाही झाले तर लगेच एक उलटी केली आणि जुलाब सुरू!"😢
बाळाला तपासून औषधे दिली ,पण एक महत्वाची गोष्ट वैशाली ला सांगायची होती ,त्यामुळे तिला समोर बसवले आणि माझी टकळी सुरू केली 😊
" वैशाली , हॉस्पिटल मध्ये आजारी नसलेल्या मुलांना नेऊ नये ,specially आजारी माणसांना भेटायला म्हणून हॉस्पिटल मध्ये तर अजिबात नाही ! आजारी माणसांना विश्रांतीची गरज असते ,ते जेव्हा घरी येतात बरे होतात तेव्हा भेटून यावे ,पण तेव्हा ही लहान मुलांना नेऊ नये ! डॉक्टर्स पण सांगतात ,उगाच मुलांना आणू नका ,पण लोक ऐकत नाहीत ! अग हॉस्पिटल मध्ये किती प्रकारचे पेशंट असतात,सर्दी खोकला ,जुलाब ,डेंगू ,मलेरिया , अनेक साथींच्या आजाराचे पेशंट ,आणि ते आपल्या खोकण्याने ,थुंकण्याने जंतू हवेत पसरवत असतात . आता हे आपल्याला कळायला नको का ? साधी सर्दी तुला झाली ,तर लगेच तुझ्या बाळाला लागू शकते ,कारण ते ह्या वयात खूप व्हलनरेबल असतात ग आजाराला !मग हॉस्पिटल मध्ये घराच्या 1000 पट इन्फेकॅशन जास्त होउ शकते तिथे का न्यावे ? आता लहानच आहे तो ,तो हॉस्पिटल मध्ये खेळला म्हणजे काय? तो फरशीवर बसला ,पळाला ,इथे तिथे हात लावला ,काही सापडले ते तोंडात घातले ,दीड वर्ष्याचा आहे तो ,त्याला काय कळते ? आणि ह्या वेळेस मोठी माणसे पेशंट बरोबर बोलण्यात गुंग ! सांग बरं कसा नाही आजारी पडणार ?
लक्ष्यात ठेवा ,हॉस्पिटल मध्ये भेटायला शक्य तोवर टाळावे , त्याचा पेशंटला पण त्रास च होत असतो ,कारण त्यांना रेस्ट हवी असते ,आणि त्याच बरोबर लहान मुलांना तर अजिबात घेऊन जाऊ नये , कारण ते लगेच हॉस्पिटल मधले इन्फेकॅशन उचलू शकतात !
अजून महत्वाचे म्हणजे हे हॉस्पिटल मधले जंतू ना खूप निर्ढावलेले असतात ,हॉस्पिटल मध्ये राहून जवळपास सर्व औषधांची त्यांना सवय झालेली असते ,रेग्युलर औषधांना दाद देत नाहीत ,आम्ही त्यांना रेसिस्टंट म्हणतो ! असे इन्फेक्षण लवकर बरे करणे अवघड होते मग !"
वैशाली ला पटले ,तुम्ही पण समजून घ्या !
Hospital acquired infection is dangerous !
लहान मुलांना आजारी माणसाला भेटायला घेऊन जाऊ नका !
Dr कल्पना सांगळे