28/07/2026
प्रत्येक गावातील प्रत्येक बालक निरोगी असावं... हीच आमची सेवा, हीच आमची जबाबदारी.
सर्वज्ञ हॉस्पिटलतर्फे आयोजित उसळगव्हाण येथे पार पडलेल्या मोफत बालरोग तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये अनेक बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच पालकांना बालकांच्या आरोग्य, पोषण, लसीकरण आणि योग्य संगोपनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आपल्या सर्व ग्रामस्थांचे, पालकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वज्ञ हॉस्पिटल भविष्यातही अशाच आरोग्यसेवा उपक्रमांद्वारे आपल्या सेवेत सदैव तत्पर राहील.
सर्वज्ञ हॉस्पिटल
धामणगाव रेल्वे, जि. अमरावती