28/08/2026
🎉 अजून एक स्वप्न पूर्ण झालं... माझे पहिले पुस्तक आता Amazon वर उपलब्ध! 📚✨
सर्वांना नमस्कार 🙏
अत्यंत आनंदाने सांगू इच्छितो की, माझे पहिले पुस्तक 'Mother Tincture in Homoeopathy' आज अखेर Amazon वर अधिकृतपणे प्रकाशित (Live) झाले आहे!
वैद्यकीय क्षेत्रातील माझा गेल्या १६ वर्षातील तोडकमोडका अनुभव आणि अभ्यास पुस्तकाच्या रूपाने तुमच्यासमोर आणताना मला अत्यंत आनंद होत आहे. पण हा प्रवास मी एकट्याने नक्कीच पूर्ण केला नाहीये. खालील प्रत्येकाचा ह्यामध्ये मोलाचा वाटा आहे.
हे पुस्तक मी माझ्या आदरणीय वडिलांच्या कै. भाऊसाहेब सोळुंके तसेच माझे सासरे कै.रमेश बोधले ,मामा कै.प्रकाश जाधव, कै. पंजाब जाधव यांच्या स्मृतीस आदराने समर्पित करतो.💐💐🙏🙏
त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे आणि आशीर्वादांमुळेच मी आज इथे पोहोचलो आहे. त्यांची उणीव सदैव भासेल, पण त्यांचे आशीर्वाद प्रत्येक पावलावर माझ्यासोबत आहेत. ❤️❤️
❤️ माझे कुटुंब माझी आई, मावशी, बायको,मुली, भाऊ, काका,काकू, मामा,मामी ,सासुरवाडीतील मंडळी ह्या संपूर्ण कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते. विशेषतः माझी बायको डॉ. दैवशाला सोळुंके हिला सर्वात मोठे श्रेय जाते.कारण तिने प्रत्येक टप्प्यावर दिलेली साथ आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.
Special Thanks ♥️ माझी मोठी मुलगी श्राव्या हिला तिने पूर्ण पुस्तक हे एडिट करण्यास मदत केली. तिच्या perfect इंग्लिश आणि कॉम्प्युटर अभ्यासामुळे माझ्या चुका शोधता आल्या.
❤️ माझे गुरू आणि मार्गदर्शक:
माझ्या वैद्यकीय प्रवासात प्रथम दिशा दाखवणारे Other Song Academy आणि तिथले सर्व आदरणीय शिक्षक. आदरणीय डॉ.राजन शंकरन सर, डॉ. ऋषी व्यास सर , डॉ. देवांग शाह सर, डॉ. मनीष यादव सर इत्यादी
♥️Special Thanks जेजे वैद्यकीय महाविद्यालयात गुरू पेक्षा मित्र म्हणून जपणारे डॉ.अभिजीत जोशी सर आणि इतर मान्यवर शिक्षक
❤️ Special Thanks माझे मित्र, फॅमिली डॉक्टर आणि गुरू , मी ज्यांना प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही ते डॉ. राजेश राजेंद्रन सर ( He Gave me new life, He Always believed on Me. त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतात)
♥️तसेच माझे मित्र डॉ. गौरंग गायकवाड यांचे मनापासून आभार. तुमच्या मार्गदर्शनामुळेच माझा हा प्रवास समृद्ध झाला.
❤️ Special thanks माझा मित्र डॉ. तुषार कोल्हे सर ( दिनेश तू काहीतरी होमिओपॅथी प्रॅक्टिस कर असे नेहमी प्रेमाने सांगणारा ) आणि माझ्या कॉलेज मधील सर्व मित्रपरिवाराचे सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाची मला नेहमीच गरज आहे. हे पुस्तक होम्योपैथीचे विद्यार्थी, डॉक्टर्स आणि वाचकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा करतो!
सगळ्यात शेवटी
❤️ special Thanks तो Ai, ज्यामुळे माझी तोडकी मोडकी इंग्लिश भाषा सरळ झाली.
📖 पुस्तक येथे उपलब्ध आहे -
https://a.co/d/01S5Kegf
Divya Bodhale
Rajesh Rajendran
Gaurang Gaikwad
Rajan Sankaran
Rishi Vyas
Devang Shah
Manish Yadav
Tushar Kolhe
Abhijeet Joshi
Mother Tinctures in Homoeopathy: A Practical Clinical Guide to 20 Important Mother Tinctures