अनुरुप जोडी वधू वर सूचक केंद्र

  • Home
  • India
  • Mumbai
  • अनुरुप जोडी वधू वर सूचक केंद्र
Directions Website

अनुरुप जोडी वधू वर सूचक केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अनुरुप जोडी वधू वर सूचक केंद्र, Marriage Therapist, Mumbai.

14/05/2026

लग्नातील जेवण
बुफे प्रकार व पंगत संस्कृती

पंगत संस्कृती 👍🏼👍🏼👍🏼🙏🏻
मराठमोळ्या लग्नसमारंभात हि पंगत संस्कृती पुन्हा यावी. आमचा बंधू श्री अभय सावंत यांच्या चिरंजीवांच्या लग्नात लयास गेलेली पंगत संस्कृती पुन्हा पाहायला मिळाली व मन प्रसन्न झाले. 'बूफे सिस्टीम ' मध्ये जेवणे म्हणजे एक सर्कसच असते. रांग लावून ताट वाट्या आणि टिश्यू पेपर हातात घ्या. जेवणाचे टोप समोर येईपर्यंत टिश्यू पेपरने ताट वाट्या पुसून घ्या. नंतर रांग लावून आजूबाजूच्यांना सांभाळत, एका हाताने ताट सांभाळत समोरच्या अनेक टोपांमधले ओळखीचे आणि अनोळखी पदार्थ मोठ्या चमच्याने ताटात स्वतः वाढून घ्या. वेगवेगळ्या पदार्थांची ताटात गर्दी झाली तरीही बरेच पदार्थ न घेतल्याचे लक्षात येते. शेवटी ते भरलेले ताट एका हाताने सांभाळत गर्दीतले धक्के सांभाळत जेवताना घामाघूम होऊन तारांबळ उडते. पंख्याच्या जोरदार वा-याने ताटातला पापड उडतो. शेजारी उभ्या असलेल्या जेवणा-या महिलेचे, तरुणीचे वा-यावर भुरभुर उडणारे केस आमच्या ताटात येण्याचा प्रयत्न करतात, तर कधी कधी आपल्या सफेद शर्टाला शेजारच्याच्या वाटीतल्या पनीर भाजीचा मसाला लागतो. कसबस जेवण कसरत करत संपवताना आणखी एखादी स्वीट घेण्याची इच्छा टोपांसमोरील रांग बघून दाबून ठेवावी.
आणि अखेरीस जेवणाचे संपलेले ताट ज्यात जबरदस्तीने खाल्लेले पंजाबी आणि इतर तत्सम अन्न पदार्थ होते ते ताट जेव्हा आपण disposal जागी देतो, तेव्हा मोकळा श्वास घेता घेता थकलेले हात मुख्यतः डावा हात हलका झाल्याचे जाणवते.
घाम पुसत आणि धुतलेले हात पुसत मग आपला मोर्चा आईस्क्रीम कडे वळलो.

तर अश्या या बूफे लंच पेक्षा आपल्या पूर्वीच्या लग्नातल्या पंगती आठवतात. पंगतीत तुमच्या समोर वारंवार वेगवेगळे जेवण घटक भाज्या, डाळी, उसळ, लोणचे, पापड, कोकम सरबत, ताक वगैरे अनेक जिन्नस घेऊन वाढपी येऊन हवे का असे विचारताच आपण थोडे सुखावतो.
अनेक पंगती असतील तर ठिक अन्यथा तुमचे जेवण संपता संपता तुझ्या खुर्चीच्या मागे अन्य जेवणोत्सुक वा भुकाळ वा घाईत असणारे येऊन आपले जेवण कधी संपतेय नि याची खुर्ची कधी गाठतो या प्रयत्नात व प्रतीक्षेत असतात. तो मोठा गमतीचा भाग असतो. असो...
आज याचा म्हणजे पंगत संस्कृतीचा अनुभव घेताना सुंदर मराठी गाणी ध्वनिक्षेपकावर ऐकू येत होती.

एक महत्त्वाचे कि जेवण कोणत्याही प्रकारचे दिले जावो... बुफे वा पंगत.... अन्न वाया घालवू नये व हवे तेवढेच घ्यावे हे ओघाने आलेच...

आमचा बंधू अभय सावंत यांचे अभिनंदन व धन्यवाद आणि वधूवरांना आशीर्वाद...
---- विलास सावंत 🙏🏻

08/03/2026
विनामूल्य नोंदणी registration freePlease click here - https://www.anurupjodi.com
02/07/2025

विनामूल्य नोंदणी registration free
Please click here - https://www.anurupjodi.com

अनुरूप जोडी वधू वर सूचक केंद्र, मुंबई

Registration free विनामूल्य नोंदणीPlease click here - https://www.anurupjodi.com
02/07/2025

Registration free विनामूल्य नोंदणी
Please click here - https://www.anurupjodi.com

अनुरूप जोडी वधू वर सूचक केंद्र, मुंबई

Address

Mumbai
400066

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुरुप जोडी वधू वर सूचक केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share