शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय संस्था

  • Home
  • India
  • Nagpur Road Area
  • शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय संस्था

शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय  संस्था शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्था प्लॉट नंबर 09 वॉर्ड नंबर 3 पिंपळदरा पोस्ट दावसा तालुका नरखेड जिल्हा नागपूर महाराष्ट्र पिन कोड 44 1301

🕯️🩸 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🩸🕯️ *सौ. केतकीबेन कमलेशभाई शहा* *(भारतातील पहिली महिला शताब्दी रक्तदाता)* 🗓 *मृत्यू: ३०.०३.२०...
31/03/2026

🕯️🩸 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🩸🕯️ *सौ. केतकीबेन कमलेशभाई शहा* *(भारतातील पहिली महिला शताब्दी रक्तदाता)* 🗓 *मृत्यू: ३०.०३.२०२६* 🩸 *108 वेळा रक्तदान सेवा* असे प्रेरणादायी जीवन ज्यांनी *स्त्री शक्ती, सेवा आणि मानवतेचा* अद्भुत इतिहास रचला. 🙏 आज रक्तदानाचे जग असाच एक *मौल्यवान कोहिनूर* गमावला ज्याची चमक हजारो जीवांच्या श्वासात सदैव जिवंत राहील. केतकीबेन यांनी ते सिद्ध केले निःस्वार्थ सेवा, दृढनिश्चय आणि मानवतेच्या समर्पणाद्वारे एक महिलाही *शताब्दी रक्तदाता* ठरली समाजासाठी एक अमिट प्रेरणा बनू शकते. त्याने फक्त 108 वेळा रक्तदान केले नाही. पण हजारो लोक *तसेच रक्तदानासाठी प्रवृत्त करण्याचा मार्ग दाखवला. 🙏 *अहमदाबाद रेडक्रॉस आणि शतकवीर रक्तदाता परिवार* आज आपण सेवा जगतातील एक अमूल्य रत्न गमावले. 🕯️ *मानवतेच्या या महान मार्गदर्शकाला* आमची विनम्र श्रद्धांजली. त्यांची सेवा, प्रेरणा आणि समर्पण येणाऱ्या पिढ्यांना सदैव मार्गदर्शन करत राहील. 🙏 *देव दिवंगत आत्म्यास शांती देवो* *ओम शांती* 🙏

एक हात मदतीचा…या नात्याने आज थडीपवणी येथील शेतकरी श्री. रमेशजी धोटे यांच्या होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज होती. ...
13/03/2026

एक हात मदतीचा…
या नात्याने आज थडीपवणी येथील शेतकरी श्री. रमेशजी धोटे यांच्या होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज होती. याबाबत शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्याकडे मदतीचे आवाहन करण्यात आले.
एम्स हॉस्पिटल, नागपूर येथे रक्ताचा तुटवडा असल्यामुळे श्री. प्रफुल भाऊ साबळे व मी भूषण जुडपे यांनी तिथे जाऊन रक्तदान केले आणि शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्था तर्फे त्यांची रक्ताची गरज पूर्ण करण्यात आली.
यावेळी त्यांचे सुपुत्र श्री. उमेश भाऊ धोटे हे देखील उपस्थित होते.
🙏 शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्था
नेहमीच गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तत्पर✌️🩸🩸Donate blood save life

🤝 एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याने 🤝🌿 शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेचा सामाजिक उपक्रम 🌿शेतकरी आपत्कालीन बहु...
26/01/2026

🤝 एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याने 🤝
🌿 शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेचा सामाजिक उपक्रम 🌿
शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर यांच्या वतीने पिंपळदरा येथील रहिवासी
श्री. मनोहर जुडपे (वय ५० वर्षे) यांना त्यांच्या कठीण आजारपणात आजपर्यंत एकूण पाच (५) बॉटल रक्ताची मदत करण्यात आली आहे.
यापूर्वी तीन बॉटल रक्त देण्यात आले होते तसेच अलीकडेच पुन्हा दोन बॉटल रक्त पुरवठा करून संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपली.
श्री. मनोहर जुडपे यांना
👉 CLD (क्रॉनिक लिव्हर डिसीज)
👉 हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब)
👉 तसेच सिकलसेल आजार
असून रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीरावर सूज येणे, धाप लागणे व इतर त्रास होण्याची शक्यता आहे. पुढील उपचारासाठी सर्जन व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (तज्ज्ञ डॉक्टर) यांचे मत अपेक्षित आहे.
या कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्याने सामना केला आणि आनंदाची बाब म्हणजे
🇮🇳 दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथील हॉस्पिटलमधून त्यांना सुट्टी मिळाली. 🇮🇳
हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी तसेच संस्थेसाठी आशेचा आणि दिलासादायक ठरला.
या सेवाकार्यात
🩸 श्री. भूषण घुले
🩸 श्री. सुशांत कालबांडे
यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून मोलाचे योगदान दिले.
तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संजय बेले यांनी औषधोपचाराबाबत आवश्यक माहिती दिली, योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले आणि डॉक्टरांशी योग्य पद्धतीने चर्चा करून उपचार प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली.
यावेळी संस्थेचे
🙏 उपाध्यक्ष श्री. संजय बेले
🙏 कोषाध्यक्ष श्री. प्रफुल साबळे
🙏 अध्यक्ष श्री. भूषण जुडपे
🙏 तसेच श्री. शुभम खुजे
हे सर्व उपस्थित होते.
🤝 एक हात मदतीचा — माणुसकीच्या नात्याने
संस्था गरजूंसाठी सदैव तत्पर आहे.
🙏🙏🙏 मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेचा सामाजिक उपक्रमशेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने काल मेडिकल क...
20/01/2026

शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेचा सामाजिक उपक्रम
शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने काल मेडिकल कॉलेज, नागपूर येथे पिंपळदरा येथील रहिवासी श्री. मनोहर जुडपे (वय ५० वर्षे) यांना तीन बॉटल रक्त देण्यात आले. सदर रक्त सौ. रजनी मनोहर जुडपे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संजय बेले, कोषाध्यक्ष श्री. प्रफुल साबळे, अध्यक्ष श्री. भूषण जुडपे तसेच प्रशांत भाऊ उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी श्री. मनोहर जुडपे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी उपाध्यक्ष श्री. संजय बेले यांनी औषधोपचार व आरोग्य विषयक उपयुक्त माहिती देऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन केले.
"एक हात मदतीचा" या भावनेतून संस्थेचा सामाजिक उपक्रम सतत सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

थॅलेसेमिया आजाराशी झुंज देत आज प्रभू शेळके बिग बॉस मध्ये पोहचला.. त्याला दर 15ते 20 दिवसाला रक्त द्यावे लागतात.आपण केलेल...
14/01/2026

थॅलेसेमिया आजाराशी झुंज देत आज प्रभू शेळके बिग बॉस मध्ये पोहचला.. त्याला दर 15ते 20 दिवसाला रक्त द्यावे लागतात.
आपण केलेले रक्तदान हे अनेकांचे जीव वाचवतात. रक्तदान श्रेष्ठदान ❤️🙏🙏

🌾 *शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थे* तर्फे 5000 रुपयांची आर्थिक मदत 🌾👏🤝👏 *एक हात मदतीचा!*👏🤝👏थडिपवणी येथील प्रशां...
27/11/2025

🌾 *शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थे* तर्फे 5000 रुपयांची आर्थिक मदत 🌾

👏🤝👏 *एक हात मदतीचा!*👏🤝👏

थडिपवणी येथील प्रशांत मधुकर मातकर हे सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी जीवन-मरणाची झुंज देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराचा कालावधी वाढत असल्याने हाताला काम नाही, त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे.

उपचारासाठी लागणारा मोठा खर्च आणि घरगुती अडचणी यामुळे परिवारावर मोठे आर्थिक ओझे आले आहे.

या पार्श्वभूमीवर,
📅 दिनांक: 27 नोव्हेंबर 2025, गुरुवार
शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे संस्थेचे पदाधिकारी मनोज मातकर आणि सहकाऱ्यांनी प्रशांत यांच्या घरी जाऊन 5000 रुपये आर्थिक मदत प्रत्यक्ष भेट देऊन सुपूर्द केली.

ही मदत प्रशांत यांच्या उपचारासाठी छोटासा हातभार ठरेल, तसेच त्यांच्या कुटुंबाला थोडा दिलासा मिळेल अशी आशा संस्थेला आहे.

🙏 मदतीसाठी सहभागी सर्वांचे मनःपूर्वक आभार!
🫂 " *आपलेपणाची भावना जपणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम."*@

27/11/2025

🧑‍⚕️ Patient Details

पेशंटचे नाव: विकास गडलिंग

वय: 29 वर्ष

गाव: थडिपवणी / हातूर्णा

मोबाईल: 7517881262

ब्लड ग्रुप: O+

रुग्णालय: मेडिकल हॉस्पिटल, नागपूर

फ्लोअर / रूम: 2nd Floor, Room No. 20

---

❗ नागपूरमध्ये O+ रक्ताची तातडीने गरज ❗

रुग्णाची प्रकृती गंभीर असून,
आपल्या छोट्याशा मदतीने एका जीवाला नवजीवन मिळू शकते.

👉 O+ ग्रुप असलेल्या नागपूरमधील व्यक्तींनी कृपया तातडीने संपर्क साधावा.

---

शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्थेने घेतली तात्काळ दखल

---

🙏 आजची मदत (27 नोव्हेंबर 2025)

आज मिळालेल्या मदतीच्या आव्हानाची ताबडतोब दखल घेत
प्रफुलभाऊ साबळे आणि भूषण जुडपे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची प्रत्यक्ष भेट घेतली.

प्रफुलभाऊ साबळे यांनी स्वतः एक युनिट रक्तदान करून रुग्णाची मदत केली.

तसेच पुढील उपचारांसाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

एक हात मदतीचा विश्वासाचा आणि आपुलकीचा .आपल्या सर्वांच्या हक्काचे शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्था .
20/11/2025

एक हात मदतीचा विश्वासाचा आणि आपुलकीचा .
आपल्या सर्वांच्या हक्काचे शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय सेवा संस्था .

रक्तदान श्रेष्ठदान... रक्तदान जीवनदान.शेतकरी आपत्कालीन मदत संस्था व सर्वस्वी लक्ष्मी उत्सव मंडळ सायवाडा द्वारा आयोजित रक...
09/11/2025

रक्तदान श्रेष्ठदान... रक्तदान जीवनदान.
शेतकरी आपत्कालीन मदत संस्था व सर्वस्वी लक्ष्मी उत्सव मंडळ सायवाडा द्वारा आयोजित रक्तदान शिबीरा मध्ये 41 रक्तदात्यांनी उस्फुर्त पणे रक्तदान केले व त्यात 2 मुलींनी सुद्धा रक्तदान करून नवा आदर्श घालून दिला.सर्व रक्तदात्यांचे व शिबिरासाठी मेहनत घेणाऱ्या आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद.💐💐👍👍🙏🏻🙏🏻🏆🏆

Address

Nagpur Road Area
441301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शेतकरी आपत्कालीन बहुउद्देशीय संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category