09/07/2026
डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध!
डोंबिवलीतील केडीएमसी रुग्णालयात नवजात बाळासाठी NICU बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर झालेल्या वादात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्यासोबत आलेल्या काही समर्थकांनी डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटकही केली आहे.
आजपर्यंत डॉक्टरांची वैद्यकीय चूक सिद्ध झालेली नाही. उलट या घटनेने आपल्या आरोग्य व्यवस्थेतील बेडची कमतरता, अपुऱ्या सुविधा आणि वाढता रुग्णभार हे गंभीर प्रश्न पुन्हा समोर आणले आहेत.
चूक कोणाचीही असो, तिची चौकशी कायद्याने व्हायलाच हवी. पण डॉक्टरांवर हात उचलणे हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. डॉक्टरांचे संरक्षण, रुग्णांचा सन्मान आणि सक्षम आरोग्य व्यवस्था हीच आजची खरी गरज आहे.
हिंसेचा निषेध करूया... आणि जबाबदार आरोग्य व्यवस्थेची मागणी करूया.
डॉ.भारती मढवई
जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य