Dr. Kailash Rathi

Dr. Kailash Rathi Chest physician n critical care specialist

26/05/2022

Chest physician n critical care specialist

15/02/2022

आपल्या आसपास खोकणाऱ्या व्यक्तीचा खोकला हा केवळ साधा खोकला आहे की, टीबीचा याचा आपण विचारही करत नाही.
टीबीच्या जंतूंनी फुप्फुसामध्ये आश्रय घेतल्यास फुप्फुसाचा टीबी होतो.
एकूण टीबी पेशंटपैकी बहुतेक पेशंटना या प्रकारचा टीबी होतो.

टीबीची लक्षणे
- दोन आठवडे किंवा जास्त दिवस असणारा बडकायुक्त खोकला
- हलकासा परंतु, संध्याकाळी वाढणारा ताप
- वजन कमी होणे
- भूक मंदावणे
- छातीत दुखणे
- रात्री खूप घाम येणे
- बडक्यातून रक्त पडणे

फुप्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा टीबी झाला असल्यास वरील लक्षणांखेरीज
ज्या अवयवाचा टीबी झाला असेल त्याप्रमाणे लक्षणे दिसून येतात.

- गंडमाळा (Lymphadenopathy)
- मानेवर सूज व गाठी येतात. कधी-कधी त्यामधून पू बाहेर येतो.
- मेंदूच्या आवरणाचा टीबी (meningitis)
- डोकेदुखी, ताप, ग्लानी, मानेचा ताठपणा इ.
- मणक्याचा टीबी
- पाठ दुखणे, पाठीच्या मणक्यावर सूज येणे,
- ताप येणे इत्यादी.

वरील लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्लानुसार चाचण्या करून आजाराचे निदान करून घेणे गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:- 9561222444

#

05/02/2022

दम्याचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो.
कधी कधी हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो.
कोणत्या कारणांमुळे होतो दमा / अस्थमा ?
धुम्रपान, वायू प्रदूषण, धूळ, धूर तथा सुगंधी वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो.
काही अँटी-बायोटिक औषधे, दैनंदिन जीवनातील तणाव आणि सिगरेटची सवय देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते.

दम्याची लक्षणे-
– श्वास घेण्यास समस्या
– श्वास घेताना शिटीचा आवाज येणे
– खोकला येणे
– छातीत दुखणे
– धाप लागणे
– श्वासाची घरघर

दम्याच्या त्रासात सतत खोखला येणे व धाप येणे ही मुख्य लक्षणे आहेत.
दमा होण्यासाठी अ‍ॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते.

दमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही यासाठी या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
दमा हा आजार दीर्घकाळ त्रास असल्यामुळे त्याला सातत्यपूर्ण वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असते.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:- 9561222444

03/02/2022

Anemia
अशक्तपणा
आपणास थकवा, त्वचा फिकटपणा, श्वास लागणे, हलके डोके, चक्कर येणे किंवा हृदयाचे ठोके जलद होणे अशा समस्या असतील तर आपणास अॅनिमिया असू शकतो.
अशा स्थितीत रक्तामध्ये पुरेशा निरोगी लाल रक्तपेशी नसतात आणि शरीरातील लाल रक्तपेशींची कमतरता किंवा अकार्यक्षम लाल रक्तपेशींमुळे अॅनिमिया होतो.
उपचार मूलभूत निदानावर अवलंबून असतात.
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.

पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786

सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:-
९५६१२२२४४४

Address

2nd Floor, Krushu Utpanna Bazar, Samiti Sankul, Dhindori Road Dindori Naka, Market Yard, Panchavati, India
Nashik
422003

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+91 94205 90111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Kailash Rathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Kailash Rathi:

Share

Category