Indian Institute of Medical Science Ayurved College and Hospital

  • Home
  • India
  • Nashik
  • Indian Institute of Medical Science Ayurved College and Hospital

Indian Institute of Medical Science Ayurved College and Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Indian Institute of Medical Science Ayurved College and Hospital, Hospital, Gut no 144 , In front of Delhi Public School Manori , Mhasarul, Nashik.

23/03/2023
https://youtu.be/URskprBIvJMरामशेज आशेवाडी येथे सर्व रोग निदान शिबिर संपन्न...- गरजू रुग्णांसाठी शिबिराचा मोठा फायदा...-...
23/03/2023

https://youtu.be/URskprBIvJM
रामशेज आशेवाडी येथे सर्व रोग निदान शिबिर संपन्न...

- गरजू रुग्णांसाठी शिबिराचा मोठा फायदा...

- ग्रुप ग्रामपंचायत रामशेज आशेवाडी आणि सर्व ग्रामस्थांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी केले प्रयत्न...

जागर जनस्थान शुभम बोडके-पाटील नाशिक📞8600831578

जागर जनस्थान मीडियाउत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी , वृत्तपत्र आपल्या सेवेत.. सांस्कृतिक, शैक्षणि.....

23/03/2023

भव्य सर्वरोग निदान शिबिर व मोफत औषधोपचार 🌹

साईबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस -आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटल

यांच्या विद्यमाने

मानोरी गावात दिनांक 8 फेब्रुवारी 2023 ( बुधवार) रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत औषधोपचार केले जातील . परिसरातील सर्व नागरिकांनी तसेच गर्भवती महिला, लहान मुले, वयोवृद्ध या सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष यांनी केले आहे.

👉🏻 शिबिराचे ठिकाण 👈🏻
श्रीकृष्ण मंदिर सभामंडप , मानोरी गाव ,मु. पो. मानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक-422004.

👉🏻अल्प दरात उपलब्ध सुविधा 👈🏻
🌹सोनोग्राफी
🌹एक्स-रे
🌹रक्त तपासणी
(वरील अल्पदरातील सुविधा फक्त हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे)

अधिक माहितीसाठी संपर्क:
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस- आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटल ,गट नं.144, दिल्ली पब्लिक स्कूलच्या पुढे, मु. पो. मानोरी, ता .दिंडोरी, जी. नाशिक- 422004.
फोन- 0253-2994232.
मानोरी येथे साईबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस- आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटलचे सर्वरोग निदान शिबिर संपन्न

दिंडोरीः दि. 8 फेब्रुवारी रोजी दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावात साईबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस- आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटल तर्फे मोफत सर्वरोग निदान आणि औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजेला सुरू झालेले सर्व रोग निदान शिबिर तीन वाजेपर्यंत सुरू होते . मानोरी गावातील श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .मानोरी गाव तसेच आजूबाजूच्या इतर गावातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. वेगवेगळ्या आजारांचे निदान आणि त्यावर मोफत औषधोपचार संस्थेच्या वतीने करण्यात आले. एकूण 70 ते 80 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच एक्स-रे सोनोग्राफी वेगवेगळ्या रक्त तपासण्या इत्यादी अल्प दरातील सुविधाही संस्थेच्या मानोरी येथील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या.

या या शिबिरात संस्थेच्या डॉक्टरांच्या पथकात डॉ.विद्या खाडे, डॉ. बिंदा भताने यांनी रुग्णांचे रोगनिदान तसेच योग्य सल्ला आणि मार्गदर्शन केले तसेच शिबिरात गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.

संस्थेच्या मानोरी येथील हॉस्पिटलमध्ये आरोग्य विषयक सुविधा तसेच सोनोग्राफी एक्स-रे आणि वेगवेगळ्या रक्त तपासण्या अल्प दरात उपलब्ध करण्यात आले आहे . या सर्व सुविधांचा गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घेण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष गौरव खाडे यांनी केले. या सर्व रोग निदान आणि मोफत औषधोपचार शिबिराच्या यशस्वीतेसाठी मानोरी गावचे पोलीस पाटील श्री. अमोल गीते, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुनिता गीते, श्री. नाना गवे ,श्री. दौलत पवार ,श्री . भाऊसाहेब गीते तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Address

Gut No 144 , In Front Of Delhi Public School Manori , Mhasarul
Nashik
422004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian Institute of Medical Science Ayurved College and Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category