07/05/2026
मुलगा शाळेतून घरी आला.
जेवण केलं नाही. खेळायला गेला नाही.
फक्त एका कोपऱ्यात शांत बसला.
तुम्ही विचारलं,
“काय झालं रे?”
तो म्हणाला, “काही नाही.”
पण खरं कारण वेगळंच होतं.
👉 शाळेत शी करायची होती. पण त्याने रोखून धरली.
कारण त्याला माहीत होतं — करताना खूप दुखतं.
ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही.
माझ्या OPD मध्ये येणाऱ्या ५ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये A**l Fissure चं प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढलंय.
आणि सर्वात मोठी शोकांतिका काय आहे माहीत आहे का?
मुलं सांगत नाहीत.
आणि पालकांना कळत नाही.
कारण हा विषय घरात उघडपणे बोलला जात नाही.
मुलाला लाज वाटते.
आईला काय विचारावं हे सुचत नाही.
आणि बाबा तर या विषयापासून चार हात दूरच राहतात.
मग काय होतं?
मूल शाळेत जाण्याआधी शी रोखतो.
शाळेतून घरी येईपर्यंत रोखतो.
दिवसभर रोखतो.
आणि हे रोखणंच फिशरला आणखी वाढवतं.
हे का होतंय आजकालच्या मुलांमध्ये?
• Junk food — chips, pizza, मैद्याचे पदार्थ, fiber शून्य आहार
• पाणी पिणं विसरणं, सतत मोबाईल आणि गेम्समध्ये अडकून असणे
• शाळेतल्या toilet ची भीती किंवा लाज
• मैदानी खेळ बंद, हालचाल नाही, पचन मंद
फिशर हा आजार नाही तर तो एक इशारा आहे.
मुलाचं शरीर सांगतंय,
“त्याची जगण्याची पद्धत चुकतेय.”
पण हे Google वर सर्च केलं तर काय मिळतं?
ऑपरेशनच्या भयंकर गोष्टी.
भीतीदायक फोटो.
आणि अजून गोंधळ.
म्हणूनच Sukhayu Healthcare च्या या पेजवर आपण ही भीती कमी करून याची नेमकी कारणे जाणून घेऊया.
✔️ ह्याचे उपचार
✔️ जीवनशैलीतील बदल
✔️ योग्य माहिती
तेही सोप्या भाषेत.
घाबरवून न टाकता.
तुमच्याही घरात शाळेत जाणारे मूल असेल तर Sukhayu Healthcare या पेजला आत्ता Follow करा.
आणि ही पोस्ट त्या पालकांना नक्की Share करा, ज्यांचं मूल ५ ते १५ या वयोगटात आहे.
❓तुमच्या मुलाने कधी शाळेत toilet वापरायला नकार दिला आहे का?
कमेंटमध्ये नक्की सांगा.
🩺 डॉ. सचिन जाधव
Sukhayu Healthcare | नाशिक