Anuradha Superspeciality Eye Hospital Palus

Anuradha Superspeciality Eye Hospital Palus Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anuradha Superspeciality Eye Hospital Palus, Lasik/Laser Eye Surgeon, Nikkam Tower Opposite Movie Theater Tasgoan Road Palus, Palus.

15/06/2026

माझे नाव संपदा पवार मी रा. भादवण ता. आजरा जि. कोल्हापूर येथून आली आहे. माझी मुलगी विधी पवार हिच्या डोळ्यांना लहानपणापासूनच #तिरळेपणा जाणवत होता. ही सात महिन्याची असताना आम्हाला असे जाणवले की तिरळेपणा हा आता प्रखरपणे जाणवत असून यावर ताबडतोब उपाययोजना करावी लागेल. आमच्या गावातील एका ओळखीच्या व्यक्तीने सांगलीतील #अनुराधा सुपरस्पेशलिटी आय हॉस्पिटल याचा पत्ता दिला. इथे आल्यानंतर आम्ही डॉ. किल्लेदार सर यांच्याकडून डोळ्यांच्या तपासणी करून घेतल्या डोळ्यांच्या तपासणी केल्यानंतर तिरळेपणाचे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान भारत योजना यांमधून होते असे आम्हाला समजले. त्यानंतर या योजनेस लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही ऑपरेशनची तारीख घेतली.

मुलीच्या डोळ्याचे ऑपरेशन म्हणल्यानंतर पहिल्यांदा मनामध्ये खूप भीती आली खूप विचार आला की ऑपरेशन व्यवस्थित होईल का माझ्या मुलीच्या डोळ्याला व्यवस्थित दिसेल का पण याची पूर्ण भीती डॉक्टरांनी घालवली. इथे असलेल्या तिरळेपणा तज्ञ डॉ. वैष्णवी पाटील मॅडम यांनी माझ्या मुलीच्या डोळ्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतर मॅडमानी ऑपरेशन व्यवस्थित झालंय हे सांगितल्यानंतर मनाला खूप आधार मिळाला. या हॉस्पिटलमध्ये असलेली स्वच्छता येथील स्टाफचे सहकार्य, त्यांची बोलण्याची पद्धत हे खूप छान आहे तसेच इतके महत्त्वाचे व मोठे ऑपरेशन महात्मा फुले योजनेमधून झाले याचेही मनाला खूप समाधान वाटले मी अनुराधा सुपर स्पेशलिटी आहे हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे तसेच सर्व स्टाफचे आभार मानते व त्यांना खूप खूप धन्यवाद देते.

 #नेत्रदान-श्रेष्ठदान !आज (ता. १० जून) जागतिक दृष्टिदान दिन. यानिमित्त नेत्रदान करायचे असल्यास काय काळजी घ्यावी हे सांगण...
10/06/2026

#नेत्रदान-श्रेष्ठदान !

आज (ता. १० जून) जागतिक दृष्टिदान दिन. यानिमित्त नेत्रदान करायचे असल्यास काय काळजी घ्यावी हे सांगणारा हा लेख.

कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करु शकते. जिवंत असताना आपले डोळे दान करण्यासाठी इच्छापत्र लिहून दिल्यास मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. एखाद्या व्यक्तिने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी त्याच्या इच्छेचा आदर ठेऊन कार्यवाही करायला हवी.

जर मृत व्यक्तीने कोणतीही पूर्व संमती दिली नसेल तर...त्यावेळी नातेवाईकांची संमती घेणे आवश्यक असते. यामध्ये खालील नातेवाईक येतात:

पती / पत्नी, मुले / मुली, आई / वडील, भाऊ / बहिण, इतर जवळचे नातेवाईक किंवा कायदेशीर पालक

जर त्यापैकी कोणीही डोळ्यांचे दान करण्यास संमती दिली, तर नेत्रदान शक्य आहे.

मृत्यूनंतर नातेवाईकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे मृत्यूनंतर जास्तीत जास्त 6 तासामध्ये मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बॅकेत जमा होतील, असे पहावे. त्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर नेत्र बँकेत दूरध्वनी करुन खालील बाबीची पूर्तता करायला हवी.

1. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा.
2. पंखा चालू असल्यास तो बंद करावा.
3. शक्य असल्यास अधूनमधून सूक्ष्म जंतूनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
4. मृत पावलेल्या व्यक्तीचे डोके अंदाजे 6 इंच वर उचलून ठेवावे.

नेत्रदान कोण करु शकत नाही

▪️ एचआयव्ही/एड्स (HIV/AIDS)
▪️ हिपॅटायटीस B आणि C
▪️ सीफीलीस
▪️ धनुर्वात
▪️ रेबीज (Rabies)
▪️ सेप्सिस (रक्तातील संसर्ग)
▪️ कर्करोग (Cancer)
▪️ कावीळ
▪️ विषाणूंपासुन होणारे रोग व नेत्रपटलाचे रोग

नेत्रदानाविषयी गैरसमज आणि सत्य

❌ गैरसमज: डोळे काढल्यावर चेहरा विद्रूप होतो.
✔️ सत्य: डोळे काढण्याची प्रक्रिया अगदी सन्मानपूर्वक केली जाते.

❌ गैरसमज: वय जास्त असेल तर डोळेदान शक्य नाही.
✔️ सत्य: कोणत्याही वयाच्या व्यक्तीचे डोळे दान करता येतात.

❌ गैरसमज: चष्मा लावणाऱ्या व्यक्तीचे डोळे दान करता येत नाहीत.
✔️ सत्य: चष्मा, मोतिबिंदू असला तरीही डोळे दान करता येतात.

✔️ नेत्रदानानंतर डोळयांतून रक्तस्त्राव होत नाही.

✔️ नेत्र बुब्बुळ रोपण केल्यानंतर मृत्यूपुर्वी पाहिलेली कुठलीही गोष्ट रोपण केलेल्या व्यक्तीस दिसत नाही.

✔️ पुनर्जन्म आहे की नाही माहित नाही पण नेत्रबुब्बुळ रोपणामुळे डोळयांचा पुनर्जन्म नक्की होतो.

✔️ डोळे किंवा बुब्बुळ काढल्यामुळे अंत्यसंस्कारास विलंब होत नाही.

08/06/2026

 #भारताच्या_सुपुत्रा_कडून_सातासमुद्रापार_मानुसकीचे_दर्शन! सांगली येथील अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ...
31/05/2026

#भारताच्या_सुपुत्रा_कडून_सातासमुद्रापार_मानुसकीचे_दर्शन!

सांगली येथील अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.मिलिंद किल्लेदार यांच्या टीम कडून मॉरिशसमध्ये 'स्क्विन्ट ४.०' मोहीम यशस्वी

वैद्यकीय सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून,मानुसकीच्या भावनेतून सातासमुद्रापार जाऊन रुग्णांचे आयुष्यप्रकाशमान करण्याचे कौतुकास्पद कार्य एका भारतीय डॉक्टरांच्या पथकाने केलेआहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत, 'रोटरी क्लब ऑफ बगाटेल' (Rotary Club of Bagatelle) आणि मॉरिशसच्या आरोग्य व कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे राबवलेल्यास्क्विन्ट४.०' (Squint 4.0) या विशेष वैद्यकीय मोहिमेचा यंदाचा टप्पा यशस्वीपणे संपन्न झालाआहे.

गेल्या सलग ४ वर्षांपासून या उपक्रमांतर्गत भारतातील प्रसिद्ध तिरळेपणातज्ज्ञ(Squint Specialist) डॉ. मिलिंद किल्लेदार, डायरेक्टर (अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगली) आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाला मॉरिशसमध्ये बोलावण्यात येत.यावर्षी सुद्धा एप्रिल २०२५ मध्ये अनुराधाची टीम मॉरिशस ला गेली होती. या टीममध्ये डॉ.मिलिंद किल्लेदार,डॉ.दीप्तीपाटील (सांगली), डॉ.प्रियांकाआसगावकर(मुंबई)हे डॉक्टर्स सहभागी होते. तसेच स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. व्ही. के. तुफानी (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ. हर्षापाठक (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ. अनिष्टा (नेत्ररोगतज्ज्ञ) आणि डॉ. अलीसाईब (भूलतज्ज्ञ) यांच्या सहकार्याने, हे भारतीय पथक मॉरिशस मधील आर्थिकदृष्ट्या अक्षम आणि गरजू रुग्णांवर, विशेषतःलहान मुलांवर 'तिरळेपणा' (Strabismus/Squint) दूर करण्यासाठी पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

सामाजिक व मानसिक नैराश्यावर मात करण्याचा प्रयत्न

"तिरळेपणामुळे लहान मुलांना शाळेत आणि समाजात अनेकदा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.काही वेळा त्यांना एकाकी पाडले जाते. हाच मानसिक न्यूनगंड आणि सामाजिक अडथळा दूर करण्यासाठी ही मोहीम जलद गतीने राबवून तपासणी आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत आहे," असे आयोजकांनी सांगितले.

'रॉड्रिक्स बेटा पर्यंत (Rodrigues Island) उपक्रमाचा विस्तार
यंदा या मोहिमेचा परीघ अधिक विस्तारत, वैद्यकीय पथकाने मॉरिशसच्या मुख्य भूमी सोबतच रॉड्रिक्सबेटावर जाऊन तेथील स्थानिक आरोग्य आयोगाच्या मदतीने विशेष शिबिर आयोजित केले. मोका(Moka) येथील 'सुब्रमण्य भारती आय हॉस्पिटल'मधील दीर्घ प्रतीक्षा यादी मुळे जे रुग्ण उपचारांपासून वंचित होते, त्यांना या दुर्गम भागात थेट भारतीय तज्ज्ञांचे उपचार मिळाले.शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या रॉड्रिक्स येथील एका लहान मुलीच्या मात्याने अत्यंत भावूक होऊन कृतज्ञता व्यक्त केली:

*"शस्त्रक्रिया अतिशय यशस्वी झाली. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी इतक्या दूरवरून आलेल्या रोटरी क्लब आणि भारत सोडून आलेल्या सर्व डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानते."*

'आरसीबीस्क्विन्टकॅम्प' (RCB Squint Camp Summary Table) च्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत या मोहिमेने शेकडो कुटुंबांच्या आयुष्यात आनंद आणला आहे:

गेल्या ४ वर्षांत या मोहिमे अंतर्गत ६६० हून अधिक मुलांची मोफत तपासणी करण्यात आली असून २३० पेक्षा जास्त यशस्वीशस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
कॉर्पोरेटआणि सामाजिक संस्थांचे सहकार्य दरवर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या या मोठ्या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्ती आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे (Sponsors) भक्कम पाठबळ लाभले आहे. यामध्ये अन्यु (ANNEAU), बीचकोम्बर फाउंडेशन, चिश्तीशिफा क्लिनिक, एसबीएम (SBM), मॉबँक (MauBank) आणि व्हॉइला हॉटेल बगाटेल यांसह अनेक संस्थांनी मोलाचे योगदान दिले आहे.

डॉ. मिलिंद किल्लेदार आणि त्यांच्या भारतीय पथकाचे हे चौथे यशस्वी वर्ष असून, मॉरिश ससरकार आणि रोटरी क्लब चा हा संयुक्त उपक्रम जागतिक स्तरावर मानुसकी आणि वैद्यकीय सेवेचा एक नवा आदर्श निर्माण करत आहे.

28/05/2026

नमस्कार, ही माझी आई श्रीमती. सखुबाई आवळे वय वर्षे 70 रा. कवठेपिरान, हिला गेली काही दिवसापासून डोळ्यांना कमी दिसणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे असा त्रास होत होता. आईचे डोळे एका चांगल्या डोळ्यांच्या डॉक्टर्स ना दाखवून पुढील योग्य तो उपचार करावा अशी आमची चर्चा घरी सुरू झाली तेंव्हा आमच्या काही नातेवाईकांनी सांगली येथील अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल येथे उपचार घेतले होते व त्यांना येथील अनुभव ही खूप चांगला आल्याने आम्हाला अनुराधा आय हॉस्पिटल मध्ये जाण्याचा सल्ला पाहुण्यांनी दिला.

त्यानुसार मी आईला या डोळ्यांच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन आले येथील तज्ञ डॉ. वैष्णवी पाटील मॅडम यांनी तपासणी व ऑपरेशन इतक्या सुंदर पद्धतीने केले याचा आम्हाला ही खूप छान अनुभव आला.

अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डोळे तपासणी, ऑपरेशन तसेच ऑपरेशन नंतर डोळ्यांची घ्यावयाची काळजी याची खूप छान माहिती दिली. येथील सर्व स्टाफ खूपच छान सहकार्य करतो. येथील स्वछता तसेच आपुलकीने पेशंटची घेतली जाणारी काळजी ही अत्यंत समाधानकारक होती. माझ्या सर्व कुटूंबाकडून तसेच सर्व नातेवाईकांकडून अनुराधा टीम ला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद 🙏

तुम्हाला हे माहिती आहे का ? #तिरळेपणाची 8000 पेक्षा जास्त यशस्वी ऑपरेशन्सअनुराधा येथील तिरळेपणा तज्ञ डॉ.  #मिलिंद_किल्ले...
19/05/2026

तुम्हाला हे माहिती आहे का ?

#तिरळेपणाची 8000 पेक्षा जास्त यशस्वी ऑपरेशन्स

अनुराधा येथील तिरळेपणा तज्ञ डॉ. #मिलिंद_किल्लेदार यांनी आतापर्यंत 8000 पेक्षा जास्त तिरळेपणाची ऑपरेशन्स केली आहेत. इतकी ऑपरेशन करणारे भारतातील फार थोडे सर्जन आहेत त्यापैकी ते एक आहेत.

18/05/2026
15/05/2026

#तिरळेपणा

 #तिरळेपणा ( ) म्हणजे काय?तिरळेपणा म्हणजे, डोळे एकाच वेळी एकाच दिशेने न पाहणे, यामध्ये एक डोळा वेगळ्या दिशेने फिरतो थोडक...
11/05/2026

#तिरळेपणा ( ) म्हणजे काय?

तिरळेपणा म्हणजे, डोळे एकाच वेळी एकाच दिशेने न पाहणे, यामध्ये एक डोळा वेगळ्या दिशेने फिरतो थोडक्यात दृष्टी दुहेरी होते, त्यामुळे समोरच्यांना दिसताना आपण तिरळे पाहत आहोत असे दिसते.

तिरळेपणाची कारणे

◼️ स्नायूंचा कमजोरपणा
◼️ जन्मताच स्नायूंचा नसलेला समन्वय
◼️ अनुवंशिकता
◼️ मेंदूचे विकार
◼️ दृष्टीदोष

अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तिरळेपणाची (Squint) शस्त्रक्रिया वेदनारहित, यशस्वीपणे केली जाते.

तुम्हालाही तिरळेपणा पासून मुक्ती हवी असेल, तर आजच अपॉइंटमेंट बुक करा!

 #योग्य_माहितीने_बदललेलं_आयुष्यश्री. क्षितिज पाटील, एका आदिवासी शिक्षण संस्थेत अधिकारी, नोकरीचे ठिकाण बऱ्याचदा शहरापासून...
02/05/2026

#योग्य_माहितीने_बदललेलं_आयुष्य

श्री. क्षितिज पाटील, एका आदिवासी शिक्षण संस्थेत अधिकारी, नोकरीचे ठिकाण बऱ्याचदा शहरापासून दूर असल्याने, शिक्षण आणि इतर सोईंसाठी कुटुंब गावीच ठेवलेलं, बघता बघता मुलं मोठीही झाली, या पैकी सर्वात मोठी मुलगी श्वेता(वय-२४) शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात, दुर्दैवाने तिच्या डोळ्यामध्ये लहानपणापासून किरकोळ #तिरळेपणा होता, फारसा जाणवत नसला तरी लपवण्यासारखा नक्कीच नव्हता आणि आता जेंव्हा घरी लग्नाचे वातावरण तयार होत होते तेंव्हा ही एक मोठी समस्या म्हणून समोर येत होती.

काहीवेळा हे एखादं मोठं व्यंग असल्यासारखं वाटायचं, मुलगी इतकी शिकलेली असुन देखील अगदी तुलना सुद्धा नसणारी स्थळं सुचवली गेली, त्यामुळे घरातील वातावरण खूपच चिंताजनक झालं होतं, क्षितिज पाटलांच्या स्वभावातील बदल त्यांच्या जवळच्या मित्रांना ही जाणवला, आणि त्याच्या मागील कारणही, त्यांनी परिचयातील काही मित्रांबरोबर चर्चा करून यावरील उपायही शोधला, खरंतर #तिरळेपणावर इलाज असतो ही माहितीच मुळात सुखद होती. दोघांनी मिळून उत्तम हॉस्पिटल शोधण्यासाठी खूप अभ्यास केला आणि अनुराधा सुपेरस्पेशालिटी आय हॉस्पिटल, सांगली डोळे तपासणी करून घेतली. कौन्सलिंग झाले, या आजारावर योग्य उपचार करता येतो याची उत्तम माहिती मिळाली. गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमुळे खचलेला श्वेताचा कॉन्फिडन्स सुद्धा बराच वाढला, तिरळेपणावर उपचार ही झाले, अगदी महिन्या दीड महिन्यात श्वेताचे डोळे एकदम नॉर्मल दिसू लागले आणि घरच्या सर्वांच्या आनंदाला सीमाच राहिल्या नाहीत.

खरंतर हे सगळं फ्लॅशबॅक सारखं डोळ्यासमोर तरळून गेलं कारण, गेल्याच महिन्यात तिचं लग्न ठरलंय, अगदी तिच्या मनासारखं, कोणतीही तडजोड न करता, आणि याची पत्रिका पाठवून फोनवरून यायचा आग्रह सुद्धा केला.
अश्या काही घटना खरच एक वेगळाच अनुभव देऊन जातात आणि काही गोष्टी बियॉन्ड प्रोफेशन असतात याची जाणीव करून देतात.

जर त्यांना योग्य वेळी, योग्य माहिती मिळाली नसती, किंवा हे बरं होणं शक्य आहे हे कळलंच नसतं, तर तिचं भविष्य वेगळंच असतं का ? तिला खरंच एखाद्या न आवडणाऱ्या आणि मिसमॅचिंग व्यक्ति बरोबर आयूष्य काढावं लागलं असतं का ?? यासारखे कितीतरी प्रश्न डोळ्यासमोर फिरत राहिले, पण तिच्या “आज” विषयी समाधान होतंच.

आपल्याही आसपास अशी काही उदाहरणं आपण बघत असतो, ते ही कदाचित श्वेता सारख्या परिस्थितून जात असतील, म्हणून एक माणुसकीचा विचार, किंवा कर्तव्य म्हणून आपण शक्य तितक्या या गोष्टी शेअर करूया, कदाचित तुमच्या एका क्षुल्लक लाइक किंवा शेअर मुळ कोण जाणे एखाद्याचं आयुष्यही बदलून जाईल.

यासारख्या इतरही डोळ्यांच्या प्रश्नांबाद्द्ल फ्री कौन्सलिंग साठी आणि इतर अधिक माहितीसाठी आजच #अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटला भेट द्या किंवा फोन करा

फोन 0233 - 2301939
मो. 9272101939/40/41

डॉ. #मिलिंद_किल्लेदार ( #तिरळेपणा व लहान मुलांचे डोळे विकार तज्ञ)

टीप:- रूग्णांच्या नाव उघड न करण्याच्या विनंती वरून रूग्णाचे, नातेवाईकांचे नाव आणि फोटो काल्पनिक घेतले आहे.

Address

Nikkam Tower Opposite Movie Theater Tasgoan Road Palus
Palus
416310

Opening Hours

Monday 9:30am - 7:30pm
Tuesday 9:30am - 7:30pm
Wednesday 9:30am - 7:30pm
Thursday 9:30am - 7:30pm
Friday 9:30am - 7:30pm
Saturday 9:30am - 7:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anuradha Superspeciality Eye Hospital Palus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share