Panchabhautik Chikitsalaya

Panchabhautik Chikitsalaya Treatment for: Skin, Asthma, Digestion, Obesity & Thyroid, Joint Pains

23/10/2023
काल दि. २५/६/२०२३ रोजी " पांचभौतिक चिकित्सा ॲपलिकॉन 2023 ", ही पांचभौतिक चिकित्सा विषयक राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली....
26/06/2023

काल दि. २५/६/२०२३ रोजी " पांचभौतिक चिकित्सा ॲपलिकॉन 2023 ", ही पांचभौतिक चिकित्सा विषयक राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली.

पुण्यातल्या आम्ही काही पांचभौतिक डॉक्टर्सच्या ग्रुपने याचे आयोजन केले होते.

कार्यशाळेमध्ये अनेक डॉक्टर्स, internees,UG,PG students नी भाग घेतला होता.
अत्यंत नेटक्या पद्धतीने आयोजन असल्याचे आणि कार्यशाळेमधून खूप काही ज्ञान अर्जित करता आल्याचा feedback खूप जणांनी दिला.

आमचे सर्वांचे गुरु वैद्यराज आ. वा. दातार शास्त्री यांच्या अत्यंत मूलगामी आणि पुढच्या अनेक वैद्यांच्या पिढ्यांना विचार करत राहायला लावणाऱ्या अशा या पांचभौतिक चिकित्सेचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि अधिकाधिक वैद्यागणांनी या पद्धतीचा अभ्यास करून अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ द्यावा असा विचार या कार्यशाळेमागे होता.

26/06/2023
16/06/2023

मी डॉ अमरजा गाडगीळ (१९९१ साली BAMS पदवी, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सांगली मधून प्राप्त)

वैद्य खडीवाले यांच्याकडे एक वर्ष प्रशिक्षण

बृहत्त्रयीरत्न वैद्यराज आ वा दातारशास्त्री, सांगली ( पांचभौतिक चिकित्सा प्रणालीचे संशोधक) यांच्या हाताखाली दीड वर्षे पांचभौतिक चिकित्सेचे प्रशिक्षण

वैद्यराज दातार पांचभौतिक चिकित्सा व संशोधन केंद्र, सांगली येथे १९९४ ते २००० या काळात मानद चिकित्सक ( मानद डॉक्टर) म्हणून कार्यरत

वैद्य विवेक हळदवणेकर सर, कोल्हापूर, यांच्याकडे एक वर्ष अनुभव संपादन

औषधीनिर्माण अनुभव

पुणे येथे गेली दहा वर्षे स्वतंत्र क्लिनिक

पुणे येथे कोथरुड आणि टिळक रोडला क्लिनिक

पांचभौतीक चिकित्सा पद्धती ही माझे आद्य गुरु वैदयराज दातार शास्त्री यांनी संशोधन केलेली अत्यंत मूलगामी अशी रोगनिदान व चिकित्सा पद्धती आहे.
यामध्ये रुग्ण तपासणी रिकाम्या पोटी केली जाते. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा नाद परीक्षेने रुग्ण तपासणी आणि प्रश्न परिक्षा यावरुन रोग निदान केले जाते.
औषधे अगदी लहान डोस मध्ये दिली जातात. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी ही चिकित्सा पद्धती आहे

मी मुख्यत: पोटाचे विकार आणि उष्णतेचे विकार यांनी ग्रस्त रुग्ण पाहते.
बद्धकोष्ठ, पोटदुखी, अम्लपित्त, पचन विकार, भूक न लागणे, ग्रहणी,fatty liver अशा अनेक पोटाच्या विकारांवर गुणकारी चिकित्सा देते.

उष्णतेच्या विकारांवर अगदी शंभर टक्के यशस्वी चिकित्सा आहे आमच्याकडे. खरं तर उष्णतेने होणाऱ्या लक्षणांची यादी खूप मोठी आहे…अगदी डोकेदुखी पासून ते मूळव्याधी पर्यंत अनेक लक्षणे रुग्णांमध्ये शरीरात उष्णता साठल्याने दिसू शकतात असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे.

Address

1619, 1st Floor, Sai Prakash Building, Sadashiv Peth, Badshahi Lane, Near Tilak Smarak Mandir, Hotel, Pune 411030
Pune
41130

Opening Hours

Monday 9am - 12pm
Tuesday 9am - 12pm
Wednesday 9am - 12pm
Thursday 9am - 12pm
Friday 9am - 12pm
Saturday 9am - 12pm

Telephone

+917498096635

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panchabhautik Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Panchabhautik Chikitsalaya:

Shortcuts

Share

Category