Deenanath Mangeshkar Hospital and Research Center

  • Home
  • India
  • Pune
  • Deenanath Mangeshkar Hospital and Research Center
Call Directions Website Contact the practice

Deenanath Mangeshkar Hospital and Research Center This is the official page of DMH.

A charitable, NABH accredited multi speciality hospital in Pune, offering advanced treatment, modern technology, and expert care under one roof.

नव्याचा ध्याससिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातून एक मुलगा पुण्यात येतो. त्या वेळी त्याचं शिक्षण जेमतेम बारावीप...
27/09/2026

नव्याचा ध्यास

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातून एक मुलगा पुण्यात येतो. त्या वेळी त्याचं शिक्षण जेमतेम बारावीपर्यंतचं झालेलं. पण, त्याला पुढे शिकण्याची प्रचंड इच्छा होती. नव्या गोष्टी आत्मसात करण्याची ओढ होती. आज तोच मुलगा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी विभागाचा टेक्निकल मॅनेजर आहे.
हे परिवर्तन म्हणजे त्यांची दोन तपांची अथक तपश्चर्याच!

संभाजी विठ्ठल डिंबळे असं त्याचं नाव!

त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात २००३ मध्ये मल्टीपर्पज वर्कर म्हणून कामाला सुरुवात केली. नोकरी सांभाळत त्यांनी तांत्रिक शिक्षण पूर्ण केलं. काम, शिक्षण, जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर स्वतःचे ज्ञान कायम ठेवलं... त्यामुळे २०१० मध्ये रुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी तांत्रिक मनुष्यबळाची गरज निर्माण झाली. त्यांच्या तांत्रिक शिक्षणाची दखल घेत त्यांचा समावेश टेक्निशियनच्या टीममध्ये केला.

आता त्यांच्यासमोर एक नवं जग होतं. नवीन उपकरणं, नवीन प्रक्रिया आणि गॅस्ट्रोएंटेरॉलॉजीमधील सतत बदलणारं तंत्रज्ञान.

पण संभाजींची एक खासियत आहे, नवं काही समोर आलं की ते शिकून घ्यायचं.

आणि एक दिवस असंही घडलं... ज्या रुग्णालयात ते मल्टीपर्पज वर्कर म्हणून आले होते, त्याच रुग्णालयात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्टसोबत ते खांद्याला खांदा लावून काम करू लागले.
आज त्यांच्या नेतृत्वाखाली आठ टेक्निशियनची टीम काम करते.

ही गोष्ट केवळ संभाजी डिंबळे यांच्या कर्तृत्वाची नाही.

ही गोष्ट त्या संधीची आहे, जी एका ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाला मिळाली.

ही गोष्ट त्या संस्थेची आहे, जी केवळ माणसाकडून काम करून घेत नाही; तर त्याच्यातील क्षमता ओळखून त्याला पुढे जाण्याची संधी देते.

आणि ही गोष्ट त्या जिद्दीची आहे, जी तुम्ही कुठून आला, यापेक्षा तुम्ही स्वतःवर किती कष्ट घेता, नवं काय शिकता, याला महत्त्व देते.

संभाजी डिंबळे यांचा प्रवास आज एका पदावर येऊन थांबलेला नाही.
कारण त्यांची नवीन शिकण्याची भूक अजूनही तशीच आहे.
यालाच म्हणतात...
The Spirit of DMH.

DMH Celebrated Simulation Week: Practise Today. Respond with Confidence Tomorrow.Deenanath Mangeshkar Hospital celebrate...
26/09/2026

DMH Celebrated Simulation Week: Practise Today. Respond with Confidence Tomorrow.

Deenanath Mangeshkar Hospital celebrated Simulation Week from 14 to 19 September, highlighting the importance of simulation-based learning in preparing healthcare teams for real-world situations.

At the Dr Indumati Amodkar Simulation Center, participants practised clinical procedures, decision-making, communication and teamwork in a safe, controlled and realistic environment.

“Simulation allowed participants to practise critical skills, understand their roles and learn from different clinical situations without placing patients at risk. It helped build the confidence needed to respond effectively during real emergencies,” said Dr Prasad Rajhans, In-charge, Simulation Center.

From medical students and resident doctors to nurses, consultants, faculty members and non-medical participants, the Centre provided training suited to different stages of learning and professional practice.

The programmes included adult, paediatric and neonatal resuscitation, advanced airway management, obstetric simulation, Point-of-Care Ultrasound, advanced ECG, Code Blue team training, mock drills, bystander CPR and community-level life-saving skills.

“Simulation-based learning strengthened not only technical abilities but also communication, coordination and decision-making. These qualities were essential for delivering safe and effective patient care,” said Dr Vinaya Kulkarni, Clinical Lead, Simulation Center.

The week celebrated every learner and trainer working towards safer practices, stronger teams and better patient outcomes.

Learn. Practise. Perform.

र. धों. कर्वेंपासून आजच्या ‘Informed Choice’पर्यंत…एकेकाळी लैंगिकता या नाजूक विषयावर उघडपणे बोलणे हाच मुख्य अडथळा होता. ...
26/09/2026

र. धों. कर्वेंपासून आजच्या ‘Informed Choice’पर्यंत…

एकेकाळी लैंगिकता या नाजूक विषयावर उघडपणे बोलणे हाच मुख्य अडथळा होता. आजचा अडथळा आहे तो शास्त्रीय माहिती आणि योग्य पर्यायापर्यंत पोहोचण्याचा.

२६ सप्टेंबर हा World Contraception Day म्हणजेच जागतिक गर्भनिरोधक दिन.

गर्भनिरोधकांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि लैंगिक व प्रजनन आरोग्याबाबतची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने २००७ पासून हा दिवस सुरू झाला.

२०२६ ची थीम आहे, “No Barriers, Just Choices: Contraceptive Access Now”
म्हणजेच, गर्भनिरोधकांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील अडथळे दूर करा आणि प्रत्येकाला योग्य पर्यायाची माहिती व निवडीचे स्वातंत्र्य द्या.

ही चर्चा आपल्यासाठी नवी नाही
जवळपास शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात र. धों. कर्वे यांनी संततिनियमन आणि लैंगिक आरोग्यासारख्या त्या काळात दुर्लक्षित आणि संकोचाच्या विषयांवर खुलेपणाने चर्चा सुरू केली.
१५ जुलै १९२७ रोजी त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सुरू केले.

कर्वेंच्या काळात प्रश्न होता—
“या विषयावर बोलायचे कसे?”
आज, ९९ वर्षांनंतर, प्रश्न पुढे गेला आहे—
“या विषयाबद्दल योग्य माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचते आहे का?”
आणि त्याही पुढे जाऊन—
“त्या माहितीच्या आधारे स्वतःसाठी योग्य पर्याय निवडण्याचे मोकळीक प्रत्येकाला मिळते आहे का?”
Contraception म्हणजे फक्त गर्भधारणा टाळणे नाही.

कुटुंबनियोजनामुळे गर्भधारणा कधी हवी आणि दोन मुलांमध्ये किती अंतर असावे, हे ठरवता येते. त्यामुळे अनियोजित गर्भधारणा कमी करण्यास आणि आई व बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
म्हणूनच प्रश्न फक्त, “गर्भनिरोधक वापरायचे की नाही?” इतकाच नाही.

तर प्रश्न आहेत, कुठली पद्धत? कधी? किती काळासाठी? कोणासाठी? आणि कोणत्या वैद्यकीय परिस्थितीत?
याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा जोडप्यासाठी एकच असेलच असे नाही.
म्हणूनच ‘Choice’ महत्त्वाची आहे.

गर्भनिरोधकांच्या अल्पकालीन, दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी पर्यायांसह विविध पद्धती उपलब्ध आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ‘Choice’चा अर्थ काय?

गर्भनिरोधक किंवा कुटुंबनियोजनाबाबत निर्णय घेताना प्रत्येक रुग्णाच्या गरजा आणि आरोग्यस्थितीचा विचार केला जातो, असे रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अनुराधा वाकणकर यांनी सांगितले.
यामध्ये—
• रुग्णाची गरज आणि भविष्यातील नियोजन समजून घेणे,
• आरोग्यस्थितीचे वैद्यकीय मूल्यांकन करणे,
• उपलब्ध गर्भनिरोधक पर्यायांची माहिती देणे,
• प्रत्येक पर्यायाचे फायदे, मर्यादा आणि संभाव्य परिणाम समजावून सांगणे,
• आणि शेवटी रुग्णाला माहितीच्या आधारे योग्य पर्याय निवडण्यासाठी समुपदेशन करणे
यावर भर दिला जातो.

“Choice म्हणजे पर्याय लादणे नव्हे; योग्य माहिती देऊन योग्य निर्णय घेण्यास सक्षम करणे,” ही पद्धत रुग्णालयात वापरली जाते, असे डॉ. वाकणकर यांनी स्पष्ट केले.

25/09/2026

The Boy Who Once Struggled to Walk Now Cycles Towards His Dreams

For Rajvardhan Joshi’s family, watching him cycle is something they once feared might never be possible.

When the seizures began

At eight, Rajvardhan began having seizures in his sleep. As they continued, his right arm and leg grew weaker until he could no longer walk independently.

At Deenanath Mangeshkar Hospital, he was diagnosed with Rasmussen’s encephalitis, a rare condition that can cause persistent seizures and progressive weakness.

“Rasmussen’s encephalitis can progressively affect movement, speech and other important functions. Surgery was advised after carefully evaluating Rajvardhan’s seizures, neurological condition and response to treatment,” said Dr Nilesh Kurwale.

Surgery made rehabilitation possible

Following nearly a year of treatment and monitoring, Rajvardhan underwent surgery in 2018. His seizures stopped, allowing him to focus on rehabilitation.

Through therapy, follow-ups and his family’s encouragement, he worked on movement and speech. Gradually, he regained independence and returned to school.

“Rajvardhan’s progress reflects his courage and the importance of sustained rehabilitation and long-term follow-up after treatment,” said Dr Sandeep Patil.

Every ride tells a story

Today, Rajvardhan is 15, studies in Class 9 and cycles 20–25 kilometres a day. His family says he remains seizure-free and no longer takes seizure medicines.

“There was a time when we worried whether Rajvardhan would walk independently again. Today, when we see him cycling, we feel proud and grateful. Every kilometre reminds us of how far he has come,” said his father, Yogesh Joshi.

And every new ride gives Rajvardhan another road to explore.

‘बाबा, मी शाळेत कधी जाणार?’१४ वर्षांची ज्ञानेश्वरी अचानक चक्कर येऊन कोसळली. रक्तातील साखर ४०० पेक्षा अधिक होती. तपासणीत ...
24/09/2026

‘बाबा, मी शाळेत कधी जाणार?’

१४ वर्षांची ज्ञानेश्वरी अचानक चक्कर येऊन कोसळली. रक्तातील साखर ४०० पेक्षा अधिक होती. तपासणीत टाइप-१ मधुमेहाचे निदान झाले आणि प्रकृती गंभीर असल्याने तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डायबेटिक कीटोअॅसिडोसिसमुळे शरीरातील आम्लता वाढली होती. त्यानंतर सेप्टिक शॉक, रक्तदाब कमी होणे, मेंदूला सूज, झटके, किडनी फेल्युअर आणि न्यूमोथोरॅक्स अशा एकापाठोपाठ एक गंभीर गुंतागुंती निर्माण झाल्या. तिला व्हेंटिलेटर आणि डायलिसिसचीही गरज भासली.

एक वेळ अशी आली की ज्ञानेश्वरीला बोलताही येईना. तिचे मेंदूचे कार्य पुन्हा पूर्ववत होईल का, हा मोठा प्रश्न होता. मात्र, पीआयसीयू, न्यूरोलॉजी, एंडोक्रिनोलॉजी, नेफ्रोलॉजी, बालरोग आणि न्यूरो-रिहॅबिलिटेशन तज्ज्ञांच्या समन्वित उपचारांनंतर तिची प्रकृती हळूहळू सुधारू लागली.

आणि मग एक दिवस तिने वडिलांना विचारले, ‘बाबा, मी शाळेत कधी जाणार?’
हा प्रश्न ऐकून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

आज ज्ञानेश्वरी आई-वडिलांशी बोलते आणि नियमितपणे शाळेत जाते.
बाल अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. सुमंत पाटील यांनी सांगितले की, “ तिच्यावर उपचार करताना मेंदूला सूज, सेप्टिक शॉक, मूत्रपिंडांचे बिघडलेले कार्य आणि इतर गंभीर गुंतागुंती होती. तिच्या मेंदूचे कार्य कितपत पूर्ववत होईल, याबाबत आम्ही साशंक होतो. मात्र, आज तिचे न्यूरोलॉजिकल कार्य पूर्ववत झाले आहे.”

ज्ञानेश्वरीवर धर्मादाय रुग्ण म्हणून उपचार करण्यात आले.

While Studying, 14-Year-Old Dnyaneshwari Suddenly Lost ConsciousnessFourteen-year-old Dnyaneshwari Gosavi was studying w...
24/09/2026

While Studying, 14-Year-Old Dnyaneshwari Suddenly Lost Consciousness

Fourteen-year-old Dnyaneshwari Gosavi was studying when she suddenly lost consciousness. Her parents, Sandip and Vaishali, rushed her to a nearby hospital, where she was diagnosed with Type 1 diabetes for the first time.

A Diagnosis the Family Never Expected

Dnyaneshwari had developed severe diabetic ketoacidosis (DKA), a life-threatening complication caused by a severe lack of insulin. As her condition worsened, she was transferred to Deenanath Mangeshkar Hospital (DMH) on ventilator support.

Transferred to DMH as Complications Worsened

Her blood pH had fallen below 6.8, indicating extremely severe acidosis. She also developed swelling of the brain, shock, sepsis, suspected meningitis and problems affecting multiple organs. Later, she had seizures and needed a tracheostomy for prolonged ventilator support. Haemodialysis supported her kidneys.

“Every day brought a new complication, and there were moments when we feared we might lose our daughter,” her parents recall. “When Dnyaneshwari recognised us, spoke again and asked about returning to school, it felt as though we had got our daughter back.”

After nearly a month in hospital, Dnyaneshwari went home with near-normal neurological recovery. At a recent follow-up, she walked in and spoke confidently.

“Seeing her return to near-normal functioning and look forward to school was an extraordinary moment for the entire PICU team,” says Dr Sumant Patil, PICU In-charge, DMH.

Her care was provided as a charity case and brought together paediatric intensivists, specialists, nurses and rehabilitation professionals.

‘दीनानाथ’मध्ये जानेवारीमध्ये होणार ‘विमर्श २०२७’राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्ताने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयुर्वेद ...
23/09/2026

‘दीनानाथ’मध्ये जानेवारीमध्ये होणार ‘विमर्श २०२७’

राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्ताने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयुर्वेद आणि इंटिग्रेटिव्ह मेडिसिन विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विमर्श २०२७’ या राष्ट्रीय परिसंवादाच्या पहिल्या फ्लायरचे प्रकाशन प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

‘विमर्श २०२७’ हा परिसंवाद दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘Interdisciplinary Deliberations Towards Clinical Excellence’ ही संकल्पना घेऊन आयोजित केला आहे. या राष्ट्रीय परिसंवादाची जानेवारी २०२७ साठीची संकल्पना ‘यकृतविकार’ अशी आहे. यामध्ये यकृताशी संबंधित विविध विकार, त्यांचे निदान, उपचारपद्धती तसेच आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद यांच्यातील समन्वयातून रुग्णसेवेत साधता येणाऱ्या सुधारणांवर आंतरविद्याशाखीय चर्चा होणार आहे.

आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाची सुरुवात करताना विविध वैद्यकीय शाखांमधील ज्ञानाचे आदान-प्रदान आणि चिकित्सकीय उत्कृष्टतेसाठी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘विमर्श’च्या माध्यमातून तज्ज्ञ, वैद्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांतील व्यावसायिक एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

23/09/2026

When the World Feels Unsteady, Neurophysiotherapy Can Help

Dizziness, spinning or imbalance can affect walking, confidence and everyday activities.

Positional vertigo and vestibular dysfunction can often be managed through specialised neurophysiotherapy.
Personalised exercises help improve balance, stabilise vision during movement, reduce symptoms and restore independence.

Seek professional assessment for safe, targeted rehabilitation and a steadier return to life.

‘ओ पॉझिटिव्ह’ समजलं; पण निघाला दुर्मीळ ‘बॉम्बे’ रक्तगटगुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या आजींचा रक्तगट तपासला असता तो ...
22/09/2026

‘ओ पॉझिटिव्ह’ समजलं; पण निघाला दुर्मीळ ‘बॉम्बे’ रक्तगट
गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या आजींचा रक्तगट तपासला असता तो ‘ओ पॉझिटिव्ह’ असल्याचे समजले होते. त्यानुसार शस्त्रक्रियेची तयारी सुरू झाली. पण रक्तगट ओ असल्याने त्याची अधिक तपासणी करताना डॉक्टरांना काहीतरी वेगळे जाणवले. पुन्हा तपासण्या झाल्या आणि जे समोर आले, त्याने संपूर्ण रक्तव्यवस्थेचे चित्र बदलले. रुग्णाचा रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’ नव्हताच; तो अत्यंत दुर्मीळ ‘बॉम्बे फिनोटाइप’ होता.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या अनोख्या प्रकरणाची नोंद आता Indian Journal of Hematology and Blood Transfusion या वैद्यकीय जर्नलमध्ये ‘Bombay Group Phenotype or Group O Phenotype: A Serological Dilemma’ या शीर्षकाखाली झाली आहे. डॉ. ब्रिंदा कक्कर, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. समीर मेलिंकेरी, डॉ. संजीव केतकर आणि डॉ. अमृता केरिपाले यांचा हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
सुरुवातीला या महिलेची रक्तगट तपासणी कॉलम अॅग्लुटिनेशन तंत्राने करण्यात आली. त्यात तो O Rh-D पॉझिटिव्ह असल्याचे दिसले. मात्र, रुग्णालयात O रक्तगटाच्या नमुन्यांची पुढील Anti-H Lectin तपासणी करण्याची पद्धत आहे. या तपासणीत अपेक्षित Agglutination दिसले नाही आणि या रक्तगटाबाबत पहिली शंका निर्माण झाली.
असा लागला नेमक्या रक्तगटाचा शोध
पहिल्या तपासणीत ‘ओ पॉझिटिव्ह’
सुरुवातीच्या रक्तगट तपासणीत महिलेचा रक्तगट ‘O Rh-D Positive’ असल्याचे दिसले.
रक्तगटाबाबतची पहिली शंका
रुग्णालयाच्या पद्धतीनुसार O गटाच्या प्रत्येक रक्त नमुन्याची पुढे ‘Anti-H Lectin’ चाचणी केली जाते. अपेक्षित Agglutination न दिसल्याने या रक्तगटाबाबत अधिक तपासणी केली.
‘ट्यूब टेक्निक’ तपासणीत काय दिसले?
या शंकेचे निरसन करण्यासाठी रक्ताची Tube Techniqueने पुन्हा तपासणी केली. Room Temperature आणि चार अंश सेल्सिअस तापमानात O Cellsसोबत Agglutination दिसले; मात्र ३७ अंश सेल्सिअस तापमानात ते दिसले नाही.
‘अॅडसॉर्प्शन-इल्यूशन’ टेस्टिंग
पुढे ‘Adsorption-Elution’ ही Test करण्यात आली. यात रुग्णाच्या तांबड्या रक्तपेशींमध्ये H, A आणि B Antigens नसल्याचे आढळले. या निष्कर्षातून रुग्णाचा बॉम्बे रक्तगट असल्याचे स्पष्ट झाले.
‘सॅलायव्हा टेस्टिंग’ने झाली खात्री
त्यानंतर ‘Saliva Testing’ करण्यात आली. त्यातही H, A आणि B Antigens नसल्याचे आढळले. त्यामुळे महिलेचा रक्तगट ‘Bombay Phenotype’ असल्याची खात्री झाली.
‘अँटी-एच टायटर’ही तपासला
पुढे ‘Anti-H Titre’ करण्यात आला. Room Temperatureला त्याचा Titre 1:2, तर चार अंश सेल्सिअसला 1:16 होता. ३७ अंश सेल्सिअसला मात्र Agglutination दिसले नाही.
काय दिसले?
सुरुवातीला O Positive दिसणाऱ्या Blood Groupमध्ये H Antigenचा अभाव आणि Anti-Hची उपस्थिती असल्याचे या तपासण्यांतून स्पष्ट झाले. त्यामुळे हा साधा O Blood Group नसून Bombay Phenotype असल्याचे निश्चित झाले.
शस्त्रक्रियेआधी शोधला दाता
आजींच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया नियोजित होती. रक्तगट निश्चित झाल्यानंतर डॉक्टरांना त्याची माहिती देण्यात आली. शस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधी बॉम्बे रक्तगटाचा दाता शोधला. त्याने स्वेच्छेने दिलेले एक युनिट रक्त रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आले.
शस्त्रक्रियेच्या दिवशी महिलेचे हिमोग्लोबिन ९.५ ग्रॅम/डेसिलिटर होते. राखीव रक्ताची क्रॉस-मॅच तपासणी केल्यानंतर ते सुसंगत असल्याची खात्री झाली आणि शस्त्रक्रिया पार पडली. दुसऱ्या दिवशी हिमोग्लोबिन ८.१ ग्रॅम/डेसिलिटर झाल्याने राखीव ठेवलेले रक्त देण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर चौथ्या दिवशी रुग्णाला घरी सोडण्यात आले. दोन महिन्यांच्या फॉलोअपमध्येही ती सुखरूप होती.
भारतामध्ये १० हजारांत एक
बॉम्बे रक्तगटाची पहिली नोंद १९५२ मध्ये मुंबईत झाली. भारतात हा रक्तगट सुमारे १० हजार व्यक्तींमागे एक, तर युरोपमध्ये तब्बल १० लाख व्यक्तींमागे एक आढळतो. या प्रकरणात सुरुवातीला O Positive वाटणारा रक्तगट पुढील तपासणीत Bombay Phenotype असल्याचे स्पष्ट झाले.

...आणि श्रीगणेशा झाला!बारामती तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याच्या परिसरातलं छोटंसं, टुमदार गाव पणदरे! या गावच्या मातीत व...
20/09/2026

...आणि श्रीगणेशा झाला!

बारामती तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याच्या परिसरातलं छोटंसं, टुमदार गाव पणदरे! या गावच्या मातीत वाढलेली एक मुलगी २००१ मध्ये पहिल्यांदा पुण्यासारख्या मोठ्या शहरात आली. हातात फार्मसीची पदविका होती आणि मनात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं स्वप्न…

ही मुलगी होती अमिता देसाई!
“पणदरेमधील पहिली फार्मासिस्ट असल्याचा मला अभिमान होता. पण, गावातून थेट पुण्यात येताना मनात थोडी भीतीही होती. सगळं नवीन होतं… माणसं नवीन, वातावरण नवीन आणि कामही नवीन,” हे सांगताना अमिता यांच्या डोळ्यांसमोर जणू २५ वर्षांपूर्वीचा तो पहिला दिवसच पुन्हा जसाच्या तसा उभा राहतो.
“माझा ‘डीएमएच’मधला प्रवासाचा श्रीगणेशा केवळ नोकरीचा नव्हता… तो स्वतःवर विश्वास वाढण्याचा होता,” हे सांगताना ‘डीएमएच’मध्ये पाऊल ठेवणाऱ्या अमिता आणि आज मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या अमिता यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास स्पष्ट जाणवतो.

“रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्यसेवा कर्मचारी रुग्णांच्या नजरेसमोर असतात. आम्ही फार्मासिस्ट मात्र अनेकदा पडद्यामागे असतो. पण, रुग्णाच्या उपचारात औषधांची भूमिका खूप महत्त्वाची असते. योग्य औषध योग्य वेळी रुग्णापर्यंत पोहोचणं, ही आमची जबाबदारी आहे,” हे बोलताना त्यांच्या प्रत्येक शब्दांत कृतज्ञता जाणवते.

पणदरे या छोट्याशा गावातून २००१ मध्ये ‘डीएमएच’मध्ये पाऊल ठेवणाऱ्या अमिता आज याच रुग्णालयाच्या मोठ्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत. या २५ वर्षांच्या प्रवासात त्या केवळ फार्मासिस्ट म्हणून घडल्या नाहीत; तर रुग्णसेवेशी त्यांचं अतूट नातं तयार झालं. त्यांचा हा प्रवास म्हणजे एका मुलीच्या आत्मविश्वासाची आणि रुग्णसेवेशी जोडलेल्या तिच्या नात्याची गोष्ट आहे आणि हेच तर ‘स्पिरिट ऑफ डीएमएच’ आहे!

Address

Deenanath Mangeshkar Hospital, Near Mhatre Bridge, Erandawne
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deenanath Mangeshkar Hospital and Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Deenanath Mangeshkar Hospital and Research Center:

Shortcuts

Share

Category