09/05/2026
हास्याची 'एंगेजमेंट' आणि टेन्शन मुक्तीचे 'जजमेंट'
कोर्टाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस... मे महिन्याची सुट्टी तोंडावर... आणि डोक्यात सतत चालणारे युक्तिवाद! या सगळ्यावर 'स्टे' आणण्यासाठी 'पुणे बार असोसिएशन'ने एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता
🎈 हॅपिनेस कोच व मोटिवेशनल ट्रेनर मकरंद टिल्लू यांनी त्यांच्या 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' या कार्यक्रमाने संपूर्ण सभागृह हास्याच्या लाटेवर तरंगत ठेवले.
👨⚖️👩⚖️ वकिलांनी कपाळावरच्या आठ्या बाजूला सारून, काळा कोट विसरून, आनंदाचे नवे तत्त्वज्ञान सहभागातून समजावून घेतले. या 'हास्य कल्लोळात' ताणतणाव पूर्ण 'डिस्मिस' झाला!
स्थळ : अशोका हॉल,
आयोजन: पुणे बार कौन्सिल
मनःपूर्वक धन्यवाद: अध्यक्ष एडवोकेट काळूराम भुजबळ, एडवोकेट एकनाथ सुगावकर व सर्व आयोजक टीम