15/12/2021
स्विकृती ---Acceptance
मित्रानो गम्मत आहे मोठी .... "स्विकृती" मध्ये ...
आपण ज्या परिस्थिती मध्ये आहोत , ज्या माणसांबरोबर आहोत , ज्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत , तेव्हा नक्की समजा कि ह्या सर्व गोष्टी आपण स्वतः निर्माण केल्या आहेत , आपल्या अंतरंगात ....
आपल्या वर्तमानात काय आहे ?? आपल्याला काय पाहिजे ?? कशासाठी ?? आणि आहे त्यापेक्षा खूप काही छान पाहिजे , हे नक्की ...
मग काय !
जे आता वर्तमानात आहे ते अटीविरहित पूर्णपणे स्वीकारण्यास प्रारंभ करण्यास हवा , ह्या सर्व गोष्टींसाठी स्विकृती हवी .
कारण आहे ती वर्तमान परिस्थिती आपल्याला काही तरी शिकवत असते , आपल्या स्वतःसाठी !आपल्या उत्कर्षासाठी , हे नक्की ...
आपल्या स्वतःच्या उत्क्रांतीसाठी , आहे ती परिस्थिती स्वीकारून त्याच्यावर काम करणे क्रमप्राप्त आहे , अगदी मोकळेपणाने ...
ह्या सर्व गोष्टीपासून पळून जाण्यात काही अर्थ नाही , त्याचा एक सजगपणे अभ्यास करून , स्वतःवर काम करणे जरुरीचे आहे , ह्या सर्व गोष्टी आपण जेवढ्या प्रमाणात टाळू , त्या तेवढ्याच प्रमाणात अजून आपणास त्रस्त करतील , अजून मोठ्या समोर उभ्या राहतील
त्यामुळे त्या सर्व गोष्टींची स्वीकृती करून , त्याच्या आनंदितत्वाकडे वाटचाल करणे खूप महत्वाचे आहे , त्या सर्व गोष्टी मध्ये सजगता निर्माण करून त्या पूर्ण सोडवण्यात काम करूयात !
“दोषारोपण” हि एक नकारात्मक ऊर्जा आहे , मग ते आपल्या स्वतःवर किंवा दुसऱ्यावर ..
त्यामुळे आपण अपराधाची भावना आपण प्रकट करत असतो , आपण नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो , टीकेची पाळंमुळं रुजवत असतो , त्या प्रकारच्या विचारांची आणि धारणाशी घट्ट नातं निर्माण करतो आणि त्यामुळे त्याच्याशी संलग्न असलेल्या घटनां आयुष्य घडण्यास सुरुवात होते आणि त्या आपण अनुभवत असतो .
त्यामुळे वर्तमानातील स्थिती पूर्णपणे स्वीकारून , स्वतःच्या " स्वीकृती" साठी प्रयत्न करणे जरुरीचे आहे .
चला तर मग ह्या विषयावर पुढच्या सदरात अजून बोलू ..... "स्वतःची स्वीकृती" म्हणजे काय ??
छान राहा , मस्त राहा , मजेत राहा
रोहित केसकर
हीलिंग थेरपिस्ट
९६ ०७ २९ ३१३१