Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre

  • Home
  • India
  • Pune
  • Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre

Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre Place for authentic ayurveda and Panchakarma treatment with Nadipariksha, Yoga and dietary guidance.

*Food Cravings Part 2**संतुलित-असंतुलित आहार* आपल्या जेवणात कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक यांचे प्रमाण ...
26/07/2026

*Food Cravings Part 2*
*संतुलित-असंतुलित आहार*

आपल्या जेवणात कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक यांचे प्रमाण योग्य असले की आपण त्यास संतुलित आहार म्हणतो.

परंतू आयुर्वेदात संतुलित आहार म्हणजे काय सांगितले आहे??
तर रोजच्या जेवणात ६ रसांच्या पदार्थांचा समावेश असणे आणि ते योग्य क्रमाने सेवन करणे म्हणजे संतुलित आहार होय.

खर तर स्वीट डिश शेवट खाण्याची पद्धत आयुर्वेदाला मान्य नाही. जेवणाची सुरुवात स्वादू म्हणजे गोड पदार्थाने करायला हवी त्या नंतर आंबट पदार्थ जसे की काही ताज्या चटण्यांचे प्रकार किवा कोशिंबिरी यांचे सेवन मग लवण रस जसे की पापड, लोणचे त्यानंतर तिखट पदार्थ जसे की आमटी, भाजी त्या नंतर कडू रस आणि शेवट हा कषाय रसाने ताकासारखे पदार्थ सेवन करून करावा असे सांगितले आहे . अर्थातच या सर्वांना ऋतुसापेक्ष बदल देखील करावे लागतात.

आता मधुर रस म्हणजे केवळ चवीला गोड एवढाच सीमित अर्थ नसून जे जे पदार्थ पचन प्रक्रिये दरम्यान मधुरता उत्पन्न करतात असे सर्व जसे की गव्हाची पोळी, भात देखील याकरिता च पंगत सुरू करताना भात प्रथम वाढायची पद्धत पूर्वीपासून आहे .
त्यात देखील स्थूल व्यक्ती, मधुमेही व्यक्ती यांना भात खायचा झालाच तर तो तांदूळ प्रथम हलका भाजून घेऊन मग शिजवावा आणि वापरला जाणारा तांदूळ हा जुना असावा किमान ६ महिने ते १ वर्ष, असे सांगितले आहे.

क्रमशः
डॉ. क्षितिजा कुलकर्णी
७८८८०५१६११

आहार सेवनाचे अन्य माहिती आणि नियम वाचण्यासाठी ⬇️

https://chat.whatsapp.com/L7LrfWJaYDKDotPgewxReO?s=cl&p=i&mlu=1

11/07/2026

वारी सेवा २०२६

*खाण्याचे व्यसन १*नूकताच अमली पदार्थ व्यसनाधीनता जागरूक सप्ताह साजरा झाला, परंतु व्यसन हे केवळ अमली पदार्थ किवा मद्य, धू...
30/06/2026

*खाण्याचे व्यसन १*

नूकताच अमली पदार्थ व्यसनाधीनता जागरूक सप्ताह साजरा झाला, परंतु व्यसन हे केवळ अमली पदार्थ किवा मद्य, धूम्रपान यांचेच नसते.

खाण्याचे व्यसन या बाबत कधी ऐकले आहे का ? होय आपल्यापैकी खूप लोकाना खाण्याचे देखील व्यसन असते परतु आपणच आपल्या या सवयी बद्दल अनभिज्ञ असतो.
बोली भाषेत क्रेविंग्स असा देखील याला म्हंटलं जाते. कधी कधी काही लोकाना गोड खाण्याची इच्छा होते तर काहीना चटपटीत खाण्याची!
अशा वेळी काही जण जेवण कमी करून पाहतात, सलाड कच्च्या भाज्या, फळे अशा गोष्टी खाण्यास सुरू करतात, काही लोक व्यायाम वाढवतात, भरपूर पाणी देखील पिण्यास सुरू करतात.
पण बहुतांशी जण एवढे सर्व करून देखील अपयशी ठरतात. आयुर्वेदात अशा सर्व लक्षण समुच्चयास ग्रहणी नावाच्या आजाराने संबोधिले गेले आहे.

आयुर्वेद असे सांगतो की बरेचदा शरीरास ज्या गोष्टीची गरज आहे किवा षड्रसांपैकी ज्याची गरज आहे त्याची इच्छा होते आणि त्यामुळे हे अनकंट्रोल्ड असे क्रेविंग्स येतात. केवळ आहार विहार नाही परंतु योग्य औषधाची जोड देऊनच अशा प्रकारची व्यसनाधीनता आटोक्यात आणता येते.

ह्या मागील आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे बऱ्याच प्रकारच्या कमतरता शरीरात असणे जसे की b१२ , परंतु केवळ विटामिन डेफिशियेंसी एवढेच कारण नसून मानवीय शरीरातील gut-brain axis या प्रणालीशी ह्याचा नजिकचा संबंध असतो.
क्रमशः

डॉ क्षितिजा कुलकर्णी
श्री विश्वस्वस्ति आयुर्वेद व पंचकर्म
पुणे
७८८८०५१६११
https://chat.whatsapp.com/L7LrfWJaYDKDotPgewxReO?s=cl&p=i&mlu=1

*वातुळ पथ्यकर भाजी: वांगे*खर तर वांगे वातुळ म्हणून खाऊ नये असे आपल्याला आयुर्वेदिक वैद्या कडून कायम ऐकायला मिळते. परंतु ...
23/06/2026

*वातुळ पथ्यकर भाजी: वांगे*

खर तर वांगे वातुळ म्हणून खाऊ नये असे आपल्याला आयुर्वेदिक वैद्या कडून कायम ऐकायला मिळते. परंतु हेच वांगे जर योग्य प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट केले गेले तर हेच आरोग्य दायी देखील ठरते. पाहूयात कसे?

१. पोट फुगून किवा पोटात जड पणा जाणवतो त्याचा दाब छातीवर पडतो, फार अस्वस्थ वाटते, अशा वेळी कोवळ्या डोरली वांग्याचे भरीत म्हणजे वांगे चुलीत विस्तवावर भाजून वरील जळलेली साल काढून टाकून त्यांत थोडी मिरे पूड व चवीपुरते सैंधव घालून खाल्ले असता पोट ओसरून छातीवरील दाब कमी होऊन हलके वाटते.

२. वांगे हे अग्निदीपक आहे. याने खाल्लेले अन्न पचते व भूक चांगली लागते. ज्यांना भूक चांगली लागत नाही त्यांनी वरीलप्रमाणे वांग्याचे भरीत खावे. खाल्लेले पचते व भूक लागते. वांग्याची भाजी किवा भरले वांगे न करता या पद्धतीने वांगे खाणे हे पचनासाठी उत्तम!

३. वांगे हे निद्राकर झोप आणणारे आहे. कोवळ्या डोरली वांग्याचे भरीत रात्री खाल्ल्याने झोप चांगली लागते.

४. वांग्याच्या पानांपासून सी व्हिटॅमिन काढतात हे प्रसिद्ध झाले आहे. सी व्हिटॅमिनचे सगळे गुण वांग्याच्या पानांत आहेत.

५. वांगे पौष्टिक आहे. अशक्त माणसाने जेवताना कोवळ्या वांग्याची भाजी अधिक मसाला न घालता खावी. थोडेच दिवसांत शक्ती वाढू लागते.

६. गंडमाला नावाच्या आजारात अथवा थायरॉइड विकारात येणारी सूज , गाठ ही लक्षणे वांग्याचे मुळांच्या गळ्यावर केलेल्या लेपाने कमी होण्यास मदत होते. अन्य औषधांच्या सोबत वांग्याची मुळे उगाळून कोमट करून दाट लेप लावावा. गुण येतो.

७. आयुर्वेदात दशमुळे म्हणून १० वनस्पतींच्या मुळाचा संग्रह सांगितला आहे . त्यातील डोरली वांगे हे हिरवे , पांढरे, कोवळे असते जे कफावर भाजी करून खावे. तेल, तिखट घालू नये. उकडून खावे. कफ कमी होतो. हे पथ्यकर आहे.

८. तोंडास रुची येण्यास वांग्याची वाफून केलेली भाजी सैंधव, आले घालून खावी.

निश्चितच वरील सर्व उपाय हे संपूर्ण वैद्यकीय सल्ला व परीक्षणोत्तर करण्याचे आहेत.
परंतु वांगे देखील युक्तीपूर्वक वापरल्यास फलदायी ठरते हे नक्की 👍🏻

डॉ क्षितिजा कुलकर्णी
श्री विश्व स्वस्ति आयुर्वेद, पुणे

अधिक माहिती करीता:

WhatsApp Group Invite

जागतिक योग दिनानिमित… २१ जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातो. आयुर्वेदात अशा खुपशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केवळ...
15/06/2026

जागतिक योग दिनानिमित…

२१ जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातो.
आयुर्वेदात अशा खुपशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केवळ ठराविक दिवशी न करता आपल्या नित्य आयुष्याचा भाग बनायला हव्यात.
१. नियमीत योग अभ्यास हा त्यापैकी एक आहे.
पहाटे उठून प्राणायाम, आसनांचे काही प्रकार, सूर्य नमस्कार इतका सीमित विचार आयुर्वेदला अपेक्षित नाही.
आसने आणि प्राणायाम हा त्यातील एक महत्व पूर्ण भाग आहे . जो नियमित केल्यास शरीर आणि मनाला हलकेपणा येऊन देखील स्थिरता प्राप्त होते.
लवचिक शरीर आणि सुद्रुढ मन हे आजच्या धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर सहजरित्या मात करायला मदत करते.
प्राणायाम हे अनेक दुर्धर आजारांवरील एक उत्तम जीवनशैली सुधारक औषध आहे.
यासोबत च आहार विषयक काही नियम, वागण्या विषयक काही नियम हे देखील योग या अंतर्गत समाविष्ट केले जातात.
त्यानंतर,
२.दिवाळीत केले जाणारे अभ्यंग स्नान हे खरे तर फक्त दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता रोज व्यायाम करण्यापूर्वी करावे असे सांगितले आहे.
आज तेल लावण्या विषयक अनेक गैरसमज समाजात अनेक माध्यमातून प्रसारित केले जातात.
वरवर पाहता क्षुल्लक वाटणारा हा उपक्रम नियमित म्हणजे अगदी लहान वयापासून सुरुवात करून तरुण आणि वार्धक्य अवस्थेपर्यंत केल्यास वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक छुपे फायदे देऊन जातो.
झोप शांत लागण्यापासून ते त्वचा तजेलदार राहून भूक लागण्यापर्यंत केवळ अंगाला योग्य पद्धतीने तेल लावण्याचे फायदे दिसून येतात.
३.सुवर्ण प्राशन संस्कार या विषयी देखील आपण खूप ऐकत वाचत असतो. आयुर्वेदात खरे तर असे बुद्धी वर्धक, रोग प्रतिकार क्षमता वर्धक असणारे औषध वयाच्या १६ वर्ष पर्यंत लहान मुलाना रोज मधातून चाट विले असता अधिक गुणकारी असते असे वर्णन आहे. केवळ सुवर्ण प्राशन एवढा संकुचित विचार न ठेवता बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर अनेक उपक्रमांची जोड सोबत देता येते जसे की परीक्षेच्या काळात विशिष्ट आयुर्वेदिक पद्धतीने अभ्यास देखील कसा करावा ? लक्षात राहण्यासाठी काय करावे ? ह्याविषयक पण जाणून घेतले तर सुवर्ण प्राशनाचा फायदा द्विगुणीत होईल.
योग दिनानिमित्त सर्वानी आयुर्वेद आपल्या आयुष्याचा भाग बनवावा याकरिता हा छोटासा प्रयत्न!!!

वैद्य क्षितिजा कुलकर्णी
श्री विश्व-स्वस्ति आयुर्वेद व पंचकर्म , पुणे
७८८८०५१६११

अधिक माहिती करिता
https://chat.whatsapp.com/L7LrfWJaYDKDotPgewxReO?s=cl&p=i&mlu=1

30/03/2026

Follow Dr. Ksh*tija Kulkarni's WhatsApp Channel. Shri vishwa-swasti Ayurveda and Panchakarma centre, Pune

Follow my channel and stay updated about Health !!
We Ensure your Health with Integrity of Ayurveda!!!

Vd.Ksh*tiha Kulkarni
M.D.Ayu.
7888051611. Join 26 followers for the latest updates.

30/03/2026

*सौंदर्या पलीकडील केसर*
Saffron beyond just Beauty !!!

बऱ्याचदा केशर म्हंटले की फक्त सौंदर्यवर्धन आणि त्वचा नितळ व सुंदर करणे एवढेच आपल्याला आठवते…बाजारातील अनेक केशर युक्त सौंदर्य प्रसाधने आठवतात….परंतु त्यापलीकडील केशराचे औषधी गुणधर्म देखील अनेक आहेत…
१. केशर हे कृमिघ्न म्हणून काम करते. जंत झाले असल्यास विशेषतः लहान मुलांमध्ये खायच्या कापूर सोबत केशर वापरायचा प्रघात आहे.

२. ⁠सुगंधी असल्याने डोकेदुखीवर केशर, चंदन आणि कापूर असा एकत्र लेप केला जातो. केशर बाहेरून लावल्याने डोके उतरते व दाह कमी होतो.

३. निद्रानाश तक्रार उत्तम निद्रा जनन म्हणून केशर युक्त गायीचे तूप हे पंचकर्मातील नस्य ह्या क्रियेत वापरले जाते.

४. केशर हे स्त्रियांमध्ये रज:प्रवर्तन समयी होणारे कष्ट देखील कमी करण्याचे रामबाण औषध आहे. पाळीपूर्वी ह्याचे सेवन हे पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते.
अर्थातच हे सर्व वैद्यकीय सल्ल्याने करावे. परंतु केशर हे देखील सर्वोत्तम असे औषधी आहे आणि केवळ सौंदर्य विषयक मर्यादित न राहता ह्याचा स्वतंत्र औषध म्हणून देखील उपयोग आहे हे माहीत व्हायला हवे याकरिता !

अशा अन्य माहितीसाठी
https://chat.whatsapp.com/L7LrfWJaYDKDotPgewxReO?mode=wwc
वैद्य क्षितिजा कुलकर्णी
एम. डी. आयुर्वेद
७८८८०५१६११
श्री विश्वस्वस्ति आयुर्वेद व पंचकर्म, पुणे

📌📌📌Announcement
27/03/2026

📌📌📌Announcement

Relocation alert 🔔 Please note !!
22/03/2026

Relocation alert 🔔 Please note !!

Address

Pune
411009

Telephone

+917888051611

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwa-swasti Ayurveda & Panchakarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share