अभेद्य योद्धा

अभेद्य योद्धा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अभेद्य योद्धा, Meditation Center, Pune.

आत्मविश्वास जन्मतः नसतो, तो तयार करावा लागतो.आपण अनेकदा म्हणतो, "त्याच्यात खूप आत्मविश्वास आहे, पण माझ्यात नाही." हे वाक...
14/07/2026

आत्मविश्वास जन्मतः नसतो, तो तयार करावा लागतो.

आपण अनेकदा म्हणतो, "त्याच्यात खूप आत्मविश्वास आहे, पण माझ्यात नाही." हे वाक्य बोलताना आपण एक मोठी चूक करतो. आपण समजतो की काही लोक जन्मतः आत्मविश्वास घेऊन येतात आणि काही नाही.

पण सत्य वेगळे आहे.

आत्मविश्वास हा जन्मतः मिळणारा गुण नाही; तो अनुभव, कृती आणि सातत्याने तयार होणारी ताकद आहे.

लहानपणी सायकल चालवायला शिकताना आठवा. सुरुवातीला भीती वाटत होती. अनेकदा तोल गेला, पडलो, खरचटलो. पण प्रत्येक प्रयत्नानंतर थोडा आत्मविश्वास वाढत गेला. एक दिवस असा आला की सायकल चालवण्यासाठी विचारही करावा लागला नाही.

जीवनातील प्रत्येक गोष्ट अशीच असते.

लोकांना स्टेजवर बोलायला भीती वाटते. नवीन व्यवसाय सुरू करायला भीती वाटते. नवीन लोकांशी बोलायला संकोच वाटतो. कारण त्यांच्यात क्षमता नसते म्हणून नाही, तर त्यांनी अजून त्या गोष्टीचा पुरेसा सराव केलेला नसतो.

लक्षात ठेवा, कृती केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो; आत्मविश्वास आला की कृती करतो, असे नसते.

अनेक जण आत्मविश्वास येण्याची वाट पाहत बसतात. पण आत्मविश्वास वाट पाहणाऱ्यांकडे जात नाही; तो कृती करणाऱ्यांकडे जातो.

आज तुम्ही कितीही छोटे पाऊल उचलले, तरी ते तुम्हाला कालपेक्षा मजबूत बनवते. प्रत्येक छोटा विजय मनाला सांगतो, "हे मला जमू शकते." आणि अशाच छोट्या विजयांची साखळी म्हणजे आत्मविश्वास.

आजची कृती

आज तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, त्या दिशेने एक छोटे पाऊल उचला. एखाद्याशी संवाद साधा, तुमचे मत मांडून पाहा, किंवा बऱ्याच दिवसांपासून पुढे ढकललेले एक काम पूर्ण करा. परिणामापेक्षा कृतीवर लक्ष द्या.

लक्षात घ्या....

"आत्मविश्वास मिळत नाही... तो प्रत्येक छोट्या कृतीतून घडवावा लागतो."

The Growth Lab

कालचा दिवस शारीरिक वेदना, थकवा आणि शांततेत गेला. पण रात्री सुरू झालेल्या वर्कशॉपने मनात आशेचा नवा दिवा पेटवला.राग, भीती ...
16/06/2026

कालचा दिवस शारीरिक वेदना, थकवा आणि शांततेत गेला. पण रात्री सुरू झालेल्या वर्कशॉपने मनात आशेचा नवा दिवा पेटवला.
राग, भीती आणि आपल्या वागणुकीमागील भावना यांची सुंदर उकल झाली. टॅपिंग प्रॅक्टिस करताना नकळत मनातील उदासीनता दूर होत गेली, एनर्जी, एक्साईटमेंट वाढत गेली आणि शारीरिक त्रासही 80% कमी झाल्याची जाणीव झाली.
सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे खूप दिवसांनंतर "आज शांत झोप लागेल" ही भावना मनापासून अनुभवली.
नवनाथ सर, मनाला योग्य वेळी योग्य दिशा दाखवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. प्रत्येक वर्कशॉपमधून हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा करण्याची तुमची कला खरोखरच प्रेरणादायी आहे.
कृतज्ञ आहे... तुमची आणि या सुंदर संधीची.🙏🏻
"कधी कधी औषधांपेक्षा योग्य विचार, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा मनाला जास्त बरे करून जाते."जे तुमच्याकडून आम्हा सर्वांनाच वेळोवेळी लाभते त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.🙏🏻
PS🦋💝

आज वर्कशॉपमध्ये नवनाथ सरांकडून भीती/राग आणि पैसा यासंदर्भात नवीन माहितीपर ज्ञान मिळाले. सोबतच नातेसंबंध आणि पैसा यांचे ए...
16/06/2026

आज वर्कशॉपमध्ये नवनाथ सरांकडून भीती/राग आणि पैसा यासंदर्भात नवीन माहितीपर ज्ञान मिळाले. सोबतच नातेसंबंध आणि पैसा यांचे एनर्जी लेव्हलचे कनेक्शन कळले. टॅपिंग मेडिटेशन नंतर मला मागचे दोन दिवस होणारी अंगदुखी (विशेषतः पायांचे दुखणे), छातीत आलेला जडपणा, धाप लागणे हे ९५% कमी झाले. तसंच मन प्रचंड मोकळं, रिलॅक्स आणि आनंदी वाटलं. दिवसभर शारीरिक दुखणं आणि मानसिक जडत्व घेऊन माझ्यालेखी आजचा दिवस नेहमीप्रमाणेच होता. पण, जेंव्हा सरांनी प्रश्न विचारला "आजचा दिवस कसा गेला ?" तेंव्हा आठवलं, आपल्याला मनापासून आवडतात त्या तब्बल चार-पाच गोष्टी केल्या गेल्यात, म्हणजे आपला आजचा दिवस किती छान होता. सरांनी विचारलेल्या प्रश्न आणि नंतरच्या विश्लेषण मधून कळले माझ्या आयुष्यात
असणाऱ्या समस्यांचा कंट्रोल माझ्याच हातात आहे. त्यावर उपाय करुन ती समस्या सोडवणे ही माझीच जबाबदारी आहे. Money gratitude Meditation साठीच्या पुढच्या प्रवासासाठी
I am excited 👍🏻

मला हा वर्कशॉप करण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल..
Thank you नवनाथ सर 🙏🏻
Thank you Universe 🙏🏻

तुमच्या प्रश्नांतून / अनुभवांतून मलाही काहीअंशी माझी उत्तरं मिळाली किंवा पुढे मिळतील.. त्यासाठी Thank you Everyone 🙏🏻

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when अभेद्य योद्धा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share